रमाकाकू
रमाकाकू


नाव वाचल्यावर आश्चर्य वाटेल कोरोना लॉकडाऊनसंदर्भात लेखन करायचे आणि असे नाव. पण आज ही गोष्ट सांगाविशी वाटतेय. आईच्या प्रेमाची - रमाकाकू आमच्या शेजारी असणाऱ्या सोसायटीमध्ये रहातात. मुलगा ट्रक ड्रायव्हर. फळे घेवून तो रायपूरला गेला आणि तिथेच लॉकडाऊनमुळे अडकला. त्याचा नाईलाज झाला. इकडं आईच्या जीवाची घालमेल झाली पण ती काही करु शकत नव्हती. मोबाईलवर दररोज लेकाशी ती बोलायची. बातम्या ऐकून-वाचून ती घाबरत होती आणि तो सोन्याचा दिवस उजाडला तिचा सोन्या म्हणजे मुलगा सुखरूप घरी आला. तिला आनंद झाला तो अवर्णनीय होता.