STORYMIRROR

Yogesh Khalkar

Children Stories Classics Inspirational

4  

Yogesh Khalkar

Children Stories Classics Inspirational

निस्वार्थी आत्मीयता

निस्वार्थी आत्मीयता

2 mins
398


आज शाळेत काम करण्यात गुंग झालो असताना इयत्ता चौथीची पलक नावाची विद्यार्थीनी  आली.तिच्या बरोबर एक छोटी पाहुणी होती. जरा निरखून पाहिल्यावर लक्षात आले की हि पाहुणी म्हणजे खारुताईचे एक पिल्लू आहे. खारुताई चपळ होती आणि एका ठिकाणी शांत बसत नव्हती. हे पिल्लू तुझ्याकडे कसे आले ? असे विचाल्यावर जरा वेगळी माहिती मिळाली.

 

पलकच्या घरासमोर एक मोठ झाड आहे. त्या झाडावर खारुताई रहात होती. त्या खारुताईची आई पिल्लाला खायला द्यायची. एके दिवशी दुपारी खारुताई पिल्लाला अन्न आणण्यासाठी बाहेर पडली पण एक मोटारसायकलच्या चाकाखाली आली आणि तिचा मृत्यू झाला.

 

पिल्लू आपल्या आईची वाट पहात होते पण त्याची आई आली नाही. त्याला जेवायला मिळाले नाही. शेवटी ते खाली उतरले आणि आवाज करू लागले. तेथे पलक खेळत होती. तिने त्या पिल्लाचा आवाज ऐकला. ती धावत तेथे गेली. तिला पिल्लाची द्या आली. ती पिल्लाला घेवून घरी आली.

 

पलकची आई पिल्लू पाहून विचारू लागली, ‘’हे पिल्लू तुला कोठे सापडले? ‘’ पलकने सारे सांगितले, ते पिल्लू भुकेले आहे हे लक्षात आल्यावर पलकच्या आईने त्याला दूध देण्याचे ठरवले आणि लहान मुलाना औषध देण्

यासाठी जसा चमच्याचा उपयोग करतात तसा चमचा वापरून दुध दिले. पिल्लाने दुध घेतले. ते उड्या मारू लागले.



पलकला पिल्लू आवडले होते. तिने आईजवळ ते पिल्लू घरी ठेवण्याचा हट्ट केला. आईने त्याला मान्यता दिली. तसे ते पिल्लू आठवडाभरापासून पलककडे रहात आहे. पलक जेथे जाईल तेथे ते तिच्याबरोबर येते. पलकला आता त्याचा लळा लागला आहे.



खरोखर एका अनाथ झालेल्या खारुताईच्या पिल्लाला घरी घेवून जाणे, त्याला खाऊ पिऊ घालणे आणि त्याचा व्यवस्थित सांभाळ करणे केवढे जिकरीचे काम आहे, पण पलक तिच्या आईच्या मदतीने हे काम आनंदाने करत आहे. लहान वयात असणारी पलकची आत्मीयता खूप मोठी आहे. मानव आणि पशू – पक्षी यात अतूट नाते आहे. हे नाते टिकवण्यासाठी प्रयत्न केलेल्या चिमुरड्या पलकला काय म्हणावे? तिची मुक्या पशु पक्ष्याबद्दल असणारी निस्वार्थी आत्मीयता लक्षात ठेवण्यासारखी आहे.

                          

                 योगेश खालकर


पंचवटी – नाशिक 



Rate this content
Log in