Hanamant Padwal

Abstract Inspirational

3  

Hanamant Padwal

Abstract Inspirational

पर्यावरण आणि माणूस

पर्यावरण आणि माणूस

3 mins
1.5K


किलबिल किलबिल पक्षी बोलती…

झुळझुळ झुळझुळ झरे वाहती !

पानोपानी फुले बहरती ..

फुलपाखरे वर भिरभिरती…

स्वप्नी आले काही..

स्वप्नी आले काही..

एक मी गाव पाहिला बाई..


कानाला गोड वाटणारे हे गाणे आणि गुणगुणण्यात आनंद देणारे गाणे भरभरून सौंदर्यानं खुललेल्या निसर्गाचे दर्शन घडवणारे आहे,पण ही स्वप्नतील दुनिया स्वप्नातच राहू नये......

बहुतेक देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करुन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता क्लोरे-फ्लुरो कार्बन (CFC) वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे.


आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. खरे तर ही भूमिका झाली पण वास्तव निराळेच आहे.....


तुम्ही बातमी वाचली असेल,दुष्काळामुळे पाणीटंचाईचा फटका माणसांबरोबर वन्यप्राण्यांनाही बसतो आहे.अभयारण्यातील दोन वाघांचा पाण्यावाचून मृत्यू.मन हेलावून गेलं,माणासाच्या चूकांचा फटका कोणाकोणाला बसणार आहे..?माणूस आपल्या मर्यादा ओलांडू लागला,हिरवी हिरवी वनराई नष्ट करुन झाडं झुडपं आणि जंगलं संपवून सिमेंटची जंगलं उभरली दुष्ट माणसानी.जिथं जिथं माणूस पोहचला तिथं तिथं त्यानं घाण केली हां घाण केली असंच आज म्हणावसं वाटतं आहे.सिमेंच्या जंगलामुळं प्रणीमात्रांचं अस्तीत्वच धोक्यात आले आहे.प्राणीमात्रानां आपापले सहकारी कमी पण माणसेच चहुकडे दिसू लागली.मग राहण्याची आणि वागण्याची पंचायतच झाली बिचा-या प्राणीमात्रांची.मग घुसू लागले मानवी वस्तीमध्ये.जीव धोक्यात घालून जगणं आलं वाटयाला त्यांच्या केवळ आणि केवळ माणसाच्या असणा-या बेपर्वाईमुळे


 निसर्गाने दिलेल्या संपतीवर सर्वच प्राणीमात्रांचा समान अधिकार आहे,हे सोईस्करपणे माणूस विसरला आणि आपल्या आकलीचा खुबीनं वापर करुन माझं ते माझं आणि तुझं तेही माझं या विपरीत न्यायानं वागू लागला.या वागण्यानं पर्यावरणाला बाधा निर्माण होऊ शकते हेही तो विसरून गेला. त्याचीच परिणीती आजची परिस्थिती आहे.पर्यावरणाबाबत चहुकडेच माणुस किती बेदखल आहे हे आपणाला पावलो पावली दिसून येईल.साधं बाजारात गेला तर कँरिबँगचा सर्रास वापर करतो. नव्हे बेसुमार वापर करुन सर्वत्र त्याचाच कचरा केलेला आपणास दिसतो आहे.

समुद्र किनारी गेलात तरी आपणास किती किती घाण दिसते त्यामुळे सागरी प्राण्याना धोका निर्माण झाला आहे.सर्वाना सामावणा-या समुद्रामध्ये शहरांचे गटराचे पाणी,सागरी वाहतुकीतून तेल गळती काय काय प्रताप सांगावे माणसांचे....वाढत्या शहरीकरणामुळे कारखान्यांच्या वाढी झाल्या त्यातूनच गहान पाणी बाहेर पडू लागले,धूर बाहेर पडू लागला माणसे आतून पोखरू लागली रोगाच्या नव्या उत्पती होवून धडधाकट आणि निरोगी माणसाच्या भेटी कथानकातूनच शिल्लक राहिल्या.आठवण म्हणून किंवा इशारा म्हणून भूकंप.ढगफुटी,त्सुनामी,दुष्काळ इत्यादी माध्यमातून निसर्ग सुचीत करत असतो.प्रत्येक घरात जेवढी माणसे तेवढी वाहने, जवळपास अशी स्थिती निर्माण झाली आहे.वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहन संख्या पर्यावरण बिघडविण्यास कारणेभूत ठरत आहे.निसर्गाचं मोठेपण आपणाला झळा सोसल्यावरच लक्षात यतं.प्रत्येक पावसाळयाच्या तोंडावर झाडे लावण्याचा इव्हेंट होत असतो.देण्याऐवजी घेण्याची प्रवर्तीच माणसाच्या कंगालतेचं लक्षण आहे.किमान कचरा,सांडपाणी याचे व्यवस्थापन केले तरी पर्यावरण रक्षणाला चांगला हातभार लावल्यासारखं होईल.पण ऐवढ्यात अकलेनं वागून सुधारणार तो माणूस कसला...?माणसाच्या बेजबाबदार वागणुकीसाठी मला म्हणावंस वाटतं.....


 जाग माणसा


दुष्काळाची छाया दाटली आहे

उजाड माळराने आणि डोंगर...

नदीही आटली आहे..|


भिरभिर पक्षी नभी विहरती

जनावरे भुईवर हंबरती |

संपून गेली जंगले सारी


उभी ठाकली तिथं इमले भारी |

वाहने नि उद्योग दाटले चौफेरी

श्वास कोंडले सा-यांचे

हवा बनली विखारी..|


आस थेंबा थेंबाची सकळास आहे

केविलवाणी कृषक नभाकडे पाहे |

दान दिलं दात्यानं अमाप माणसाला

स्वार्थापोटी जपण्याचं तो विसरला

नाविण्याची ओढ खुणावत आहे


निसर्गावर मात हि एक कल्पना आहे |

निसर्गासोबत चालत रहा

माणसा...आता तरी माणूसपण जपत रहा..!


      शेवटी एकच सांगावसे वाटते "पृथ्वी ही आपणास वारसा हक्कानं मिळालेली नसून,आपण ती भावी पिढीकडून उसनी घेतलेली आहे.तेव्हा भावी पिढीला आपण जबाबदारीनं सुपूर्त करायची आहे."         


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract