Revati Shinde

Classics

3  

Revati Shinde

Classics

शिक्षक

शिक्षक

1 min
249


ईश्वर आणि आई- वडिलांनंतर आपल्या आयुष्यात ज्यांना सन्मानाचे स्थान आहे ते म्हणजे आपले शिक्षक. दिवसातील ठराविक वेळ आपण शिक्षकांच्या सानिध्यात असतो. आपले पालक आपल्याला त्यांच्याच विश्वासावर शाळेत सोडतात. शिक्षकांमुळे आपल्याला शाळेत कधीही एकाकीपणा जाणवत नाही.

 शिक्षक आपल्यावर योग्य संस्कार करतात. चुकले तर शिक्षा करतात पण आपल्या चांगल्यासाठी. आपल्याला ते ज्ञान देतात, योग्य मार्ग दाखवतात. आपला सर्वांगीण विकास करतात. आपले व्यक्तिमत्व खुलवतात.आपल्या विचारांना चालना देतात. आपल्या आयुष्यात योग्य बदल घडवतात,योग्य दिशा देतात,दिपस्तंभा सारखे. 

त्यांच्यामुळेच आपले आयुष्य घडते. देश घडतो. ते आपल्या आयुष्यात पालक, गुरु, मार्गदर्शक, मित्र, हितचिंतक अशा कितीतरी भूमिका घडवतात .आपल्या शिक्षकांचे आपण नेहमी स्मरण ठेवावे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालावे. त्यांचे उपकार कधीच विसरू नयेत .त्यांचे ऋण न फेडण्यासारखे आहे. शक्य असेल तेव्हा त्यांची भेट घ्यावी. त्यांचे आभार मानावेत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics