Revati Shinde

Horror

2  

Revati Shinde

Horror

गिरा

गिरा

1 min
113


"चला रे पोहायला जाऊ" श्याम उड्या मारीत म्हणाला. "आता या भर दुपारी,नदीवर" "नको रे बुवा.आम्ही नाही येत. तुही नको जाऊस." तुझा मामा रागवेल ."नाही रागवत .मी जाणार . मी तुमच्या सारखा डरपोक नाही." श्याम नदीकडे जात म्हणाला.

त्याने नदीत उडी मारली आणि पोहायला सुरुवात केली.काही काळ गेला.त्याचे लक्ष नदीच्या पलिकडच्या तिरावर गेले.एक अनोळखी माणूस त्याच्याकडे पाहून हसत होता.तोही हसला.त्याला त्याचा फेटा खूप आवडला.तो परत पोहायला लागला.त्याचे परत त्या माणसा कडे लक्ष गेले. आता त्याच्या फेट्या चा रंग बदलत होता.श्याम त्याच्याकडे पाहतच राहिला. आता मात्र त्याला घाम फुटला. तो पाण्या तून बाहेर आला आणि पळत सुटला.

वाटेत त्याला एक आजोबा भेटले."अरे काय झाल पळायला.""मी नदीवर फेटे बदलणारा माणूस बघितला.""काय.""अरे,माणूस नाय,गिरा हाय तो.तू नशीबवान ,वाचलास.जा घरी जाऊन गूमान झोप आणि या वक्ताला कधी येऊ नकोस इथ,काय."नाही येणार"तो कानाला हात लावत म्हणाला.

तो वृध्ह नदीवर आला आणि त्याने हसतच नदीत उडी घेतली आणि यावेळीही फेटा बदलायला तो विसरला नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror