Hanamant Padwal

Others

2  

Hanamant Padwal

Others

गुरू महात्म्य

गुरू महात्म्य

3 mins
2.0K


     "जीवनाचा खरा मार्गदर्शक"

आचार्य देवो भवं असा वेदाचा आदेश,तमसो मा ज्योतिर्गमय असा उपनिषदाचा उपदेश तर नहि ज्ञानेन सदृश्य पवित्रमिह विद्यते असा भगवद्गीतेचा संदेश जोपासणारी आपली संस्कृती.....

आपली जडणघडण आणि आयुष्याचा मार्ग चालण्याचं पायात ज्यानी बळ दिलं अशा मनात

आणि ध्यानात असणा-या सर्वांप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा दिवस आपल्या स्मृतीत राहतो याचाच अर्थ आपण घडलेलो आहोत. बिघडलेलो नाही.पदोपदी अवहेलना झेलावी लागते आहे...मान सन्मान आणि आदर या गोष्टी

हळुहळू संपत चालल्या कि काय असा समज दृढ होत असताना खरा मार्गदर्शक शोधने महाप्रयासाचे काम आहे.पण खरा मार्गदर्शक कसा असतो,त्याची लक्षणं काय हे तरी आपण जाणले पाहिजे.मार्गदर्शक वा गुरु एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.पण आजच्या धावत्या जगात प्रत्येकाच्या जीवनात फक्त प्रश्नचिन्ह उमटलेली दिसतात.या प्रश्नचिन्हाच्या जाळयातून बाहेर काढणाराच खरा मार्गदर्शक. समजून घेणारे शिक्षक विद्यार्थ्यामध्ये लोकप्रिय असतात.विद्यार्थ्याना त्यांच्या वयाचं होऊन शिकवलं तर त्यांना लवकर समजतं शिवाय त्या शिक्षकांना आदरही मिळू शकतो.मात्र हा आदर मिळवणं मोठं आवघड काम आहे.

हा आदर मिळवण्यात यशस्वी होणारा खरा मार्गदर्शक होऊ शकतो.मार्गदर्शन करत असताना समोरच्याची समजून घेण्याची पद्धत वा मार्ग वेगळा असू शकतो तो मार्ग गुरुने जाणला पाहिजे.पण गुरुचे कर्तृत्व किंवा त्यांच्या प्रयासाला ध्यानात ठेवलं जात नाही.नाही तरी संतानी म्हटल आहेच,....

  "अरे कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात,

  वरी घालतो धपाटा,आत आधाराचा हात..||

  आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी

  ओल्या मातीच्या गोळयाला येई आकृती वेगळी

  घट थोराघरी जाती,घट जाती राऊळात....||

  कुणी चढून बसतो गाव गंगेच्या मस्तकी

  कुणी मद्यपात्र होतो राव राजाच्या हस्तकी

  आव्यातली आग नाही कुणी पुन्हा आठवत..||

  कुणी पुजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ

  देता आकार गुरुने,ज्याची त्याला लाभे वाट

  घट पावती प्रतिष्ठा,गुरु राहतो अज्ञात...||

शिष्याला प्रतिष्ठा देऊन अज्ञात राहिलेला गुरु आपले कार्य करुन मोकळा झालेला असतो.एखाद्याचे जीवन घडविण्याचे काम येवढेही सोपे नाही. तरीपण खरा मार्गदर्शक, गुरु, शिक्षक अखंडपणे हे काम करत असतो.सद्य स्थितीकडे पाहता असे म्हणता येईल,'शिक्षकाचे मन आकाशापेक्षाही मोठे असावे,त्याचे चिंतन

महासागराइतके खोल असावे, बुद्धी सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि स्वभाव चंद्राप्रमाणे शितल असावा.शिक्षणक्षेत्र ही एक तपोभूमी मानून विद्यार्थ्याशी समरस झाल्यास आपली तपश्चर्या आपोआप फळाला येते.या प्रयासास खरेपणाने उतरणारे शिक्षक बांधव आहेत....त्यांची महानता श्रेष्ठ तर आहेच पण गुरु विन कोण अधारु हे तत्व

सर्वस्वी अंगिकारून आपण वागले पाहिजे.प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरु येत असतो आपली घडण त्याच्या कर्तृत्वातूनच होत असते. कोणाच्याही दातृत्वाची कृतज्ञतापुर्वक नोंद घेणं हे संस्कृतीचे लक्षण आहे.ज्यानी आपल्या अध्ययन निष्ठेने विद्यार्थ्याच्या जीवनाला आशय निर्माण करुन दिला.त्या मार्गदर्शक गुरुना वंदन करण्याचा गुरुपोर्णीमा हा दिवस.आपणही जीवन जगत असताना लहान लहान गोष्टीतून आनंद घेतला पाहिजे....भविष्यात एखाद्या दिवशी मागे वळून

पाहाताना याच गोष्टी खूप मोठ्या होत्या याची जाणीव होईल.कदाचीत आपणास घडवणा-या मध्ये अनेक जणांचा वाटा असू शकतो,पण आपला कोणीतरी गुरु मार्गदर्शक नक्कीच असतो.त्याला आपण कधीच विसरू शकत नाही. तोच खरा आपल्या जीवनाचा मार्गदर्शक.पुन्हा प्रश्न येतो की जीवनाचा खरा मार्गदर्शक कोणास म्हणावे,आपणास बाह्य जग जिंकताना अंतरिक बळ आणि आत्मविश्वास जागृत करणारा खरा मार्गदर्शक.

"कपाळावरील रेषेचे भाग्य शोधण्यापेक्षा

कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची वेळ कधीच

येत नाही".तेव्हा कामात राम शोधण्यास लावणारा खरा मार्गदर्शक होय.आधुनिक युगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञाननिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान सहकार्य, समाजाभिमुखता, साहस या गुणांनी युक्त असणारी व्यक्तीमत्वे आवश्यक आहेत.ती घडवणारा खरा मार्गदर्शक. नवचैतन्याने डवरलेल्या, निरागस, अवखळ, जिज्ञासू अशा उद्याच्या भारताचा सहवास शिक्षकांना लाभतो. तो शिक्षक ख-या अर्थाने गुरु मार्गदर्शक आहे..!

"गुरु हा सुखाचा सागरु | गुरू हा प्रेमाचा आगरु

गुरु हा धैर्याचा डोंगरु | कदाकाळी डळमळी ना ||

गरु हा घली ज्ञानांजन | गुरु हा दाखवी निजधन

गुरु हा सौभाग्य देऊन | साधू बोध नांदवी ||

गुरु हा भक्तीचे मडंण | गुरु हा दुष्टाचे दंडण

गुरु हा पापाचे खंडण | नानापरी वारीतसे ||

गुरुचा महिमा अगाध आहे..माझ्या जीवनाला आकार देणा-या मला माणूस बणविणा-या त्या गुरुवर्याना माझा अंतकरणपुर्वक नमस्कार आणि वंदन...!!

घराचं अंगण असो,शाळेचं प्रांगण असो वा विद्यालयाचे क्रिडांगण असो, विद्यार्थी जीवनाच्या नभांगणात गुरुजीचे स्थान ध्रुवता-यासारखे अढळ आहे..अढळच राहिल......!!Rate this content
Log in