Yogesh Khalkar

Classics

3  

Yogesh Khalkar

Classics

प्रवासातील मदतगार

प्रवासातील मदतगार

2 mins
144


प्रवासाचा अनुभव हा काहीसा सुखद तर काही त्रासामुळे नकोसा वाटणारा असतो. त्यातही एस. टी. बसने प्रवास करायचा म्हटला की, काहींना कंटाळा येतो. बसचा खडखडाट, अस्वच्छता, वेळ न पाळणे तसेच रस्त्यांची स्थिती यामुळे एस. टी. बसने प्रवास करायचा म्हटलं की, मन लगेच तयार होत नाही. अशा या रुक्ष मानसिक परिस्थितीत एक अविस्मरणीय अनुभूती मिळाली ती एका एस. टी. बसच्या प्रवासात.

एकदा नीटच्या परीक्षेला मित्राला घेवून नाशिकहून बोरीवलीला जायचे होते. सकाळी 11 वाजता पेपर होता. पेपरच्या वेळे अगोदर 1 तास परीक्षा हॉलवर उपस्थित राहायचे होते यामुळे मी आणि मित्राने आदल्या दिवशी संध्याकाळीच बोरीवलीला जायचे आणि नातेवाईकांकडे रहायचे ठरवले. मित्र मुंबईनाका परिसरात रहात होता, त्याने मला महामार्ग बस स्थानकावरून बसने बोरीवलीला जाऊ असे सांगितले. आम्ही संध्याकाळी ६ वाजता महामार्ग बस स्थानकावर पोहचलो. बसची वेळ संध्याकाळी ६:३० वाजता होती. वेळेवर बस आली आणि आमचा प्रवास सुरु झाला.

सिडको ओलांडल्यावर बसवाहक आमच्याजवळ आला आणि मी दोघांचे तिकीट काढले आणि वाहकास १००० रुपये दिले. नेहमीप्रमाणे वाहकाजवळ सुट्टे पैसे नव्हते, त्यांनी नंतर सुट्टे झाल्यावर पैसे असे सांगितले त्यानंतर त्यांना सुट्टे पैसे मिळाले नाही त्यामुळे त्यांनी तिकिटाच्यामागे २३० रुपये देणे बाकी असे लिहून दिले.

उतरताना सुट्टे पैसे परत घेणे माझ्या काही लक्षात राहिले नाही. मी आणि मित्र नातेवाईकांडे गेल्यावर ही गोष्ट लक्षात आली. पण ईलाज नव्हता मी तिकीट जपून ठेवून दुसऱ्या दिवशी चौकशी करायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी मित्राची परीक्षा संपल्यावर नाशिकला परत येण्यासाठी बोरिवली बस स्थानकावर आलो आणि आदल्या दिवशीच्या पैशांची चौकशी करण्यासाठी बसस्थानक प्रमुखांकडे गेलो. स्थानक प्रमुखांनी चौकशी करून सांगितले सदर गाडी नाशिक डेपोची होती त्यामुळे पैसे नाशिक डेपोत जमा झालेत तुम्हांला नाशिकला पैसे परत मिळतील.

त्यानंतर आम्ही नाशिकला परत आलो. नाशिकच्या आगार प्रमुखांना आम्ही भेटलो त्यांनी तिकीट पाहिले सदर वाहकाकडून खात्री करून घेतली आणि मला तत्काळ पैसे दिले. अशाप्रकारे अनवधानाने एस. टी. बसच्या प्रवासात वाहकाकडे राहिलेले पैसे परत मिळणे ही माझ्यासाठी अविस्मरणीय भेटच आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics