STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Inspirational

रक्षाबंधनाचे सुंदर नियम

रक्षाबंधनाचे सुंदर नियम

2 mins
205

श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा हा सण आहे. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. शास्त्रनुसार पुरुषाच्या उजव्या हाताच्या मनगटावर सुर्यनाडी व स्त्रीच्या डाव्या हाताच्या मनगटावर चंद्रनाडी असते या सोबत मनगटावर असणाऱ्या तीन मानिबंध कंकन रेखा ही असतात या रेखा शास्त्रनुसार पुरूषाला १२० वर्षे व स्त्रीला १०८ वर्ष आयुष्य असते हे आयुष्य वाढावे व रक्षणासाठी होण्यासाठी हे रक्षाबंधन करतात. रक्षाबंधनाचा सण वास्तू नुसार कसा साजरा करावा हे जाणून घेऊया.


देवघरासमोर करावे रक्षाबंधन


दाराचा उंबरा हे पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक लहरी ग्रहण करण्याचे आणि त्या पुन्हा पाताळात संक्रमित करण्याचे उत्तम माध्यम आहे. दाराच्या चौकटीमध्ये या त्रासदायक लहरी घनीभूत झालेल्या असतात. दारात उभे राहिल्याने या रजतमात्मक लहरींनी भारित क्षेत्राचा जिवाला त्रास होतो. जिवाभोवती या त्रासदायक लहरींचा कोश निर्माण होतो. याचा जिवाच्या मनोमयकोशावर परिणाम होऊन तेथील रजतम कणांचे प्राबल्य वाढल्याने जीव चिडचिडा बनतो. या कारणास्तव दारात औक्षण करणे, हे हिंदु धर्माला संमत नाही. दारात औक्षण करण्यापेक्षा दाराच्या आतल्या भागात, म्हणजेच वास्तूत, शक्यतो देवघरासमोर औक्षण करावे. देवघरासमोर रांगोळीचे स्वस्तिक काढून त्यावर पाट मांडून मगच औक्षण करावे. असे केल्याने देवतेचे आशीर्वादरूपी बळ मिळण्यास साहाय्य होते.


भावाला राखी बांधतांना योग्य दिशेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. जर बहिण भावाला राखी बांधत असेल तर बहिणीने पश्चिम दिशेला तोंड करून राखी बांधावी. म्हणजेच भावाला पूर्व दिशेने चेहरा करून बसवावं. इतर दिशेला चेहरा करून राखी बांधल्यास नकारात्मक प्रभाव पडतो.


राखी बांधतांना भावाला लाकडी पाटावर बसवावे आणि बहिणीने चटईवर बसून राखी बांधावी. वास्तू नुसार तीच राखी बांधावी जी नैसर्गिक पद्धतिने बनवली गेली असेल.


वास्तू नुसार लाल, पिवळी आणि नारंगी रंगाची राखी बांधणे शुभ ठरते. नीळा, जांभळा, काळा आणि मरून रंगाची राखी बांधू नये असे सांगितले जाते.


राखी बांधत असतांना आपल्या घराच्या खिडक्या उघड्या कराव्या यामुळे सकारात्मक ऊर्जेचा घरात संचार होईल आणि आरोग्यदायी वातावरण बनून राहील.


भावाने बहिणीला धारदार, टोकदार, तीक्ष्ण धातू असलेल्या वस्तू भेट म्हणून देऊ नये.


 भेट देण्याऱ्या वस्तू  :


वास्तुशास्त्रानुसार सात घोड्यांचे चित्र भेट देणे खूप शुभ मानले जाते. सात घोडे हे सूर्याचे प्रतीक मानले जाते. असे चित्र घरात ठेवल्याने उत्पन्नाचे स्रोत वाढू लागतात आणि घरात सुख-समृद्धीही वास करते.


चांदी-सोने हे ज्योतिष आणि वास्तू या दोन्हीमध्ये खूप शुभ मानले जाते, त्यामुळे जर तुम्ही चांदी किंवा सोन्यापासून बनलेली एखादी वस्तू बहिणीला किंवा मावशीला अर्पण केली तर त्यांच्या समृद्धीसोबतच आरोग्यालाही फायदा होतो.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational