STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

प्रिय फेसबुक...

प्रिय फेसबुक...

3 mins
257

प्रिय फेसबुक


तुला फेस नसलेलं बुक म्हणावं कां? कारण तुझा स्वतःचा असा फेस दिसंतच नाही. अनेकांचे फेस तू जगाला दाखवतोस, खरे ,खोटे. ऊठल्या उठल्या माणसे देवाआधी आता तुझं दर्शन घेऊ लागले आहेत. तुझ्या शिवाय लोकांना चैन पडत नाही. घरातले जेव्हा फटकारतात, सभोवताली निराशा असते तेंव्हा तूच गोंजारतोस. लाईक मुळे आत्मविश्वासयेतो.


पण तू आणि तुझ्या भावंडाने समाज ढवळून काढला आहे. नातेवाईक, मित्र समोरासमोर जेवढे व्यक्त होत नाहीत, तेवढे तुझ्याजवळ मोकळे होतात.तू नातेवाईक, मित्र यांच्या संवादाची उणीव भरून काढतोस. जगातल्या कुठल्याही माणसाकडून प्रतिक्रिया वर प्रतिसाद येतो. माणसे दूर आहेत असं वाटतच नाही पण जवळची माणसे मात्र दूर वाटतात. संवाद होतो पण घरातल्याशी नाही,जो व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीसाठी खूप महत्वाचा असतो. 


तू माणसाला इतकं गुंतवातोस की घरातले  संवाद बंद झाले. तु अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेस . तुझ्या शिवाय अनेक जण व्यक्त होऊ शकले नसते. तुझे आभार मानायला हवेत. फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावनांचा विचार आपण पोहचवतो. एखादं व्यक्तिमत्व कसं असतं याचा आरसा म्हणजे फेसबूक. 


माणसांना अभिव्यक्त व्हायला हे तुझ्याकडे पाहून कळत. सामान्य माणूस सुद्धा तत्ववेत्ता प्रमाणे काहीतरी नाविन्यपूर्ण, विचार प्रवर्तक लिहू लागला. अनुवंशिकता,अनुभव,निरीक्षण शक्ती मुळे आलेला आशय व्यक्त होण्यासाठी वाणी किंवा लेखणी हवी. कुवतीनुसार आतापर्यंत असं काहीतरी आशय युक्त व्यक्त करायला संधी न्हवती. विचारांचे तरंग उठायला, स्वतःला वेळ द्यावा लागतो. मन मोकळं करायला तुझ्याशिवाय आज जागाच उरली नाही.लोकांनी फक्त विचार करु नये तर विचार व्यक्त ही करावा यासाठीच फेसबुक. विचार आणि अत्तर वेळेवर स्मृतीच्या कुपीत बंद करणं आवश्यक आहे.पण समाजात विचार करायला व विचार वाचायला वेळ कुणाकडेआहे.पोस्टआधी लाईक केल्या जातात,वाचून किंवा न वाचून. 


कॉमेंटसाठी तर तू स्टिकर, इमोजी उपलब्ध करून दिल्या आहेत. काही का असेना तू व्यक्त होण्याची संधी देतोस. तुझ्यामुळे अनेक लोक लिहिती झाली. तू त्यांची वहीच आहेस. कवी, लेखक म्हणून अनेकांना ओळख मिळाली. तोंडाला फेस येईपर्यंत लोक फेसबुक पाहतात. आपली पोस्ट आली किंवा नाही हे सारखं, सारखं काही काम असलं तरी किंवा कोणाचा फोन असला तरी ते म्हणतात माझ्या पोस्टला लाईक किती आले बघू दे,थांब माझ्या लेकराला न्हाउ घालू दे म्हणण्यासारखं.


तू अनेकांना फसवलं, हसवलं गुंतवलं, काय काय नाही केलंस. आरशात जेवढा फेस लोक पाहत नाहीत तेवढा फेसबुक मध्ये पाहतात. ऐरवी कोणासमोर लोकं मोकळी होणार नाहीत ,पण तुझ्यासमोर लाईव्ह येऊन मोकळी होतात. या निमित्ताने काहीप्रश्र्न मनात येतात. लाईव्ह येण्यावर निर्बंध हवेत का? तुझ्यामुळे शुभेच्छा, गुड मॉर्निंगचे, वाढदिवसाचे मेसेजेस टाकता येतात. कुणाच्या गुड मॉर्निंगने दिवस चांगलं जातो का?


वाढदिवसाला तर शुभेच्छांचा तसेच डीपी बदलला की असंख्य प्रतिक्रिया हजर.हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वांच शक्ती प्रदर्शनच होय. एखाद्याला छान कॉमेंट टाकली किंवा स्टिकर टाकलं तर सेकंदाच्या आत तोंडावर धन्यवाद ची कॉमेंट येवून आदळते. तुझ्या साक्षीने सगळं काही खरं, काही खोटं चाललेलं असतं. अनेकजण फेसबुक पहात नाहीत. तुझ्या नादाला लागल नाहीत. काहीजणांना फेसबुक पाहणं कमीपणाचं वाटतं. लाईक द्या, लाईक मिळवां. कॉमेंट द्या, कॉमेंट घ्या असा एक वर्ग तयार होत आहे तोलून-मापून प्रतिक्रिया देणारा.


फेसबुक मधील माणसे स्वतःचा फेस विसरत चालले आहेत. टाकलेल्या पोस्टला किती, केव्हा कशा कॉमेंट्स येतात त्याचचं चिंतन मग सुरु होतं. दुसरा विचारच माणसं करत नाहीत. कॉमेंट कोणाकोणाच्या आले आहेत.ईतरांच्या कां नाही आल्या? जणू काही त्यांना दुसरे काही धंदे नाहीत. आपल्या सवडीनुसार फेसबुक पाहणार. कोणी पाहणारही नाही, पण कुणा कुणाच्या कॉमेंट का नाही आल्या? याचा विचार माणसे करत बसतातआणि अनेकांच्या मनात दिवस-रात्र शीतयुद्ध चालू असत. नको त्या गोष्टी व्हायरल होत आहेत आणि संस्कृती जतन करायचे असेल तर काहीही व्हायरल होऊन चालत नाही. घरात ज्यांना कोणी विचारत नाही अशांना तू प्रकाशझोतात आणलेस, विचारलंस, गोंजारलं ,फुलवलं हे काही कमी नाही. 


याची देही याची डोळा माणसे स्वतःचे वैभव पाहू लागली. लागली.सारख्या सारख्या रोज पोस्ट टाकल्या की लोकांना ही कंटाळा येतो. रोज पोस्ट टाके त्याला कोण चांगल म्हणे. प्रत्येक पोस्टचं आयुष्य असतं.तुझ्या मार्फत अनेकांचे मैत्रीचे प्रस्ताव येतात पण ते जपून करावे लागतात. एखाद्याची पोस्ट आवडली म्हणून लाईक करायला जाव तर पुढे चाळीस-पन्नास प्रतिक्रिया मागे लागतात. खरच कधी कधी वाटतं कॉमेंट छान असे लिहून आपण गुन्हा केला की काय लगेच त्याच्यावर धन्यवाद काय येतं व तुम्ही फॉलो करत असलेल्या पोष्टला हे पण फॉलो करत आहे असं पहांत राहावं लागतं. अनावश्यक युद्धामध्ये शास्त्रांचा भडीमार होतो एकीकडून झाला की दुसरीकडून होतो तसंच काहीतरी दिवसभर लुटूपुटूची लढाई फेसबुकवर चाललेली असते, कंटाळवाणी.


लाईक देण्यामध्ये पाहिलंय नाही पाहिले तरी आवडलं असं बिनधास्त ठोकून द्यायचं. कॉमेंट घ्यायची म्हणजे पुस्तकाचे परीक्षण केल्या प्रमाणे त्याला सविस्तर अभिप्राय द्यावा लागतो. घटना दुरुस्ती प्रमाणे तुझ्या संरचनेत बदल करावा लागेलं. तू अनेकांच्या व्यक्तिमत्त्वांचा आरसा आहेस. अनेकासाठी आशेचा किरण आहेस. लोकं नांव घेतील असं काही तर कर, नाव ठेवतील असं नको.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract