Anil Kulkarni

Abstract

2  

Anil Kulkarni

Abstract

प्रिय आत्महत्या...

प्रिय आत्महत्या...

6 mins
129


प्रिय आत्महत्या.


ये दूनिया अगर मिल भी जाये तो क्या है. जला दो फुक दालो ये दुनिया हे गाणं ऐकायला छान वाटतं, म्हणायला छान वाटतं. प्रत्यक्ष जगायला नको वाटतं. माणसाला जेव्हा कुणीच विचारत नाही तेव्हा आत्महत्या विचारते. इच्छा आणि पूर्ती याच्यामध्ये जेव्हा अडथळा येतो तेव्हा आत्महत्या नावाच खग्रास ग्रहण लागतं आणि ते माणसाला संपवत. अंधाराला माणसं घाबरतात.त्यांना वाटतं उष:काल होणारच नाही. ग्रहण क्षणिक असतं तसंच आत्महत्या व तिचा विचार हा क्षणिक असतो. तो स्वीकारण्यासाठी नसतो. आत्महत्या करणारे प्रसंग टळले की आत्महत्या टळते.माणसाचे कठपुतळी असणं यावर केव्हाच शिक्कामोर्तब झालं आहे.मृत्यूवर अग्रलेख लिहिणारे दुसऱ्या दिवशी लेखाचा भाग बनतात. माणसे दिसतात तशी नसतात. स्वत: च्या मनाचा थांगपत्ता माणसं लागु देत नाहीत.व्यवस्थेला हार जाणारे आत्महत्या जवळ करतात. माणसं माणसांत राहत नाहीत. जनावर कशी जनावरात राहतात. माणसे पैशात राहतात, प्रसिद्धीत राहतात, प्रेमात राहतात. आपलाआध्याय आपण संपवायचा नसतो. शेवटचा अध्याय आपल्या हातातच नसतो. प्रवचन हे देण्यासाठी असतं. वचन पाळण आपल्यावर असतं. प्रवचन परिस्थितीवर असतं. वचन परिस्थितीप्रमाणे असतं. 

प्रवचन दुसऱ्यासाठी, वचन आपल्यासाठी असतं. उपदेश करण हा व्यवसायाचा भाग झाला आहे.


जीवन उपभोगायचं असतं त्याचा आस्वाद घ्यायचा असतो, केवळ भोगाययचं नसतं. भोगा नंतर ची निराशा आत्महत्या जवळ करते. उपभोगाने माणसे सुखावतात. दुःखाच्या अनेक छटा घेऊन माणसे जगतात. एखादी छटा जेव्हा हावी होते तेव्हा मन आणि शरीर दुबळं पडतं. मन आणि शरीर जिथे हारत, संपत तिथं आत्महत्या स्वागताला उभी असते.भोग ही समाधी आहे तर उपभोग ही उपाधी आहे.काय भोगायचं आणि काय उपभोगायचं याची सीमारेषा माणसाला ठरवता आली पाहिजे. वासनेत भोग आहे, प्रेमात उपभोग आहे.


अपयश ही यशाची अखेरची पायरी ठरत आहे. यशाला किल्ली असते अपयशाला खिल्ली असते. माणसाला स्वतःची खिल्ली उडवलेली आवडत नाही.परिस्थितीनं खिल्ली उडवण आवडत नाही. माणसं हव्यासापोटीच आत्महत्तेला जवळ करतात. मोहा पासून प्रवृत्त करणारे क्षण टाळता आले पाहिजेत. प्रसंग आणि माणसं आत्महत्या टाळु शकतात. प्रत्येक क्षण कोणत्या रंगात बुडवायचा ते आपल्या हातात आहे व नाही. क्षण जवळ करता आले पाहिजेत व क्षण टाळताही आले पाहिजेत जीवन म्हणजे दोन क्षणातील अंतर.आपला प्रत्येक पुढचा क्षण ठरवतो आपलं अस्तित्व. क्षणाचे हावी होण अस्तित्वाला सुरुंग लावत. क्षण जगणं आणि क्षण टाळणं जमलं पाहिजे. प्रत्येक क्षण वेगळा. जीवन हे क्षणभंगुर आहे. क्षणांना भंगार करू नका.क्षण काहीही करू शकतो. जीवन संपवु शकतो, जीवन फुलवु शकतो. स्वतःला जपायचं असेल तर क्षणांना जपा. अस्तित्व संपण आपल्या हातात नाही पण संपवणं आपल्या हातात आहे. आत्महत्या म्हणजे मधमाशाच पोळ आहे जितके जवळ जाल त्यात गुंताल तेवढे संपाल.


श्रद्धेला तडा जातो तेव्हा माणसे अंधश्रद्धेला जवळ करतात. अंधश्रद्धा ही आत्महत्येची पहिली पायरी आहे. श्रद्धेत माणसे जगतात तर अंधश्रद्धेत माणसे मरतात. चेहरा खरा असतो मुखवटा खोटा असतो. चेहरा कितीदातरी आत्महत्या करतो तेव्हा मुखवटा सावरून घेतो माणसे तशी कितीदातरी मरतात. प्रत्येक प्रसंगात माणसाचा पुनर्जन्म होतो. मन हे अनेकदा मरतं तरी आपण जगतो,शरीरआपल्याला ती संधी देत नाही. सधन असो निर्धन असोआत्महत्या चा विषाणू कोणाला सोडत नाही. संसर्गाची पायरी मृत्यू कडे नेते आशेच्या समुद्रात जास्त दूर व खोल जायचं नसतं निराशेचे भोवरे़ कवेतघेतात. जितक्या आशा तितक्या निराशा. जीवनात अशा निराशेचा आलेख कधी ऊंच तर कधी खाली येतो, पणशेवटच्या क्षणी आलेखाचा शेवट सरळ रेषा असते.यशाच्या शिखरावर माणसं एकटीच असतात.


प्रत्येक यश यशाला जन्म देतं,पण प्रेत्येक यश अपयशालाही जन्म देते. यश कधी एकटं येतं नाही बरोबर लवाजमा घेऊन येतं. यशा बरोबर स्पर्धा, इर्षा, तुलना येतात..इतरांशी तुलना करता करता स्वतःचा तोल कधी जातो कळत नाही. यश सुद्धा पचवता आलं पाहिजे. सध्या नकार पचवायला कुणीच शिकवत नाही.यशाच नियोजन माणसे करतात पण अपयशाचं नियोजन करत नाहीत. आत्महत्या सुनामी सारखी असते, क्षणात होत्याचं नव्हतं होतं.गुणवत्ते न यश मिळतं पण यश गुणवत्तापूर्ण आयुष्याची हमी देत नाही. कोणाशी कुणाला बोलायचं नाही, मन मोकळं करायचं नाही. मी, माझं, आमचं हेच प्रत्येकाच वर्तुळ. आपलं असं काही नाहीच. निराशा, अपयश यांना जिंकलं की आत्महत्या जवळपास सुद्धा फिरू शकत नाही.  काही प्रसंग जगता आले पाहिजेत,काही प्रसंग टाळता आले पाहिजेत. समाधाना शिवाय यश भोगता येत नाही. दोन यशा मध्ये कुठे तरी समाधान नावाचा थांबा आहे, तिथे क्षणभर विश्रांती हवीच.. यश जेव्हा समाधानाच बोट सोडतं तेव्हाआत्महत्याचं बोट पकडतं.


स्वतःहून व स्व: तातूनउमलता यायला हव. स्वतः वर विजय मिळवता यायला हवा. रोज मरूनही जिवंत राहता यायला पाहिजे.रोजआपला दिवस आयुष्यात उगवतो कारण अपयश निराशा त्याला टाळून आपण पुढे आलेले असतो. समाधान नैसर्गिक मृत्यू स्वीकारतं. असंतुष्ट मन मृत्यूला स्वीकारतं. स्पर्धेच्या युगात चित्ती असू द्यावे समाधान हे राहीलंच नाही. इच्छित कार्य पूर्ण झाल्यावर पूर्वी समाधी घेतली जायची आता इच्छित कार्य अपूर्ण राहिलं म्हणून आत्महत्याची समाधी घेतले जाते. पैसा, यश, प्रसिद्धी, प्रेम ही प्यादी आहेत. आत्महत्तेचा घोडा अडीच घर चालून प्यादांना मारतो. अर्ध्यावरती डाव मोडला जातो व अधुरी एक कहाणी होऊन जाते.. मृत्यूला मृत्यूचं काम करू द्या. स्वतः स्वतःची कबर खोदायची नसते. याची देही याची डोळा मृत्यू पाहता येत नाही.स्वतःच्या तिरडीला स्वतःचा खांदा काही उपयोगाचा नाही. शेवटी चार खांदे हीच आपली कमाई असते.एक यश दुसऱ्या यशाला जन्म देते. यश जेव्हा अपयश वाटायला लागतं तेव्हा नैराश्य येतं. टोकाचं नैराश्य आत्महत्या जवळ करतं.

 

Looser is successor हे पडद्यावर समजावून सांगणारे पडद्यामागे स्वत:ला हरवुनन बसतात. नैराश्यातून तुला जवळ करणारे अनेक आहेत.reel lifeव real life इतकी भिन्न कशी? पडद्यावरचं व पडद्यामागचं यात खूप तफावत आहे. तुझ्या नादाला लागून माणसं स्वतःला संपवीतआहेत. जगण्याचे पाश सोडवत नाहीत. जर सोडले तर ते मृत्यूच्या बाहुपाशाला जवळ करतात. कार्टून पाहू न दिल्यामुळे ही मुले आत्महत्या करतआहेत. क्लीन बोल्ड होण्याऐवजी लोक स्वतः बॅट झुगारून देत आहेत, एलबीडब्ल्यू होत आहेत.स्वर्गात आत्महत्या शाखेत अनेक जण प्रवेश घेत आहेत.सगळे असतानाही माणसे तुला जवळ करतात आणि काहीच नसताना ही माणसे तुला जवळ करतात.अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यातला दुष्काळ त्यांना संपवत आहे. सबकुछ सिखा हमने ना सिखी होशियारी असंच म्हणावे लागेल.


काहींना चंद्र हवाय, काहींना भाकरीचा चंद्र हवा आहे, काहींना प्रेमासाठी चंद्र हवा प्रत्येकाचे मनसुबे वेगळे आहेत. मनसुबे पूर्ण होत नाहीत तेव्हा माणसे तुझ्या स्वाधीन होतात. माणसाला सगळंच हवंय प्रेम, पैसा, प्रतिष्ठा, समाधान ,यश, प्रसिद्धी पण सगळ्यांना हे कसे मिळणार ?यशश्री खेचून आणावी लागते आणि खेचून आल्यानंतर ती टिकवावी लागते. अपयशाच्या समुद्रात जर जीवनाची अखेर करायचे असेल तर यश मिळवायच कशाला? जिने की तमन्ना असताना, मरने का इरादा कां करायचा. माणसं तुझ्या नादी लागलेत.

 

जीवनातले काही क्षण मंतरलेले असतात, भारावलेले असतात त्यावेळेस ते काहीही करतात याचे त्यांना भान नसतं. कुणीतरी त्यांना सावरायला हवं, मदत करायला हवी. आधार द्यायला हवां, पण असे हात आज दुर्मिळ झाले आहेत, पाय धरावे असे पाय ही दुर्मिळ झाले आहेत. मृत्यूची गळाभेट स्वतःहून घ्यायचे नसते. अपयशाच्या पायऱ्या मृत्यू कडेच नेतात.आमचे शिक्षण आम्हाला यश कसं मिळवायचं हे शिकवतं पण समाधान कसं मिळवायचं, आनंदी कसं राहायचं हे नाही शिकवत.मुले परीक्षेला नैवेद्य दाखवून परदेशात खोऱ्याने पैसे ओढण्यासाठी जातात आणि आई वडिलांचे मृत्यू मोबाईलवर पाहतात. पैसा माणसाला कोरडा ,भावनाशून्य बनवतो. अपयशानंतर चा प्लॅन आमच्याकडे नाहीच. जे काय आहे ते रामभरोसे. संघर्ष नसलेल्या पिढीला फार मोठी किंमत मोजावी लागते आहे. सात पिढ्यांची कमाई करणाऱ्यांनी सात पिढ्या निष्क्रिय केले आहेत. भौतिकता निराशाच आणते सगळं संपल्याची भावना ही निराशाच आणते.


नैतिकतेच्या भूमीतच चांगले विचार असतात,सकारात्मक विचार असतात. नैतिकता ही तपश्चर्या करून साध्य होते. यशामागे धावताना थोडी विश्रांती घ्यायला हवी. थोढे स्वतःसाठी जगायला हवं. यशामागे जाऊन दमछाक करून घ्यायची नसते. आयुष्यभर यश मिळवण्याच्या नादात यश भोगायला हि वेळ मिळत नाही. नैराश्य मृत्यूच्या हातात हात घालून अस्तित्व संपवते. खोऱ्याने पैसे ओढणारे स्वतःसाठी कधी खड्डा खोदतात ते त्यांनाच कळत नाही. चित्ती असू द्यावे समाधान हे आज नाहीच. इर्षा माणसाला अनावश्यक स्पर्धेत ढकलत आहे.


संघर्षातून मिळालेला हर्ष जीवन जगण्याला प्रवृत्त करतो. अपयश व निराशा ढगाप्रमाणे येतात व जातात अशावेळेस थोडी प्रतीक्षा करायचे असते कारण ढग गेले की आकाश निरभ्र होतं. झाले मोकळे आकाश आवस्था कुणाला आवडत नाही. अपयश व निराशा अमावस्या प्रमाणे कायमची नसते. यशाची पौर्णिमा पहायला धीर धरावा लागतो.


यश सगळं तात्काळ देतों पण मृत्यूही तात्काळ देतो आजकाल लोकांना सगळं तात्काळ हवं आहे. वाट पाहणं, धीर धरण जीवन जगण्याचे थांबे आहेत. प्रवासात थांब्यावर विश्रांती हवी तरच प्रवास सुकर होतो. सब्र का फल मीठा होता है हे आज मान्य नाही. दो मिनिट मे मॅगी तयार हवी.आम्ही माणसाचे यंत्रमानव करत आहोत .ऑनलाइन शिक्षणाने ऑनलाइन माणसे तयार होत आहेत. भावनाही आता ऑनलाइन झाल्या आहेत, रीप म्हणून व्यक्तिमत्त्वाला गुंडाळला जात आहे. कार्टून, गेम्स पाहून मुले यांत्रिक होत आहेत.श्रम नाही त्याच्यामुळे श्रमातून मिळणारा आनंद नाही. घरासाठी पैसे कमावणारे घरच्यांचे राहत नाहीत. माणसे आज निर्वात पोकळीत जगत आहेत. कामाला वेळ देणारी माणसं माणसाला वेळ देणं विसरली. व्यक्तिमत्व निर्वात पोकळीत विकसित होत नाही. भावनेत भिजल्याशिवाय मने मोकळी होत नाहीत. भावना नसलेलं मन पाषाण शिल्पअसतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract