STORYMIRROR

Revati Shinde

Romance

4  

Revati Shinde

Romance

अव्यक्त प्रेम

अव्यक्त प्रेम

3 mins
295

"हॅप्पी व्हॅलेंटाइनस डे ,अद्वैत" " हॅपी व्हॅलेंटाईन डे शिखा" अद्वैत,आय ॲम सो हॅप्पी टुडे, मला तुला काहीतरी सांगायचेय" "मलाही तुला काहीतरी सांगायचंय" "पहिली मी" "नाही पहिला मी" "नो,लेडीज़ फर्स्ट " ओके" तो हसतच माघार घेत म्हणाला.

 "अद्वैत,आज आईची बालपणीची मैत्रीण आली होती आमच्याकडे आणि तिने तिच्या मुलासाठी मला मागणी घातलीय" "व्हॉट" अद्वैत जवळजवळ ओरडलाच. "माझीही अशीच सेम रिएक्शन होती." "तू होकार दिलास शिखा" "ऑफ कोर्स, अरे गेली कित्येक वर्ष या दिवसाची वाट पाहत होते. आय रियली लाइक हीम, मला आवडतो तो." "शिखा तू कधी याबद्दल काही बोललीस नाही ""तशी कधी वेळच आली नाही ना पण आता बोलले ना." "हे कायअद्वैत मी तुला एवढी आनंदाची बातमी सांगितली आणि मला साधं कोँग्र्यासचही नाही केलंस तू " "सॉरी, कोँग्र्यास शिखा."अद्वैत जेमतेम बोलला.

"बरं तुही काहीतरी सांगणार होतास ना." " काही नाही, गंमत केली " "तू पण ना" "वन मिनिट ,तू मागे काहीतरी लपवतोआहेस " "काही नाही" तो कागद खिशात टाकत म्हणाला ."मी निघतो मला जरा बाहेर जायचेय." अरे पण हे काय आताच भेटलो ना आपण ,आपलं नीट बोलणंही झालं नाही." प्लीज नंतर भेटू ना प्लीज" तो न तिच्याकडे न बघताच निघाला. ती अचंबित पणे त्याच्याकडे पाहतच राहीली आणि मग तीही तिच्या गाडीकडे वळली.

अद्वेत बऱ्याच वेळाने घरी आला. "अरे किती वेळ कधीपासून तुझी वाट पाहतेय, तू फ्रेश होऊन ये मला तुला काहीतरी सांगायचेय" "ओके "तो म्हणाला पण मन मात्र अस्वस्थ होते. त्याने तो कागद वहीत ठेवला. गेले कित्येक वर्ष त्यांने तो कागद जपून ठेवला होता. बारावीत असताना त्याने ती कविता लिहिली होती आणि त्यात त्यांने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्याला ती कविता शिखला द्यायची होती आणि प्रपोज ही करायचे होते पण हिम्मतच होत नव्हती आणि आत्ता त्याने हिम्मत केली होती पण अचानक... त्याचे मन भरून आले आईच्या हाकेने तो भानावर आला.

"अद्वैत ,आज मी शिखाकडे गेले होते तिला मागणी घालायला." "काय," "हो मला माहितीय तुझं प्रेम आहे तिच्यावर. तुला ती खूप आवडते आणि मलाही .तू तर कधी ते व्यक्त करणार नाहीस म्हटलं आपणच जावं." "आई तू का गेलीस तिथे. नकार दिला ना तिने. अगं, मला एकदा विचारायचं तरी ना. तू पण ना "तो चिडत म्हणाला ."अरे नाही ,अरे तिने होकार दिलाय. तिचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तिला ते तुझ्याकडून ऐकायचेय. "आई तू हे खरं सांगतेस" "हो अगदी खरं" "मला आत्ताच तिला भेटायचंय मग भेट. जा गच्चीवर" "काय" "हो" तो अधीर होऊन गच्चीकडे धावला. "अरे थांब. हे घेऊन जा . ती त्याच्या हातात गुलाब देत म्हणाली. "थँक्स आई" जा लवकर .

तो गच्चीवर आला. त्याने इकडे तिकडे पाहिले. एका कोपऱ्यात ती पाठमोरी उभी होती. "शिखा" तो धावतच तिच्याकडे आला.ती गर्कन वळली.. तिचे डोळे पाण्याने भरले होते. गेली कित्येक वर्ष ती या दिवसाची वाट पाहत होती. "शिखा ,आय लव यू" तिच्या हातात गुलाब देत तो म्हणाला. "लव यु टू अद्वैत "ती त्याच्या कुशीत शिरत म्हणाली ."अद्वैत तूला असं वाटलंच कसं की मी तुला होकार नकार देईन. प्रेमाचा अर्थ कळायला लागल्यापासून मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले .तुझ्या डोळ्यातही ते दिसत होते पण तू व्यक्त करण्याची मी वाट पाहत होते पण शेवटी धाडस करून मी सर्व केलं. आजही जर ते अव्यक्त राहिलं असते तर मी दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करून मोकळे झाले असते अगदी ठरवलंच होतं मनाशी." ती लटक्या रागाने म्हणाली. "सॉरी शिखा " इट्स ओके.अद्वैत."

"पण शिखा एक सांग तू इथे कशी पोहोचलीस." "तू तिथून निघालास तेव्हाच मला समजलं तू अस्वस्थ आहेस म्हणजे घरी जाणार नाहीस. नदी किनारी जाऊन बसशील देवाशी भांडशील म्हणूनच मी काकूं ना फोन लावला. खात्री करून घेतली आणि मग घरी आले आणि पुढचे तुला माहीतच आहे." हं म्हणजे आईही यात सहभागी होती तर. " "येस."वेडी आहेस बघ" "हो आहेच तुझीच ,वेडाबाई." त्याने हलकेच तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance