श्रावणी सोमवार
श्रावणी सोमवार
शंकर देवासाठी श्रवण महिना हा अत्यंत प्रिय होता. तसेच शिवभाक्तासाठी हा महिना विशेष आहे. श्रावण हा हिंदू धर्मातील मराठी महिन्यातील पाचवा महिना आहे.
तसेच हा महिना निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व आतिशय वेगवेगळे आहे परंतु यातील महत्वाचे व्रत म्हणजे ते श्रावण सोमवार होय.
या श्रावणी सोमवारला हिंदू धर्मातील प्रत्येक महिला उपवास करतात तसेच या दिवशी श्री शंकर भगवानाची पूजा सुद्धा केली जाते या व्रताबदल अशी मान्यता आहे कि हे व्रत केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे.
पहिल्या सोमवारी तांदूळ तर दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी जवस आणि पाचवा आणि शेवटचा सोमवार असल्यास शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे.
शास्त्रानुसार श्रावण महिन्यात शंकराची पूजा केली जाते. पूजा करून महामृत्यंजय मंत्र, शिव पुराणाचे पाठ, रुद्राभिषेक केलाने कर्ज, आरोग्य दोष आणि इतर अडचणी पासून मुक्ती मिळते.
तसेच आपल्या घर मध्ये सुख शांती मिळते. श्रावणातील मंगळवार म्हणजे पहिल्या सोमवर नंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी मंगळगौरीचे देखील सुधा एक वेगळेच महत्व आहे.
अनेक पवित्र कारणामुळे नागाची देवता म्हणून सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी शंकराचे आणि नागाचे एक विश
ेष नाते आहे या दिवशी नागपंचमीच्या दिवशी शंकराला कच्चे दुध गंगाजल बेलपत्र काळे तीळ, धोत्रा, अर्पण करून विधिवत पूजा केली जाते.
भगवान शंकराला श्रावण महिना प्रिय असण्याचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे ताप केले होते. असे सांगितले जाते कि श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपुजनात जलाभिषेक रुद्रभिषेकाला विशेष महत्व असते.
श्रावण सोमवारच्या दिवशी शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने शिवाला केवळ एक बेलाचे पान जरी अर्पण केले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते आसे सांगितले जाते.
देवी सतीने तिचे पिता दक्षता घरी शरीराचा त्याग केला होता. त्या आधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळण्यासाठी प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसर्या जन्मात पार्वती आसे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मेन यांच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला.
पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला.
श्रावण सोमवारच्या महादेवाचे व्रत करून प्रसन्न केल्याची अनेक कथा आपण वाचल्या असतील म्हणूनच श्रावणातील प्रत्येक सोमवारी पूर्ण दिवस भर उपवास करावा असे सांगितले जाते. आणि तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा.