Vilas Yadavrao kaklij

Abstract Drama Action

2  

Vilas Yadavrao kaklij

Abstract Drama Action

पुस्तक

पुस्तक

7 mins
212


पुष्कळ वेळ असल्यामुळे राजू एका निवांत जागी एक बॅग भरून गेला होता. जीवनामध्ये असंख्य प्रकारचे अनुभव घेतल्यामुळे आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये अतिशय कंटाळा आल्याप्रमाणे आयुष्य झाले होते. मना मध्ये आलेले नैराश्य. त्यामुळे मन सतत उदास होत असे कोणत्याही गोष्टीमध्ये मन रमत नव्हते . तेंव्हा तो निवांत निसर्गरम्य ठिकाणी बदल घडून येईल किंवा मन शांती मिळेल यासाठी तो तेथे पोहोचला होता. मात्र मनातली उदासी काही जात नव्हती . तेंव्हा त्याने बॅगेतले सारे समान बाहेर काढले . पाण्याची बॉटल आणि काही खाण्याच्या वस्तू पण खाण्या कडे त्याचे लक्ष लागत नव्हते. तेव्हा मनामध्ये विचार करीत बसला असता . समोर असलेल्या पसारामध्ये त्याची नजर गेली . त्यावर मुखपृष्ठावर विशिष्ट प्रकारचे चित्र होते .व त्या चित्राखाली नाव होते " अंधारा कडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग ". मग! मी त्या मुखपृष्टा कडे बघून निरीक्षण करू लागलो. आणि मुखपृष्ठ शी संवाद साधत असतानाच. मनामध्ये मुखपृष्ठाच्या आत असणारे दडलेले विचार . त्या पुस्तकाशी माझा संवाद सुरू झाला . जीवनामध्ये मी एवढे प्रत्यक्ष अनुभव घेतले होते . इतक्या पदव्या मिळवल्या होत्या . माझ्या मनामध्ये . माझ्या डोक्यामध्ये मी हुशार आहे गृहीत धरून मी स्वतःला एक पूर्ण विकसित बुद्धीचा स्वतःला समजत होतो . व मला स्वतःला प्रत्यक्ष जीवनामध्ये उघड्या डोळ्यांनी व स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाशामध्ये मार्ग सापडत नाही . तेंव्हा या चार अक्षरांमध्ये किंवा एका निर्जीव कागदामध्ये असलेली माहिती? वाचून खरेच का? मला ज्ञान मिळेल. अंधाराकडून प्रकाशाकडे! याला मार्ग सापडेल? तेंव्हा ते पुस्तक माझ्याशी बोलू लागले . होय राजू, सापडेल की! आज पर्यंत ज्यांना ज्यांना मार्ग सापडला . त्याना प्रत्यक्ष जाऊन भेट . त्यांचे विचार जाणून घे . तेंव्हा तुला कळेल, पोस्टवरील चित्राचा अर्थ . काही शब्दांचे निरीक्षण केलं मनामध्ये विचार चक्र सुरू झाले. तू तर एक बुद्धिवान! उच्च विद्या विभूषित! असल्याने सुद्धा! तुझ्या मनामध्ये चल बिचल सुरू झाली. याचा अर्थ काय होतो? की तू मिळवलेले ज्ञान. परिपूर्ण आहे . तुझे मन चलबिचल इतक होते. कधी विचार केला. तुझे मन आज उदास कशामूळे? तू हया प्रॅक्टीकली जगामध्ये वावरत असताना सुद्धा . तो काही स्वतः उपभोगून प्रत्यक्ष अनुभव घेऊन सुद्धा विचलित का होतो? निराश का झाला! शोधले याचे उत्तर! नाही ना? मग ऐक तु माझी कर्मकहाणी ! असंख्य झाडांचा बळी दिल्यानंतर विशिष्ट प्रक्रियेनंतर माझी पाने तयार होतात. त्या पानांवर विशिष्ट रंगांच्या सहाय्याने शब्द कोरले जातात . आणि असं की शब्दाचा संग्रह झाला . कि पॅरेग्राफ तयार होतो . आणि अशा प्रकारे संग्रह मुद्रित झाल्यानंतर त्यातून तयार होते .. एक प्रकारची कथा . एक अनुभवजन्य अशी व्यथा .ती उतरत असताना कुठेतरी मनामध्ये प्रक्रिया करून ते व दुसऱ्या साठी . ज्ञानाने डोळे च्या साह्याने वाचून मनन करून अनुभवत असतो . तेंव्हा त्याच्या मध्ये असणारे विचार आणि माझे विचार यांचे सुलभ अशी प्रक्रिया होऊन त्याला चालना मिळते . विचार करू लागतो. अरे तू जेंव्हा शाळेमध्ये प्रवेश घेतला सर्वप्रथम तुझ्या हातामध्ये पाटी आणि पेन्सिल देताना अक्षरे गिरवली गेली . त्यासाठी तो पेन्सिल धरण्यासाठी तुला अनेकांचे मार्गदर्शन लाभले . तेंव्हा तू बाराखडी व अक्षरांची फक्त ओळख झाली . अंक आणि अक्षर मिळून तू काही शब्द जानू लागला . जेव्हा त्या शब्दांना व्याकरणाच्या आलंकारिक भाषेने समृद्ध केले . तेंव्हा तुला त्याचा अर्थ कळू लागला. व त्या अर्थाच्या साह्याने तू जे ज्ञान ग्रहण करत गेला. अरे सुरुवातीला फक्त मम्मा विचारणारा व्यक्ती . मग मला मम म्हणू लागला. व अशी विशिष्ट प्रकारचे अर्थ जाणू लागल्यानंतर तू शब्दांची वाक्य तयार करू लागला . त्या वाक्यांचा अर्थ समजू लागला .व ते वाक्य एकत्र केल्यानंतर . तू दुसऱ्याची संवाद साधू लागला . तेंव्हा त्या शब्दांना आणि वाक्यांना अर्थ प्राप्त झाला .तोपर्यंत तुझ्यासाठी वा इतरांसाठी "काळा अक्षर म्हैस बराबर " !असाच होता ना? मग एक विशिष्ट पद्धतीने आकार वाढत जातो . तेव्हा एखादी कथा घरगुती व त्यातून असंख्य विचार प्रक्रिया चालू होऊन ती व्यक्ती सुयोग्य मार्गाने वागू लागते पुढच्यास ठेच मागचा शहाणा! या म्हणीचा अर्थ तुला केंव्हा कळेल जेंव्हा कोणी तुला सांगितले असेल की या रस्त्याने जाताना खड्डा आहे . किंवा दगड पाडले आहेत तेव्हा तू सावधपणे चालतो .व चालताना सावधगिरीची प्रक्रिया करून जातो पण याची कल्पना नसताना जर तू बेफामपणे सुटला तर तुला नक्कीच असणारे अडथळ्यांचा त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मदत होते ती आमची पुस्तकांची ! शाळेत गेल्यानंतर अक्षरे गिरवण्यासाठी वापरली जातात . अंकाच ज्ञान होण्यासाठी लिहिली जातात त्यांना 'अंकलीपी' म्हणतात.व विशिष्ट प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात त्यांना तुम्ही इतिहास म्हणतात. आणि परिस्थितीचा विचार आणि निसर्गातील वैशिष्ट्ये सांगितली जातात त्याला तुम्ही भूगोल संबोधतात .अशी एक ना अनेक प्रकारे .असंख्य विविध प्रकारची नावे देऊन व रचना करून विशिष्ट प्रकारचे भाग केलेले आहेत . मात्र सर्वांचा मुख्य भाग मुख्य उद्देश हाच की . नाव एकच "पुस्तक" काय अर्थ होतो याचा. अरे जेव्हा विशिष्ट प्रकारच्या धार्मिक गोष्टी तेव्हा त्यांचे रूपांतर धर्मग्रंथांमध्ये होते व त्याद्वारे या मानवी जीवनाचा कर्तव्य म्हणजे काय हे प्रत्यक्ष कृतीद्वारे आणि ते आचरण जर तुम्ही मानवाने केले तर? निश्चितच तुमचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्याला तुमच्या सूपिक डोक्यामध्ये आलेल्या कल्पनांनी कधीकधी श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धे मध्ये करून त्याला वेगळे स्वरूप दिले जाते . ते स्वरूप देणारे पण तुम्हीच . कारण काही वर्गातील घटक हे स्वरूप देऊन स्वतःची पोपटपंची करून त्याला व्यवसायाचे स्वरूप देतात .आणि जेव्हा त्या व्यवसायामध्ये काही बालंट किंवा विपरित घटना घडतात तेंव्हा मात्र आम्हाला दिला जातो . कधी आमची होळी केली जाते. तर कधी डोक्यावर घेऊन नाचतात . हे अश का घडते त्याला जेव्हा तुमच्या मनातील विचार प्रक्रिया आणि तुमचा स्वार्थ साधला जातो . तुमच्या पदरी काहीतरी पडले . याचा आनंद होतो . तेव्हा तुम्ही आम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात . आमची पारायण करतात .सारे जगाला उद्देशून त्यातून विशिष्ट प्रकारचे अर्थबोध घेऊन त्यात कल्पनांचा विचार करून शोध लावला जातो .लावल्या नंतर त्यातून विशिष्ट प्रकारची यंत्रसामग्री निर्माण केली जाते . ते तुम्ही त्याचे निर्माते होतात .तुम्ही तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा अहंकार निर्माण होतो . की जणू स्वर्गातून तुम्ही तुमच्या बुद्धी मध्ये असे विचार घेऊन आला आहात हो ! या गोष्टी तुम्हीच निर्माण केल्या आहेत . असा भास होतो. मात्र एखादी अशी काही घटना घडते . जेव्हा तुम्ही आता बोलत होतात तुमची विचार शक्ती सून होते व तुम्ही काही करू शकत नाही तेव्हा? तुला एक माहिती म्हणून एक उदाहरण देतो . डॉक्टर म्हणून स्वतःला तज्ञ समजतात . विविध प्रकारची ऑपरेशन करता तेंव्हा तुम्ही देवाचे आभार मानतात . कधी कधी एखादे ऑपरेशन करत असताना तुम्ही जगातली सारी तज्ञ जमा होता . तुमची कोणत्याही प्रकारची यंत्रणा कार्य करू शकत नाही . तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही . तेव्हा तुम्ही तयार केलेली ती सारी मेडिकल ची पुस्तके डोळ्याखालून घालतात व ते शोधू लागतात का? तुम्ही जर स्वतः एवढी तज्ञ आहेत तर संदर्भ शोधण्याची पुस्तक का शोधतात का? किती संदर्भांची नोंद केलेली पुस्तके आहेत . त्यातून तुम्ही शोधलेली उत्तरे आणि त्या मध्ये असणारे विशिष्ट प्रकारची अनुभवाअंती घटलेले . तशा प्रकारच्या केसेसच्या संदर्भ घेऊन त्यावर तुम्ही विचार प्रक्रिया करून निर्णय घेतात . मात्र घेतलेल्या निर्णयाविषयी कोणीही ठाबं असू शकत नाही. का? कारण तुम्ही स्वतःला तज्ञ समजतात . मग का थांबू शकत नाही . मग पुस्तकांचा आधार का घेतात . तेव्हा तुम्हाला कळेल पुस्तकांचे महत्त्व . तेंव्हा तुम्ही हजारो-लाखो पुस्तकांमध्ये एखादे पुस्तक शोधण्याचा प्रयत्न करतात . जर तुमचे ज्ञान एवढे विकसित असेल .प्रगल्भ असेल 'तर ही वेळ का यावी? त्याच प्रमाणे लाखो वर्षापूर्वी जेंव्हा या भूतलावावर जीव जंतूंचा ,तुमचा मानवाची निर्मिती झाली . तेंव्हापासून झालेल्या घटना चें मार्गदर्शक घटक पुढच्या पिढीसाठी देण्यात आलेले विचार . हे पोहोचवण्याचं काम फक्त आणि फक्त पुस्तकाद्वारे घडून येते. इतर कोणत्याही गोष्टी द्वारे घडून येत नाही . या संगणक युगामध्ये तुम्ही स्वतःला कितीही बुद्धिवान समजा ! कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करून त्यामध्ये असंख्य प्रकारची माहिती साठवून ठेवली . फक्त आमचं स्वरूप बदललं ,लांबी , रुंदी , वजन यांच्यात बद्दल झाला .मात्र जेथे माहिती नोंदवली गेली व नोंद ठेवली जाते .तेही एक पुस्तक असते . त्याचा आधार घेतल्याशिवाय तुमचा एक क्षणही जाऊ शकत नाही . विसरू नका. तुमच्या जीवनामध्ये आमचे असणारे महत्त्व !आणि विचार ! एक कधीही न बदलणारे त्रिकालाबाधित सत्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही बांधील असतो. मात्र तुम्ही क्षणामध्ये बदलू शकता . क्षणामध्ये बदलतात . त्यासाठी तुम्हाला आधार घ्यावा लागतो . लेखणी साठी लागतो . ते कागद जमा झाले की त्याचे बहुतेक फाईल झाल्या कि त्यांचे तयार होतात पुस्तके .म्हणून या मानवी जीवनामध्ये हे तुझ्या नावाने समजल जातो . हे नाव तू आपल्या मित्रांना सांगू शकला तेही आमच्या मुळेच . अरे !आम्ही आहेत . म्हणून जीवन आहे . असे एखादे पृथ्वीतलावरील उदाहरण दाखव . की पुस्तकाशिवाय पूर्णपणे जीवन व्यतीत करू शकणारे .? अगदी रामायण महाभारतापासून आज पर्यंत आणि इथून पुढे भविष्या त! भविष्याचा विचार करून फक्त अनुभवून बघ .तुला कळेल पुस्तकांचे महत्त्व .या पुस्तकांमध्ये शब्दबद्ध झालेले वाक्य हे त्रिकालाबाधित सत्य असतील .तर त्यांना तुम्ही सुविचार म्हणतात . लयबद्ध पद्धतीने रचना केल्यास त्यांना तुम्ही पद्य म्हणून ओळखतात . व विशिष्ट पद्धतीने व विशिष्ट प्रकारची आवाजाची , स्वरांची संगत दिल्यानंतर त्याचा अर्थ बदलतो! मात्र या सगळ्यांना अर्थ प्राप्त होतो . तो केवळ आमच्या पुस्तकांमुळे . होय. आणि राजू ने तीन ते चार तासांमध्ये ते पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर जेंव्हा त्याने डोळे उघडले . तेव्हा सकाळपासून सायंकाळपर्यंत त्याचा कालावधी कसा गेला त्याला हे त्याला पण कळाले नाही . आणि त्याच्या डोक्यात असलेले विचार व मनातील विचार प्रक्रिया मध्ये रममान झाला होता . मन उदास झाले . विचारांमध्ये आज झालेली चलबिचल ही सारी थांबली होती .आणि त्या मुखपृष्ठावर त्याने वाचलेला वाक्य "अंधाराकडून प्रकाशाकडे"! याची त्याला याची जाणीव झाली . आणि तो आनंदाने नाचत त्या एकांतात ठिकाणाहून घरी पोहोचला .तेव्हा तो आनंदाने ओरडला . आणि ते पुस्तक साऱ्या घरभर मित्रांना त्याने दाखवले . व सांगितले हेच पुस्तक हेच असतात मार्गदर्शक ! अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले मित्र .आपले सगेसोयरे ,आणि ते असतात सर्वस्वी जीवनाचे मार्गदर्शक , म्हणजेच "पुस्तके"


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract