कोण आहे मी ..
कोण आहे मी ..
कोण आहे मी .... एक शोध स्वतःचा
मी स्वतः cmpdi ऑफिस मध्ये कार्यलय अध्यक्ष आहे, मला लेख लिखाणाची आणि कॉम्पुटर आणि मोबाईल
मध्ये टायपिंग करण्याची आवड आहे.
आयुष्य सुखात जगायच असेल तर, स्वत:वर प्रेम करायला शिका. आपण दुसऱ्यांवर प्रेम करण्यात आयुष्य घालवतो.
इतरांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी राहतो. कधी विचार केला आहे? यात आपण किती आपल्यासाठी जगतो?
स्वतःला तुम्ही देखील समजून घ्या: आपल्याला वाटते कोणीच आपल्याला समजून घेत नाही.. पण आपण स्वतः तरी स्वतःला कुठे समजून घेतो..??
खरे तर आपण स्वतःला जाणून घेतले तर स्वतः मधील गुणांमुळे स्वतःचा आदर करायला लागू.. दुर्गुण सगळ्यांमध्ये असतात पण स्वतःतले गुण जरी दुसऱ्यांना दिसत नसतील तरी आपल्या स्वतःला नक्कीच माहीत असतात.
त्या कला गुणांना वाव द्या.. स्वतःला वेळ द्या.. तुम्हाला कोणाबद्दल, कोणत्या कामाबद्दल, कोणत्या व्यक्ती बद्दल काय वाटते हे जाणून घ्या.. स्वतःशी बोला..
मनाचे विचार वरील सेल्फ डेव्हलपमेंट बद्दलचे लेख तुम्हाला स्वतःची ओळख करून घ्यायला नक्कीच मदत करतील.
जर माणूस स्वतःवर प्रेम करू लागला तर त्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहायची गरज वाटत नाही. स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी जरूर करा..
1. स्वतःचा आनंद स्वतःच्या कह्यात ठेवा:
अगदी सरळ साधं गणित आहे.. कोणी आनंद दिला म्हणून तुम्ही आनंदी झाला.. अस नाही. स्वतःचा अंतर्मनात असते त्याच्यात असलेला अगाध शक्तिमध्ये असते. या अंतर्मनाशी तुमचा संवाद सुरळीतपणे सुरु झाला, कि आनंद, हास्य, समाधान या तितक्याशा अवघड गोष्टी राहत नाहीत.
आयुष्य सुंदर आहे, आनंद आपल्या अवती भवतीच असतो अशी वाक्ये आपण अनेकदा ऐकतो पण आनंद खरेतर आपल्या मध्येच आहे. त्याला वाट करून देणे, त्याला दिशा देणे, हे आपले काम आहे. मग रुटीन ही मजेदार वाटू शकतो आणि रोजचे आयुष्य आनंददायी होऊ शकते. गरज आहे ती स्वयंस्फूर्ती शोधण्याची, आपला आतला आवाज शोधण्याची, परस्पर संवाद साधण्याची. आनंदाच्या रेसिपीचे हे सगळे घटक आहेत. संमोहन केवळ एक माध्यम, एक धागा आहे, जि या सगळया घटकांना एकजीव करते.
