STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Fantasy Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Fantasy Inspirational

शिवा आणि विष्णू

शिवा आणि विष्णू

3 mins
170

बद्रीनाथ विषयी एक दंतकथा आहे. इथे शिव आणि पार्वती राहिले होते. हे हिमालयात सुमारे १०,००० फूट उंचीवर एक भव्य ठिकाण आहे. एके दिवशी, नारदमुनी विष्णूकडे गेले आणि म्हणाले, “तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात. पूर्ण वेळ तुम्ही फक्त आदिशेषावर पडलेले असता, आणि तुमची पत्नी, लक्ष्मी, ती तुमची सतत सेवा करत असते आणि ती देखील गरजेपेक्षा जास्त. तुम्ही पृथ्वीवरील इतर जीवांसाठी आदर्श उदाहरण नाही आहात. जीवसृष्टीतील इतर जीवांसाठी तुम्ही काहीतरी उपयुक्त केले पाहिजे.”


ह्या टीकेतून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी, विष्णू खाली हिमालयात आले आणि त्यांची साधना करण्यासाठी योग्य जागा शोधू लागले. त्यांना बद्रीनाथ सापडले, एक सुंदर असे घर, ज्यात सर्व काही होते, त्यांना हवे होते तसेच- त्यांची साधना करण्यासाठी उत्तम जागा.


त्यांना तिथे घर सापडले आणि ते दार उघडून आत गेले. पण नंतर त्यांना कळाले की, हे तर शिवाचे निवासस्थान आहे – आणि तो माणूस भयंकर आहे. जर त्यांना राग आला, तर तो अशाप्रकारचा आहे की तो तुमच्यासोबत स्वतःचा देखील गळा कापून टाकेल . खूपच भंयकर माणूस.


तर, विष्णूने एका लहान मुलाचे रूप घेतले आणि घरासमोर बसला. शिव आणि पार्वती, जे फिरायला गेले होते, घरी परत आले. जेव्हा ते परत आले, तेव्हा त्यांच्या घरासमोर एक लहान बाळ रडत होते. ह्या लहान मुलाला इतके रडताना पाहून पार्वतीची ममता जागी झाली आणि त्या मुलाजवळ जाऊन त्याला जवळ घ्यावे असे तिला वाटत होते. शिवाने तिला अडवले आणि म्हणाले, “त्या मुलाला हात लावू नकोस.” त्यावर पार्वतीने प्रत्युत्तर दिले, “किती कठोर आहात तुम्ही. तुम्ही असे कसे म्हणू शकता?”


शिवा म्हणाले, “हे चांगले मूल नाही. ते आपल्या दारी स्वतः हून कसे आले? आजूबाजूला कोणीच नाही, बर्फामध्ये त्याच्या आई वडिलांच्या पायांचे ठसे नाहीत. हे मूल नाही” पण पार्वती म्हणाली, “ते काही नाही ! माझ्यातली आई ह्या मुलाला असे सोडू शकत नाही.” आणि ती मुलाला घरात घेऊन गेली . ते मूल तिच्या मांडीवर बसून खूप आनंदी होते , शिवाकडे आनंदाने पाहत होते. शिवाला याचे परिणाम माहित होते पण तो म्हणाला, “पाहूया काय होते ते.”


पार्वतीने मुलाचे सांत्वन केले आणि त्याला खाऊ घातले, त्याला घरात सोडले आणि शिवासोबत जवळच्या गरम पाण्याच्या झऱ्यावर अंघोळीला गेली. जेव्हा ते परत आले, तेव्हा त्यांना दार आतून बंद दिसले. पार्वती हैराण झाली, “दरवाजा कोणी बंद केला?” शिव म्हणाला, “मी तुला सांगितले होते, मुलाला उचलू नकोस. तू मुलाला घरात घेऊन आलीस आणि आता त्याने दार बंद करून घेतले.”


पार्वती म्हणाली, “आता आपण काय करायचे?”


शिवाकडे दोन पर्याय होते : एक म्हणजे त्याच्या समोरील सर्व काही जाळून टाकायचे. दुसरा म्हणजे दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे. तर तो म्हणाले, “चल दुसरीकडे कुठेतरी जाऊ. कारण हे तुझे प्रिय मूल आहे, मी त्याला हात लावू शकत नाही.”


अशा प्रकारे शिवाने स्वतःचे घर गमावले आणि शिव आणि पार्वती स्वतःच्याच देशात परदेशी बनले! ते आजूबाजूच्या परिसरात फिरले, राहण्यासाठी आदर्श जागेच्या शोधत आणि शेवटी केदारनाथमध्ये स्थायिक झाले. तुम्ही विचाराल त्याला हे माहित नव्हते का. तुम्हाला खूप गोष्टी माहिती असतात पण तरीही तुम्ही त्या होऊ देता.          


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy