STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

2  

Anil Kulkarni

Abstract

एका प्रवासाची गोष्ट.....

एका प्रवासाची गोष्ट.....

2 mins
73


स्वत:च्या मनातून बाहेर निघतां येणं हा एक प्रवास असतो. असाच प्रवास म्हणजे म.टा.नें आयोजित केलेली हॅपी स्ट्रीट. लहानापासून ते ,वयोवृद्ध यांना सुद्धा एकाच वेळी ट्रीपमध्ये सामावून घेणारी ही कल्पना खरोखरच अतिशय छान आणि उपयुक्त आहे. माणसांना घराबाहेर काढण्यासाठी व मनाला बाहेर काढण्यासाठी काहीतरी करणें आवश्यक असतेंआणि एकदा त्यांना बाहेर काढलें की मग ते रमतात पण त्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात आणि हा असाच प्रयत्न सामाजिक भान समोर ठेवून म.टा.ने जपलां. हॅपी स्ट्रीटला नुसती एक चक्कर मारून बघा. अबोल मन व्यक्त व्हायला हे एक व्यासपीठ आहे.

इथे चक्क गाणं म्हणता येतं, झुम्बा करता येतो, अनेक खेळ मुलांसाठी आहो, मनोरंज आहे, मनाचा ताण हलका येथे होतो.आपण हॅप्पी आहोत हे आपल्याला चारचौघात गेल्यावरच, मिसळल्यावरच कळत. आपल्याला आनंद झाला की तो शेअर करायला आपल्यालाआवडतं.

सुख म्हणजे नक्की काय असतं याची व्याख्या अजून तरी कुणाला करणं जमलं नाही पण सुख म्हणजे काय असतं हे हॅप्पी स्ट्रीट वर गेल्यावर निश्चित कळतं. मनमोकळं करायला आज जागाच नाहीत. घरात माणसे दुर्लक्षित तरी आहेत किंवा उपेक्षित तरी आहेत.

वाचन एकतर्फी आहे, समूह संपर्क साधने , निरीक्षण करणे,हे सर्व एकतर्फी आहे.हाताची

घडी तोंडावर बोट ते पूर्वी शाळेसाठी होतं ते आता कुटुंबात, समाजात ही आल

ं आहे. माणसांना बोलायची संधीच मिळत नाही. कुणालाच कुणाशी बोलण्यासाठी वेळ नाही. वेळ नाही म्हणत वेळेचा अपव्यय करणारी माणसें आहेत. नियोजन नसलं की त्याचा सदुपयोग होतच नाही. आज कुटुंब व्यवस्थेमध्ये सुद्धा चार दिशेला चार जण मोबाईल मध्ये व्यस्त असतात. कुणालाच कुणाची अडचण नकोशी झाली आहे. एक भौतिक व्यवस्था परिपूर्ण करण्यासाठी माणसे झटत आहेत. ज्यांच्यासाठी ते करत आहे त्यांच्याशी संवाद साधणे त्यांना नकोसे झालें आहे. कुणाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देणे, आई-वडिलांना सांभाळणे याच्या पेक्षा मनाच्या काही मागण्या असतात हे सगळेच विसरत चालले आहेत, त्यामुळे कुटुंबापेक्षा बाहेर किंवा वृद्धाश्रमात माणसे रमत आहेत. कुटुंब उद्ध्वस्त धर्मशाळा होत आहेत.

घरात असता तारें मी पाहू कशाला नभाकडें अशी

परिस्थिती सगळीकडे कुठेआहे?

निर्मनुष्य घरात व निर्मनुष्य रस्त्यात स्वतःला गुंतवले आहे माणसांनी पण गजबजलेलें रस्तें मनाला गुंतवून ठेवतात आणि त्यातल्या त्यात सुखी रस्तें असतील तर मन गुणगुणायला वाला व नाचायला भाग पडतात.

म.टा.ची हॅपी स्ट्रीट ही संकल्पना तुम्हाला एका ट्रिपचा आनंद नक्की देईल. लहानांना सहवासासाठी बोट धरावं लागतं तर मोठ्यांना संवादा साठी एकमेकाचें बोट धरण्यासाठी

 हॅपी स्ट्रीट ची ट्रीप करायलाच हवी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract