लाल परी
लाल परी
इशा स्टेशनमधून बाहेर पडली. एकही रिक्षा मिळत नव्हती. इतक्यात समोर एसटी म्हणजेच लाल परी उभी होती. ती पटकन लाल परी मध्ये चढली. जेमतेम तिला सीट मिळाली. खरंतर तिला विंडोसीट हवी होती पण तिचे बॅडलक. एक तरुण त्या सीटवर बसला होता.
एस्टी सुरू झाली.गार वारा आत आला.तिने हेव्यानेच त्या तरुणाकडे पाहिले.तो मात्र खिडकीतून बाहेर पाहत होता.पुढल्या स्टॉपला खूपच गर्दी झाली .ती जमेल तशी सावरून बसण्याचा प्रयत्न करत होती पण लोटालोटी चालूच होती. "तुम्ही माझ्या सीटवर बसता का" तिने चमकून त्याच्याकडे पाहिले ."नाही नको ,इट्स ओके प्लीज बसा इथे. तो उठत म्हणाला. "थँक्स" "वेलकम, आर यू कम्फर्टेबल" "यस" गार वाऱ्याने ती सुखावली. तिने कानात कॉड घातले आणि डोळे मिटले. एका वळणावर एसटीला खचकंन ब्रेक लागला आणि ती त्याच्यावर आदळली."सॉरी" "इट्स ओके". एसटी थांबली. "काय झालं ,काय झालं" एकच गलका झाला. "पंचर. उतरा खाली."
इतरांसोबत तीही खाली उतरली. "किती वेळ लागेल" त्याने कंडक्टरला विचारले. "अर्धा एक तास जाईल" ईशाने घड्याळात पाहिले.सहा वाजले होते. म्हणजे गावात जाईपर्यंत काळोख पडणार होता. ती जरा टेनस झाली. जवळची लोकं रिक्षा कडे धावली. "तुम्ही रिक्षाने का जात नाही .तुमचे गाव तर इथून जवळ आहे". कंडक्टरने त्याला सांगितले. "नाही नको" . ,"खरंच तुम्ही रिक्षाने का नाही जात" "नको, असू देत,मला तशी काही घाई नाही." एक तासाने एसटी सुरू झाली. ते सीटवर येऊन बसले.तिने बाहेर पाहिले. मीट्ट काळोख पडला होता. बस मध्ये पण आता खूप थोडेस प्रवासी उरले होते. पुढच्या स्टॉपला तोही उतरेल .का कुणास ठाऊक या विचाराने ती अस्वस्थ झाली. पण त्याचा स्टॉप गेला तरी तो उतरला नाही. "तुमचा स्टॉप गेला, तुम्ही उतरलात का नाही" तिने आश्चर्याने त्याला विचारलं. "मीही आता शेवटच्या स्टॉप ला उतरतोय. "पण का" तिने अधीरतेने विचारलं. त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. "आय एम सॉरी" "मी माझ्या मित्राकडे जायचा विचार करतोय. "अच्छा. " तिने परत कानात कॉड घातले आणि तिरक्या नजरेने ती त्याचे निरीक्षण करू लागली. तो खरच रुबाबदार होता. त्याच्या अदबीच्या बोलण्याने तो संस्कारी वाटला. तिला स्वतःचेच हसू आले.
तिचा स्टॉप आला. तिने सामान घेतले आणि ती खाली उतरली. तिने आजूबाजूला पाहिले सगळीकडे सामसूम होते .काही घरांमधून मिनमिंता प्रकाश येत होता. तिला बरेच अंतर कापायचे होते. ती मनातून थोडी घाबरली. "चला" मागून त्याचा मधूर स्वर ऐकू आला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. "तुम्हाला सोडेन आणि पुढे जाईन. "अहो नको' मी जाईन" ओके जा" इतक्यात तिला काहीतरी सळसळल्याचा भास झाला. ती जोरात किंचाळली. "काय झालं," "काही नाही" "चला "तो टॉर्च मारत म्हणाला. चंद्राचं चांदणं, रातकिड्यांची किरकिर, मंद वारा आणि सोबतीला तो .प्रत्येक पावलावर तो तिला सांभाळत होता, तिची काळजी घेत होता. का ते तिला कळत नव्हते. तिचे घर आले. दारात आजी उभी होती. ,"आलीस,अगं किती उशीर केलास. तिने कारण सांगितले. आजीची नजर त्याच्यावर गेली. "हा कुठे भेटला तुला" त्याने वाकून आजीला नमस्कार केला. "कधी आलास" "काल" म्हटलं बाळूला भेटून यावं." "बरं केलंस" तेवढीच इशाला सोबत झाली. घोरंच लागला होता." "बरं आत ये, चहा ठेवते." आजी नको, फारच उशीर झालाय, उद्या येईन ना भेटायला "तो तिरक्या नजरेने इशा कडे पाहत म्हणाला. इशाची मान खाली झुकली. ती तो गेला त्या दिशेकडे पाहत राहिली. "चांगला मुलगा आहे. मुंबईला असतो. आई-वडील गावी असतात. आला की बाळूला भेटायला हमखास येतो आणि मला हाक मारल्याशिवाय पुढे जात नाही." निशा त्याचे कौतुक ऐकून मनोमनी सुखावत होती.
ती अंथरुणात आली पण झोपच येईना. त्याच्या सोबतच्या क्षणानी तिच्या मनात पिंगा घातला होता. सकाळ कधी होते आणि त्याची भेट कधी होते यासाठी तिचं मन अधीर झाले होते. शेवटी त्याच्यासोबत ची स्वप्न रंगवत ती झोपली. मनातल्या मनात लाल परीचे आभार मानायला ती विसरली नाही.

