Mrs. Mangla Borkar

Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Inspirational

पांडुरंग सदाशीव साने

पांडुरंग सदाशीव साने

4 mins
413


खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” अशा या गीताने संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची तसेच स्वावलंबनाचे धडे दिलेत अशा गीताचे गीतकार पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी. त्यांना भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून संबोधले जाते. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. ते कवी होते, त्यांच्या कवितांचा प्रभाव लोकांमध्ये इतका वाढला कि, ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी घालून जप्ती केली. तर चला मग पाहुया साने गुरुजी विषयी माहिती.


जन्म

साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर, 1989 रोजी कोकण रत्नागिरीतील पालगड या गावी झाला. तेथे खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जात होते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती. पण त्यांच्या वडिलांच्या सदाशिवराव यांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने तर आईचे नाव यशोदाबाई साने असे होते. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बाल मनावर जे विविध संस्कार केले, त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला.

 

बालपण

साने गुरुजींचे बालपण हे तसे चांगले गेले, परंतु नंतर त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली, ज्यामुळे त्यांचे घर सरकारी अधिकाऱ्यांनी जप्त केले. हा मानसिक त्रास सहन न झाल्याने 1917 मध्ये साने गुरुजींची आई यशोदाबाई यांचे निधन झाले. वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे गुरुजींच्या आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूच्या वेळी तिची भेट न झाल्याचे दुःख साने गुरुजींना आयुष्यभर राहिले.


शिक्षण

साने गुरुजींचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड या गावी झाले. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्यामध्ये मामाकडे पाठवण्यात आले. त्यांना पुण्यात राहणे आवडले नाही. ते पालगडला परत आले आणि दापोली येथील मिशनरी शाळेत प्रवेश घेतला. गुरुजी हे अत्यंत हुशार विद्यार्थी होते, दापोली मध्ये शिक्षण घेताना त्यांनी मराठी व संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले. साने गुरुजी यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. उच्च पदवी मिळवली होती. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्ष नोकरी केली. तो काळ 1924 ते 1930 चा होता प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील जबाबदारी सांभाळली तसेच तेथील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले. सेवावृत्ती शिकवली तसेच त्यांनी तिथे तत्वज्ञान केंद्र असलेल्या ठिकाणी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.


कार्य

साने गुरुजी यांनी 1928 साली ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत.1930 आणि त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून संविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी 1936 मध्ये काम केले. 1942 चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार त्यांनी केला. तसेच फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीचा अनुसरून त्यांनी ‘मैला वाहने’ व ‘ग्राम स्वच्छतेची’ इतर कामे ही हाती घेतली. साने गुरुजी यांच्या ‘पत्री’ या पहिल्या काव्यसंग्रहातून देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यातील ‘बलसागर भारत होवो’ सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन, ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या होत्या.


राष्ट्र सेवा दल स्थापना

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिरात प्रवेश मिळावा. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तो शेवटपर्यंत मिळाला नाही, शेवटी साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असे त्या वेळी म्हटले जात असे.


स्वतंत्र लढ्यातील योगदान

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. 1930 मध्ये महात्मा गांधींनी दांडी मार्च सुरू केल्यानंतर साने गुरुजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील होण्यासाठी शाळेतील नोकरीचा राजीनामा दिला. नागरी अवज्ञा चळवळीत सहभाग घेतल्याबद्दल ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना धुळे कारागृहात पंधरा महिने ठेवले. 1932 मध्ये साने गुरुजी आणि विनोबा भावे एकाच तुरुंगात होते. विनोबा भावे प्रत्येक रविवारी सकाळी भगवद्गीतेवर व्याख्यान देत असत. 1930 ते 1947 दरम्यान गुरुजींनी वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेतला. यासाठी त्यांना आठ वेळा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांना धुळे, नाशिक, त्रिचिनापल्ली, येरवडा आणि जळगाव येथील तुरूंगात एकूण सहा वर्षे सात महिने तुरुंगवास भोगावा लागला. या काळात त्यांनी सात वेगवेगळ्या प्रसंगी उपोषण सुद्धा केले. साने गुरुजी त्रिचन्नापल्ली तुरुंगात दुसऱ्या वेळी असताना त्यांनी तमिळ व बंगाली भाषा शिकली.


ग्रामीण महाराष्ट्रात, विशेतः खानदेशात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस साठी गुरुजींनी महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेसच्या फैजपूर सत्राच्या संघटनेत त्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला. तसेच 1936 च्या बॉम्बे प्रांताच्या निवडणुकीत त्यांनी भाग घेतला. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना पंधरा महिने तुरुंगवास झाला. या काळातच मधु लिमये यांसारख्या काँग्रेसच्या समाजवाद्यांची त्यांचे जवळचे नाते जोडले गेले.

                


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational