पृथ्वीवरील स्वर्ग- भूतान
पृथ्वीवरील स्वर्ग- भूतान


एका ट्रिप ची गोष्ट..
काही रम्य आठवणी आपल्याला पुन:प्रत्ययाचा आनंद देतात, जगण्याला बळ देतात.आयुष्यातलं मळभ दूर करतात.
अशीच एक ट्रिप करायची ठरवली ती म्हणजे ऑक्टोबर २०१८मधील भूतांची नव्हें भूतानची अवर्णनीय ट्रिप.
भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा देश आहे. भूतानच्या तिन्ही दिशांना भारत तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे हे वाचलेलं होतं. हा प्लास्टिक वर पहिल्यांदा बंदी घालणाऱ्या मोजक्या देशांपैकी ऐक देश आहे. भुतानच्या संविधानात ६० टक्के जमीन जंगलाने व्यापलेली असावी असे आहे, त्यामुळे भूतान हा जगातला सर्वात जास्त जंगल परिसर असलेला देश आहे. येथील ७१टक्के जमिनीवर जंगल आहे. आर्थिक दृष्ट्या गरीब असला तरी भूतान हा आशियातील सर्वात आनंदी तर जगातील आठवा सर्वात आनंदी देश आहे. आनंदाचे निकष ठरवता यायला हवेंत. समाधान हा सुद्धा आनंदाचा निकषच असतो. आनंद शोधायला माणसे यशो शिखर गाठण्याचा प्रयत्न करतात व त्यात ते दमतात पण त्यांना हे माहीत नसते की समाधान नावाची आनंद देणारी एक गोष्ट यशोशिखराच्या पायथ्याशीही असते.,तेथे थोडा विसावाही घ्यायला हवां, विश्रांती घ्यायला हवी व त्यात समाधान मानून आनंद मानता यायला हवां. भूतान कार्बन नसलेला एकमेव देश आहे. रिपोर्टनुसार भूतान मध्ये १.५मिलियन टन कार्बन उत्सर्जित होतो पण भूतान सहा मिलियन टन कार्बन दूर करू शकतो हे त्याचे वैशिष्ट्य व वेगळेपण आहे. एखाद्या देशाचे वैशिष्ट्य व वेगळेपणच त्याला एका उंचीवर नेऊन ठेवते.
कोलकत्ता मार्गे भुतानच्या पारो या विमानतळावर आमचेंआगमन झालें आणि उघडलें दार स्वर्गाचे अवतरलें.
ढगांच्या व डोंगरांच्या कुशीत जेव्हा विमान खाली आलें तेव्हा सुटकेचा श्वास टाकला कारण भूतानच्या विमानतळावर लँडिंग करणं हे वैमानिकाचे कौशल्य अनुभवण्या जोगं होतं.
जगातल्या दहा धोकादायक विमानतळा पैकी पारो हे एकमेव कमी धावपट्टी असलेलं व तेथे विमान उतरविण्याचं कौशल्य केवळ दहा वैमानीकांकडेच आहे त्यापैकी, तीन भारतीय आहेत अशा ठिकाणी जायचं म्हणजे धाकधूक असणारच.
विसा ऑन अरायव्हल असल्यामुळें व ठरल्याप्रमाणे घ्यायलाआलेला ड्रायव्हर आनंदी व बोलकाअसल्यामुळे कसलाच शीण जाणवला नाही.
प्रवासात ड्रायव्हरचे आमच्यात मिसळणें व रस्त्याच्या दुतर्फा दोन स्वच्छ नद्या थिंपू छूआणि पारो छू वाहत वाहत, पाहत पाहत आम्हीही लॉज पर्यंत कसे वाहवत गेलो, कळालेच नाही.
स्वर्गवत भासणारी ठिकाणें अनेक असतात.
पण आपली माणसं, आनंदाची माणसं जिथे असतात तिथेच आपल्याला स्वर्गाची अनुभूती मिळतें आणि भूतान सारख्या निसर्ग सौंदर्याचा खजिना असलेलं ठिकाण आम्हाला गवसलं होतं. विमानतळावर उतरल्यापासून आजूबाजूच्या परिसरातील सौंदर्य पाहून नि:शब्द व्हायला होतं, तोंड बंद, कॅमेरा सुरू, काय टिपावं किती टिपावं असं झालं होतं. सौंदर्याच्या व्याख्येला एका उंचीवर नेऊन ठेवणारं नवं परिमाण व मनात घर करणारी ठिकाणें फार कमी असतात.थिंपू या राजधानीत बरंच पाहण्यासाठी होतं. थिंपूला बरीच स्तूपें व देवळें आहेत.
साक्यमुनी बुद्धाचा ५१ .५मीटर ब्रांझचा पुतळा भूतान मधील भव्यं आणि प्रेक्षणीय स्थळ आहे.
थिंपू हे राजधानीचे शहर सुद्धा प्रेक्षणीय आहे. येथील राष्ट्रीय ग्रंथालयात जगातील सर्वात मोठे १३० पाउंड व ५ × ७ फूट असे पुस्तक आहे. डोचूला पास हे ३१०० मीटर उंचअसलेलं ठिकाण आहे व येथून ईस्टर्न हिमालयन रेंजची विलोभनीय दृश्यं व बर्फाच्छादित शिखरें दिसतात. पुनाखाजी भुतानची आधीची राजधानी होती
,तिथे Punakha Dzong" The palace,, of great happiness हा जुना किल्ला आहे. टायगर नेस्ट ्ट्् हे उंचीवर असलेली एक मॉनेस्ट्री आहे, तेथे ,सूचीपर्ण व ओक वृक्ष आढळतात.राष्ट्रीय संग्रहालय, प्राणी संग्रहालय या सगळ्या बाबी इथेआहेतच. प्रत्येक हॉटेल व घरात तसेच सार्वजनिक ठिकाणी राजाचे फोटो दिसतील. हॉटेलमध्ये सर्व काम बहुदा मुलीच करतात. सामानाच्या बॅग आणण्यापासून ते इतर सर्व कामे त्याच करतात.भूतान मध्ये स्त्रिया किरा पायघोळ घालतात. भारताबाहेर खूप दूर न जाता ही सुंदर निसर्ग, हिमालयाची साथ देणारी शिखरे, स्वच्छ व समृद्ध, राजेशाही असलेला पण जिथे लोकशाही नुकतीच रुजते असा हा रॉयल भूतान, उत्तम रस्ते असलेला, खड्डे विरहित, वायू प्रदूषण विरहित. इथे टू व्हीलर नाहीत. पेंटिंग केलेली घरे, मोकळे फुटपाथ, रस्त्यावर कागदाचा कचरा नाही, थुंकून घाण केलेले रस्ते नाही हे पाहून मन थक्क होतं.
हा देश बौद्ध धर्मीय आहे. बुद्ध लोक बहुसंख्येने आहेत. वज्रमान बौद्ध देशाचा अधिकृत धर्म किंवा राष्ट्रीय धर्म आहे. ६,७२,४२५ संख्या असलेला (१४२ वा क्रमांक) ४५/किमी घनता असलेला व वार्षिक दरडोई उत्पन्न ३,९३१ अमेरिकन डॉलर (११७वा क्रमांक) असलेला हा देश आहे. येथील वेळभारतापेक्षा अर्धा तास पुढे आहे.राजाने राज्यकारभारासाठी जे वाडे बांधले त्यास DZong म्हणतात . भगवान बुद्धांची जी मंदिरे बांधलीआहेत त्याला मॉनेस्ट्री म्हणतात. भूतान मध्ये स्त्रिया असुरक्षित नसतात तेथे रात्रींही काम संपवून पायी जाउ शकतात.भूतान मध्ये बहुसंख्य बुद्ध लोक आहेत. बौद्ध हा या देशाचा अधिकृत धर्म किंवा राष्ट्रीय धर्म आहे. ३८ हजार किलोमीटर परिसराचा हा देश माणसांना पैशापेक्षा मोठे मानणारा देश आहे. नागरिकांचे दरडोई उत्पन्न याला फारसे महत्त्व दिले जात नाही तर माणसे किती समाधानी व आनंदी आहे यावरून देशाचा विकास किती झाला हे ठरविले जातें. येथे चोऱ्या कधी होत नाहीत. सकल राष्ट्रीय समाधानांच्या निर्देशांकात आशियात हा देश पहिल्या क्रमांकाचा आहे व जागतिक पातळीवर सातव्या क्रमांकाचा आहे तर भारत १२५ क्रमांकावर आहे. पूर्व हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर असलेले आनंदवन म्हणजे भूतान. भूतानलां लॅंड आॉफ ड्रॅगन म्हणतात. जगामध्ये सर्वात कमी वातावरण दूषित असलेला हा एकमेव देश आहे. भूतानचे लोक तिखट खूप खातात. आनंदी देश अशी ओळख भूतानने जपली आहे .शिस्त व नियम याबद्दल भूतान जागृत आहे. येथे निसर्ग व संस्कृती याचे नाते जपले जाते. पर्यावरण व निसर्ग जितका शक्तिशाली ,जितका बळकट असेल तेवढा तो देश आनंदी मानावा लागेल.भूतान मध्ये अनेक प्रकारच्या पताका रस्त्याच्या कडेला फडकताना दिसतात. माणसाच्या मृत्यूनंतर त्याची आठवण म्हणून लावलेल्या पताका पाच रंगांमध्ये असतात यात आकाश, पाणी, वायू ,अग्नी, पृथ्वी अशा पाच तत्वाचे प्रतिनिधित्व हे पाच रंग करतात म्हणून अशा पताका पवित्र म्हणून बांधण्याची प्रथा आहे. भूतानचा पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. टाॅ
कीन हा भुतानचा राष्ट्रीय प्राणी आहे. टॉकिन हा प्राणी फक्त भूतान मध्येच आढळतों. येथील अधिकृत भाषा जोगंगा व इंग्लिश आहे. राष्ट्रीय चलन भूतानी बीटीएम आहे. भारताच्या नोटाही येथे चालतात. भारत व भूतानच्या बॉर्डरवर जयगाव हे गाव आहे. १९९९ पर्यंत येथे टीव्ही इंटरनेट नव्हतें. या देशाला ड्रेस कोड आहे. भूतान नागरिक विदेशाशी लग्न करू शकत नाहीत. भूतान वीजही निर्यात करते. १९७४ पूर्वी भूतानला जाता येत नव्हतें. पूर्वी भूतान प्रवेशाला परवानगी घ्यावी लागत असें. भूतानला शिक्षण व आरोग्य सेवा मोफत आहेत,अशा मनोहारी भूतानला एकदा तरी जायलाच हवं.