Jyoti gosavi

Abstract

4.0  

Jyoti gosavi

Abstract

सारे काही लाल लाल

सारे काही लाल लाल

1 min
222


आज मंगळवार नवरात्रीतील आजचा रंग लाल 


लाल टांगा घेऊन आला

 लाला टांगेवाला

 त्याचा चाबूक लाले लाल 

 त्याचा घोडा लालेलाल

 त्याची विजार लालेलाल

 त्याची टोपी लाल लाल


अशी लहानपणापासून लाल रंगाची ओळख, 

नंतर शाळेत वेण्यांना लावलेल्या लाल लाल रिबिनी, 

मी तर किती दिवस म्हणत होते 

 लाल साडी घातलेली बाई 

ती माझी आई

असा तो आवडता लाल रंग

अशा त्या लाल रंगाची महती आता पाहूया. 


"लाल रंग तो रक्ताचा

 तसा इंग्रजी राज्याचा "


अशी पूर्वी घोषणा होती, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. म्हणजे इंग्रजांनी आपल्या लोकांचे इतके रक्त सांडलेले होते. असो आता लाल रंग फक्त तेवढ्यासाठीच नसतो, 

तो ऊर्जेचा रंग देखील आहे, अहो प्रेमात द्यायचा गुलाब देखील लाल रंगाचा असतो. प्रेमाचे सिम्बॉल म्हणून दाखवलं जाणार ह्रदय लाल रंगाचं असतं. 

रक्तदान केल्यावर कोणाचातरी जीव वाचवणार रक्त लाल रंगाच असत. 


अहो ऊर्जेचा रंग लाल  

प्रेमाचा रंग लाल 

 रागाचा रंग देखील लाल असतो

 सुंदर तरुणीच्या ओठांचा रंग लाल

 लज्जेने होतात तिचे गाल लाल लाल

रस्त्यावरचे सिग्नल लाल 

 .ते असतात म्हणूनच एक्सीडेंट टळतात. 


कुठे धोका दाखवायचा असेल तरी, लाल रंग वापरला जातो .एक फुली दोन हाडे आणि कवटी हे धोक्याचे सिम्बॉल लाल रंगात रंगवले जातात. 


उन्हाळ्यात फुललेला पळस लाल, 

गणपतीला वाहतो ती जास्वंदी लाल. 

शिवाय रागाने तुझा गाल लाल करू का? 

तुझा कान लाल करू का? किंवा चांगलाच त्याचा गाल लाल केला असेही म्हंटले जाते. 

असेही लाल रंगाचे अनेक सिम्बॉल आहेत


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract