जगावेगळी
जगावेगळी


आजची स्त्री ही जगावेगळी आहे.पारंपरिक गोष्टीला फाटा देऊन आजच्या स्त्रीने आधुनिकीकरणाचा हात पकडुन स्वतःमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत.
ती जगा वेगळी आहे,आगळीवेगळी आहे.तिला. पपरंपरेशी देणं घेणं नाही.
करीअर पुढे तिला काही सुचत नाही.पूर्वी घर हे करियर होते. आता व्यवसाय हेच करियर झाले आहे
घरात राहून शामच्या आईनें संस्कार केले तीही जगावेगळी होती.राणी लक्षमी बाई ने शौर्य दाखवून वेगळेपण सिद्ध केलं.
काही त्याग केल्याशिवाय वेगळेपण सिद्ध होत नाही. कर्तृत्व,कौशल्य,आनुवंशिकता या बाबी वेगळेपण सिद्ध करतात.
आजची स्त्री जगावेगळी आहे .रांधा वाढा उष्टी काढा या प्रकारातील नाही. कोणते क्षेत्र असं नाही की ज्यामध्ये स्त्रीनं आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला नाही. यापेक्षाही कधीकधी ती वरचढ ठरते, जगा वेगळी भासते कारण हेच आहे की तिला आज व्यासपीठ मिळालं आहे. बंधनातून मुक्त झाल्यामुळे, शिकू शकली. या क्षेत्रात करिअर करू शकली .परंपरेने अडकलेली स्त्रि जेव्हा सामाजिक बंधनातून मुक्त झाली, तेव्हा तिने यशाच्या आकाशात भरारी घेत, वेगळेपण सिद्ध केलं आहे .तीने पारंपरिक ओळख पुसून काढली आहे. दुर्गे दुर्घट भारी हे वेगळेपणच होतं. आज संदर्भ बदलले आहेत. अजूनही स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही .पण अशाही परिस्थितीत अनेक जणींनी आपण जगा वेगळी आहोत हे सिद्ध केलेल आहे .संधी मिळाल्याशिवाय वेगळेपण सिद्ध करता येत नाही. जगावेगळी वागताना, सिद्ध करताना घरातील जबाबदारी कडे कधीकधी लक्ष दिलं जात नाही, अशा वेळेस कुटुंबाची साथ नसेल तर तिचा संघर्ष अजून तीव्र होतो.बहिणाबाई अशिक्षीत असूनही त्यांनी आपली जगा वेगळी ओळख अशी निर्माण केली, की त्यांच्या कविता पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आहेत.
आदिवासी मुली प्रशिक्षण
मिळाल्यास विमान चालवू शकतात,असा स्वप्नात विचार केला नव्हता,पण हे शक्य झाले. स्त्री मध्ये टॅलेंट भरपूर आहे ,पण संधी मिळत नव्हती, दिली जात नव्हती. अंधश्रद्धा, रुढी, धार्मिकता, जात पंचायत बंधने, तिला जगावेगळी होऊ देत नाहीत. कल्पवृक्ष कन्येसाठी लावून गेला बाबा,ही अनुंशिकता लताच्या रूपाने बहरली म्हणून ती जगा वेगळीआपल्यासमोर आहे. भीक मागणारी राणू मंडल चा व्हिडिओ जेव्हा व्हायरल होतो तेव्हा तीची ओळख पटते,आणि तिला एकदम रेल्वे स्टेशन ते फिल्मी जगत अशी प्रसिद्धी मिळते. सिनेमात जायची संधी मिळते, घर मिळतें. अनेक लता आशा आहेत त्यांना आधार हवाय.स्वातंत्र्य मिळालेली स्त्री जगावेगळी होऊ शकते. प्रतिमेला छेद देत, अनावश्यक लक्ष्मणरेषा ओलांडत ,स्त्री जगावेगळी होऊ पाहते, यापेक्षाही अनेक क्षेत्रे तिची वाट पाहत आहेत. जगावेगळे होण्यासाठी वेळप्रसंगी घर, देश सांभाळत आहे .देशाच्या संरक्षणाची जबाबदारी ही तिने सांभाळली आहे. हे वेगळे पण नाहीतर काय? अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी करणं म्हणजेच जगावेगळी, अजून जगावेगळी काय असतं? स्त्री जगावेगळी आहे ,वंदनीय आहे, पण वेगळ्या स्वरूपात जेव्हा जेव्हा अन्याय वाढतो तेव्हा जगावेगळेपणच स्त्रीला कामाला येते. प्रत्येक स्त्री जागा वेगळी होण आवश्यक झालं आहे. अजूनही स्त्रियांवर बलात्कार होतात, हुंडाबळी, स्त्रियांना जाळणं हे आजही आहे, हे जर बदलायचं असेल तर जगावेगळी स्त्री हवी .प्रत्येक स्त्री वेगळी, प्रत्येक स्त्रीला वेगळेपण सिद्ध करण्यासाठी स्वतःहून,स्वत:तून, उमलून यावे लागेल.
तरच जगावेगळी स्वामीनी,दामिनी,अवंतिका,अशा वेगवेगळ्या स्वरूपातील यश मिळवून ती जग जिंकेल.
जगावेगळी स्त्री परंपरा, अंधश्रद्धा यात रुतत नाही.
जगावेगळी स्त्री इतरांसाठी दीपस्तंभ असते.