STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Inspirational

2  

Mrs. Mangla Borkar

Inspirational

चित्रपटाच्या कथा

चित्रपटाच्या कथा

1 min
78

आलियासोबत शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांसारख्या सुप्रसिद्ध कलाकारांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे आलियानेच डार्लिंग्स या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीजसोबत मिळून तिने या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. 


डार्लिंग्समध्ये महिलांच्या छळाची कहाणी

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, भारतीय समाजातील महिलांवरील अत्याचाराचं चित्रण यात केलं आहे. चित्रपटाची कथा मुंबई परिसरात घडते. यामध्ये एक जुना मुस्लिमबहुल भाग दाखवण्यात आला आहे, जिथे प्रियकर आणि प्रेयसी लग्न करतात. प्रियकराला लग्नाआधी रेल्वेच्या तिकिट विभागात नोकरी लागते. लग्नानंतर मात्र तो पत्नीचा छळ करू लागतो, तिला त्रास देतो आणि त्याची पत्नी हे सर्व मूकपणे सहन करते. या कथेत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा मुलगी तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवते. ती कोणत्याही कायद्याचा आधार घेत नाही. तर स्वतःहून सूड घेते. त्याचवेळी दुसऱ्या व्यक्तीची यात एण्ट्री होते आणि मुलीच्या आईचा भूतकाळही सर्वांसमोर येतो.


आलिया म्हणजे दमदार अभिनय हे जणू आता समीकरण बनलं आहे. राजेश वर्मानेही उत्तम काम केलं आहे. चित्रपटात शेफाली शाहने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. दिल्ली क्राइम आणि जलसा नंतर ती पुन्हा एकदा स्वत:चं दमदार अभिनयकौशल्य सिद्ध करण्यात यशस्वी झाली आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational