Hanamant Padwal

Others

1  

Hanamant Padwal

Others

मागं वळून बघताना.

मागं वळून बघताना.

3 mins
728


इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला. आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. आम्ही सर्व बाजूनी स्वतंत्र झालो. गुलामगिरीच्या बेड्या गळूण पडल्या आकाश, धरती भारतमाता सारं सारंआपलं झालं.मुख्यतः मनाने स्वतंत्र्य झालो. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ज्यांचा जन्मही झाला नव्हता किंवा आज स्वातंत्र्य उपभोगणारे नव्या पिढीतील अधिकच सैराट झालेले दिसत आहेत. आमचा राहणीमानातील थाट वाढत चालला आहे.माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगाची पहाट नव विचार आणि नवा अचार जन्माला घालून एकवीसाव्या शतकाच्या पटलावर आली. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. तरीही पंखात बळ आलेली

पाखरं अधीकच स्वैर झाली.प्रत्येकाची स्वातंत्र्याची व्याख्या बदलत बदलत जाऊन आज आपल्या सोयीनुसार वागण्याचा आणि राहण्याचा फंडा नव्या पिढीच्या डोक्यात असतो.आणि तेच खरे स्वातंत्र्य ही भावना दृढ होताना दिसते आहे. स्वतंत्र राहण्याची सुरुवात लग्न झाले की होते असं मानले जायचे पण आता तसं राहिलं नाही. कारण लहान वयात मुलांना शांत करण्यासाठी कांही खेळणं दिलं जायचं तसंं आज घरोघरी मुलांच्या हातात अँनराईड महागाडा मर्बाइल वा लॅपटॉप असतो.आजच्या युगातील ही साधनं तरुणांना गुलाम बनवून ठेवणारी आणि घरातील संवाद कमी करणारी ठरली आहेत. तरीही या आणि अशा स्वातंत्र्यासाठी प्रत्येक घरातील प्रत्येक तरूणांचा लढा चालू असतो. धावत्या जगाबरोबर आपणही धावले पाहिजे. कारण अखेर धावणाऱ्याचीच जीत होत असते. पण संयम हा प्रकार आपल्याकडे असावा लागतो. जो आज हरवताना दिसतो आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना, जगाची धावाधाव सुरुअसतानाआपण निव्वळ शांत बसणं योग्य होणार नाही.डिजिटलचे वारे सर्वत्र वाहत असताना आपण माघे राहून चालणार नाही.. पण आपले पुढे पडणारे पाऊल आपल्या बरोबरच्याना कोणालाही धोका पोहचवणारे असता कामा नये.आपण आपले स्वातंत्र्य जपताना इतरांच्या

स्वांतत्र्याचाही विचार केला पाहिजे. खरं तर मी वरती आजची सदय स्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण आपणास जगाच्या बदललेल्या परिस्थिती बरोबर चालणे आवश्यकच नव्हे तर

अत्यावश्यक आहे. आणि स्वातंत्र्याचा उहापोह होत असताना आपल्या देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण विकास करण्याच्या दृष्टीने वीडा उचललेला आहे. आणि त्या बाबीचा आपणा सर्व भारतीयांना अभिमानच आहे.कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात त्या चोखंदळपणे ओळखून आपण तंत्रज्ञानाचा उपयोग विकासासाठी करुन घेतला पाहिजे.आजच्या तरुणांच्या हातातील फोन असो वा लॅपटॉप त्याचा वापर विधायक आणि आवश्यक बाबीकरिता झाला तर हे डिजिटल स्वातंत्र्य देशहिताचे झाल्याशिवाय राहणार नाही.आजची तरुणांची बौद्धीक क्षमता लक्षात घेता तंत्रज्ञान आत्मसात करणारी तरुण पिढी स्वातंत्र्याबाबत आगळ्या वेगळ्या विचारसरणीत वावरताना दिसते आहे. स्वतःवर कोणाचेही बंधन असूच नये, आपणावर कोणीही मालक असता कामा नये. असा विचार पक्का होत जावून स्वातंत्र्याची व्याख्याही त्यांच्या ख्याली निराळीच निर्माण झाली आहे. असो तरीही चला सकारात्मक बोलू या.....स्वातंत्र्याच्या

वर्धापन दिनाला मागं वळून थोडं अवलोकन केलं तर आम्ही साधलेली प्रगती खरोखरच नावाजण्याजोगी आहे. डिजिटल भारत

म्हणत आमच्यात होणारे बदल आणि जागतिक वाढणारा आमचा नैतिक प्रभाव हा आमच्या स्वातंत्र्याला निराळाच अर्थ प्राप्त करुन देत आहे. 

त्याचा पुन्हा पुन्हा अभिमान वाटावा असा हा क्षण आहे. आज प्रत्येक भारतीय आपले स्वातंत्र्य आपल्या मुठीत घेऊन जगाला मिठीत घेत वावरत आहे.तंत्रज्ञानाला समर्पित होऊन नवनव्या वाटा शोधत निघालेली तरुणाई योग्य उचित वाटेने जाते

आहे की नाही याची देखरेख करण्याची जबाबदारी तुम्ही आम्ही पार पाडली तर, त्या वाटेवर हीच तरुणाई भरकटणार नाही. आणि त्यासाठी देशभक्तीचे बाळकडू योग्य वयात त्यांना मिळावे ही गोष्ट जाणिवपूर्वक सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. येणारा काळ केवळ आणि केवळ आपलाच आहे. हे काल डॉ.एपीजे अब्दुल कलाम म्हणाले होते आज मी म्हणत आहे, आपणही म्हणत आहात. चला या पाच बोटांची मूठ आवळूया देशभक्ती उरात तेवत ठेऊन वज्र ठोसा त्या देशविघातकांच्या आणि आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांच्या माथी मारूया. आगदी आतून आणि खोल रुतून म्हणूया

भारत माता की जय .......!!!


Rate this content
Log in