Hanamant Padwal

Others

2  

Hanamant Padwal

Others

ऐसे कैसे झाले भोंदू..

ऐसे कैसे झाले भोंदू..

3 mins
1.1K


    ऐसे कैसे झाले भोंदू.....!!

(बाबाच्या निमित्तानं तोबा तोबा )

भारतीय संस्कृतीमध्ये संतांचे कार्य महान आहे. पिचलेल्या आणि खचलेल्या समाजाला तसेच रुढी आणि परंपरेमध्ये गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्याचे महत्तम कार्य संतांनी केले आहे. महाराष्ट्राच्या बाहेर देखील महाराष्ट्रातील संतानी आपले कार्य केले आहे आज चहूकडे संत आणि बाबा यांचे भरघोस पीक पाहिला मिळते आहे. खरं पाहता लोकांच्या जीवनाशी खेळ खेळत आपल्याझोळ्या भरण्याच्या दृष्टीने अनेक बाबांनी आपली दुकाने मांडली आहेत. आणि या दुकानांमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढते आहे .आणि विशेष म्हणजे यामध्ये स्त्रियांचा सहभाग उल्लेखनीय आहे. कायमस्वरूपी अन्याय सहन करण्याची जणू स्त्रियांना सवय होऊन बसली आहे. अन्यायाला प्रतिकार करण्याऐवजी अन्याय सहन करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी स्त्री प्रयत्नशील असते .आणि त्याच मुळे अनेक ठिकाणी अन्यायाला स्त्रियांना सामोरे जावे लागते .बाबांची जी दुकाने थाटली दिसतात त्या दुकानांमध्ये गर्दी आहे ती शहाण्या आणि सुशिक्षित लोकांची. व्रतवैकल्य आणि उपवास या सर्व बाबींची पूर्तता करण्याचे सर्व अधिकार आणि हक्क स्त्रियांनी जणू स्वत:कडे अबाधित ठेवलेले आहेत. चंद्राला स्पर्शून आलेला मनुष्य मंगळावर वास्तव्य करण्याची स्वप्ने पाहतो आहे. आणि आमच्या स्त्रिया या वृत्त वैकल्य मध्ये अडकलेल्या दिसतात त्यात बाबांचा वावर म्हणजे दुःख निवारणासाठी देवदूताचा अवतार असल्यासारखे स्त्रियांना वाटतात ,त्यातूनच या अपरिपक्व मनाच्या स्त्रियांवर ताबा मिळवण्याचे कौशल्य आजकाल बाबांना अवगत झालेले दिसते. त्यातूनच अनिष्ट गोष्टी घडतात आणि समाजामध्ये दिवसागणिक आणि गावागावातअसे ढोंगी बाबा जन्माला येतात .माहिती आणि तंत्रज्ञान वापरत असणार्‍या आणि सर्वच हुद्द्यावर आपले कर्तुत्व सिध्द केलेल्या स्त्रियानी किमान या भोळ्याभाबड्या आणि मनाने कमकुवत असलेल्या स्त्रियांना सावरण्याचे काम केले पाहिजे .आज उघडा डोळे आणि बघा नीट म्हणण्याची वेळ आली आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोण्या बाबांची किंवा अंगारे धुपारे देणाऱ्या एकाद्या मांत्रिकाची आवश्यकता नसून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या मनावर आणि आपल्या कर्तुत्वावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. आणि तो विश्वास आपण संपादन केल्या शिवाय आपल्याला मोठे होता येणार नाही. आपल्या कर्तृत्वाला कोणीही आकार देऊ शकत नाही कारण आपल्या मनाची तयारी जर सकारात्मक असेल तरच आपण मोठे होऊ शकतो .अन्यथा असे तांत्रिक बाबा आणि असे मांत्रिक आपल्याला आपल्या जीवनातून सावरु शकणार नाहीत. नुकतीच जाहिर झालेल्या भोंदूबाबाच्या यादीत चौदा भोंदूचा समावेश झालेला आहे. गल्लीबोळातून हिंडणारे अनेक भोंदू अजून तसेच आहेत. तेव्हा बाबा व तांत्रीकाचे नाव घेता किंवा त्या वाटेने जाण्याआधी तोबा तोबा करायला शिका. ही शिकवण नाही जागृती आहे. तळागाळात आणि गल्लीबोळात भोंदूबाबांचे प्रस्थ जबरदस्त आहे. अनाठायी आणि अवास्तव इच्छाशक्ती बाळगणाऱ्या अनेक स्त्री-पुरुषांना अशा बाबांचा आधार घेतल्याशिवाय जमत नाही. समोरच्या माणसाचा कमकुवतपणा आणि मजबुरीओळखून बाबा आपला डाव साधत असतात. आजकाल फोपावलेली बाबागिरी श्रीमंत होण्याच्या दृष्टीने आणि कुठलेही कष्ट न करता ऐषाराम जीवन जगण्याची एक जबरदस्त कला होऊन बसली आहे. ही कला ज्यांना येईल तो सुखासमाधानाने आणि आनंदाने जीवन जगत असतो. आपले जीवन सूखी करत असताना दुसर्याचे जीवन उद्ध्वस्त करण्याचं तंत्रही बाबांना अवगत असते.हे आजकाल लोकांना कळत नसल्यामुळे अनेक भगिनी त्यांच्या तंत्र आणि मंत्र याला बळी पडतात आणि आपल्या आयुष्याचे वाटोळे करून घेतात. विज्ञानाची कास धरून स्मार्ट झालेला माणूस देखील अशा भोंदू बाबांना बळी पडतोय हे मात्र दुर्दैवाचे आणि खेदजनक आहे. आशासाठीच संत तुकारामानी सुंदर रचना केलेली आहे... कोणती वेळ कामासाठी योग्य या बद्दल तुकोबाराय यांनी या अभंगात सांगितले आहे .....

पंचांगाच्या मागे। लागतो अडाणी,

पाहे क्षणोक्षणी। शुभाशुभ ॥॥

कामचुकारांना। धार्जिणे पंचांग,

सडलेले अंग। संस्कृतीचे ॥॥

मुहूर्ताचे वेड। मूर्खांना शोभते,

आयुष्य नासते। पंचांगाने ॥॥

चांगल्या कामाला। लागावे कधीही,

गोड फळ येई। कष्ट घेता ॥॥

दुष्ट कामे केली। शुभ वेळेवरी,

माफी नाही तरी। शिक्षेतुनी ॥॥

विवेकाने वागा। होऊनी निर्भय,

अशुभाचे भय। निर्बुद्धीना ॥॥

सत्य सांगा लोका। जरी कडू लागे,

चाला, नाही मागे। आला कोण ॥॥

     या अभंगातून शहाणे शिकून घेतील.ज्याना ही भाषा कळणार नाही ते स्वतःच स्वतःच्या पतनास कारण ठरतील. कारण आजकालचे   साधू साधवून घेतात. राम रहिम असो, आसाराम असो,राधे मॉ असो यांच्यासाठी आंधळी भक्ती ठेवून प्राण देणारे, प्राण देण्यास तयार असणारे भक्त आहेत. आंधळ्या भक्तीचे पुजारी जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे बाबा लोक, " मस्त चाललंय आमचं " असंच म्हणणार आहेत. शेवटी श्रध्दा मोठी ठरते ,शिवाय आपण लोकशाहीत राहणारे तेव्हा तुम्ही कसे वागायचे आणि कोणावर श्रध्दा ठेवावी हा तूमचा व्यक्तीगत प्रश्न असला तरी मला म्हणावे वाटते....

         

डोळं उघडं ठेवा बाबांनो

डोळं उघडं ठेवा...

चकवा देतो तुम्हाला

अन् बुवा खातो मेवा...||धृ||

नेटका आपला संसार

लागती कधी ठोकरं

काप कोंबडं तत्पर

म्हणतो कसा बुवा...||१||

दगड पडती घरावर

काप मोठं बकरं

आणि कर मोठा जागर

लावुनी अंगारा घे माझी दुवा..||२||

भोळया कशा आयाबाया

पडती त्याच्या पाया

रांग बघुन बायाची

बुवा,शोधतो फंडा नवा...||३||

नारळ लिंबू अंडा

गळयामधी कंडा

भुलवुन सा-या भाबड्यांना

पळून गेला बुवा..||४||

          


Rate this content
Log in