STORYMIRROR

Revati Shinde

Classics

3  

Revati Shinde

Classics

ओढ भेटीची

ओढ भेटीची

1 min
14

आज सकाळपासूनच राधिकाला देवळात जावेसे वाटत होते.बरेच दिवस झाले होते देवीच्या देवळात जाऊन. कामाच्या व्यापात निघताच येत नव्हते. त्यात विशाल ही इथे नव्हता.आताही ती निघणारच होती  छोट्या चिऊला घेऊन पण ती रडायला लागली ,"आई  खूप झोप येतेय झोपवना मला".तिचा नाईलाज झाला. तिला माहित होते की ती आता झोपली की आठ शिवाय उठणार नाही  आणि मग देऊळही बंद होईल. 

तिने इथूनच देवीला  नम्सकार केला.  इतक्यात बेल वाजली. दारात तिची आई उभी होती. "आई तू " "तुझी आठवण आली' आले. अगं फ़ोनही नाही केलास.  म्हटलं तुला सरप्राईज दयावे. "  आणि हे काय देवीची ओटी.देवळात चाललीस वाटते. "हो , पण ,तिने  थोडक्यात सांगितले ."अग तू जाऊन ये मी बसते तिच्यासोबत. "आई ,थैंक्स."  

तिने मनोभावे देवीची ओटी भरली .क्षणभर  देवीच्या जागी तिला तिच्या आईचाच भास झाला. तिचे डोळे अश्रुंनी भरले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Classics