STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Abstract Tragedy

2  

Mrs. Mangla Borkar

Abstract Tragedy

रंगपंचमी (रंग बरसे)

रंगपंचमी (रंग बरसे)

1 min
158

रंगपंचमी हा एक सण आहे. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला हा रंगपंचमी सण साजरा केला जाते. धुलिवंदना-पासून सुरु होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पांच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आणि रंगांची बारिश एकमेकांच्या अंगावर करून आनंदोत्सव साजरा केला जातो 


द्वापरयुगात गोकुळात/ कृष्ण आपल्या गोपाळ सावंगडयांवर पिचकारिने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे. मध्य युगात संस्थानिक राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत.


रंगपंचमी हा वसंत ऋतुशी संबंधित महत्वाचा सण आहे. उन्हाळयाच्या सुरुवातीला हा सण साजरा जातो उन्हाचा तडाखा कमी व्हावा थंडावा मिळावा या साठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची रीत आहे. संपूर्ण भारतामध्ये रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.


देशाच्या काही भागात या लोकप्रिय सणाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्व आहे.  वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते या दिवशी होळीची संबंधित लोकगीते गायली जातात. ब्रज प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेत असत असे मानले जात असल्याने उतरप्रदेशात होळीचा आनंद घेण्याला धार्मिक महत्व आहे.


रासायनिक रंगाचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाण ही अलीकडील काळात वाढलेले दिसून येते या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आंनद अनुभवतात. फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ, बिट अशा नैसर्गिक पदार्थ पासून रंग तैयार केले जातात.

             ********


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract