परिस्तिथीशी सामना
परिस्तिथीशी सामना
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे जगभर लॉकडाऊन लागू करण्यात आले. हळूहळू कामावरून लोकांना काढण्यात काढले. कोणी व्यवसाय करत होते. त्यांचे व्यवसाय ठप्प झाले. त्यावेळेस राजचा ऑनलाइन व्यवसाय बंद झाला. मयुराला कामावरून ब्रेक दिला गेला. दोघांची दर महिन्याला येणारी मिळकत बंद पडली.
राजची जमापुंजी ते घरात खर्च करू लागले. राज कडचे सगळे पैसे संपल्यानंतर त्यांनी मयुराच्या अकाऊंट मधुन घर खर्चा साठी पैसे काढण्यास सुरुवात केली. "माझ्या कडचे पैसे संपल्या नंतर काय करायचं? पुढच्या वर्षासाठी पैसे जमा करून ठेवायला पाहिजे. आता घाबरून घरी बसण्यात काही एक अर्थ नाही. नवीन नोकरी शोधायला पाहिजे.." अशी कल्पना तिने राजला दिली आणि नवीन नोकरीच्या शोधात फिरू लागली. "कुठे जॉब असेल तर सांगा." म्हणत सगळ्यांना विनवण्या करत होती.
राजला नोकरी करण्यात इंटरेस्ट नव्हता. म्हणुन त्याने व्यवसाय सुरू केला होता. पण त्याचे वय वर्ष चाळिशीच्या आसपास असल्यामुळे आता त्याला नोकरी मिळणे कठीण झाले होते. अक्षरशः त्याचा जीव रडकुंडीला येत होता. राजला तुटलेले पाहून मयुरा त्याला धीर देत बोलायची., "अजुन थोडे दिवस. हे कोरोनाच्या नावाखाली जे काय सुरू आहे. ते एकदा मिटलं की, तुझा व्यवसाय देखील पुन्हा जोमाने सुरू होईल आणि मला नोकरी मिळाली की, मग काही टेंशन घेण्याची गरजच नाही."
एक दिवस मयुरा दिवाळीचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती. तेव्हा बऱ्याच दिवसांनी भेटलेली एक मैत्रिण थांबवत तिची विचारपुस करू लागली. "नवऱ्याचा व्यवसाय बंद आहे. मला कामाच्या ठिकाणी ब्रेक दिलाय. मी सध्या नवीन नोकरीच्या शोधात आहे. प्लीज! कुठे नोकरीसाठी जागा रिकामी असल्याचे तुला कळले. तर मला नक्की कळव ?" मयुरा तिला विनवणी करतच बोलली.
त्यावर मैत्रीण फटकन बोलली,"तुझ्या नवऱ्याला सांग ना कामाला जायला. तो घरात बसुन काय करतोय? तु नोकरीला जाणार आणि तो घरात बसुन तुझ्या जीवावर खाणार का? एकदा पुरुष घरात बसला की, त्याला घरात बसायची सवय लागते. मग आयुष्यभर ते बायकोच्या मुंडावर जगतात.." हे ऐकुन मयुरा वैतागली. "नोकरी असेल तर सांग म्हणुन तुझ्याकडे फक्त एक विनंती केली. तुझ्याकडे पैसे तर मागितले नाही ना. तुला माझ्या नवऱ्या बद्दल बोलायचा अधिकार नाहीच मुळी.
माझ्या घरात लागणारं बरेचसे सामान माझ्या माहेराहून येते. कारण माझ्या आईने मला बजावून ठेवले आहे. घरात आर्थिक चणचण जाणवायला लागल्यावर बाई नवऱ्यावर चिडचिड करते. शक्य असे पर्यंत तो देखील कुटुंबासाठी झटत असतो. पण कुठून मिळकत नसेल तर तो तरी काय करेल? टेंशन घेऊन आत्महत्या करण्यामागे पुरुषांचा नंबर देखील लागतो. स्त्री जन्मा कुणाच्या मृत्यूचा दोष तुझ्या माथी लागावा एवढी तुझी कहाणी दुर्दैवी नाही. लग्नात सप्तपदी चालताना सुख दुःखात चालण्याचे वचन घेतो. सध्याचा चाललेला काळ हा खुप कठीण आहे. अश्या कठीण परिस्थितीत त्याच्यावर दबाब देऊन कसं चालेल? संसार रथ दोघांनी एकमेकांना सांभाळत चालवयाचा असतो. आईच्या सकारात्मक विचार सारणी मुळे माझा संसार टिकुन आहे. नाहीतर तुमच्या सारखी लोकं मदत तर करत नाही. पण कान भरवणी करून नवरा बायको मध्ये निष्कारण भांडण लाऊन देतात. नवरा बायको मधील बहुकेत भांडण बाहेरच्या लोकांमुळे होतात. एक लक्षात ठेव. माणसाची तीच वेळ राहत नसते. त्यामुळे कुणाच्या पडत्या वेळेवर हसू नकोस. मैत्रिणीला खडसावत मयुराने तिथून काढता पाय घेतला. डोळे मात्र पाणावलेले होते. कारण कुणी परिस्थिवर हसलं तर मनाकडे दुःख येतं..
****कमवणारी माणसं जेव्हा घरात बसतात. तेव्हा मज्जा बघणाऱ्या लोकांची संख्या जरा जास्तच आढळते. द्यायला तर कुणी येत नव्हतं. पण घर कसं चालतंय ह्यावर सगळ्याचं लक्ष वेधलेलं असतं. 'तुम्ही घरातली सगळी मंडळीची नोकरी गेली आहे ना. मग तुमचं घर कसं चालतं?' असे प्रश्न मुद्दाम विचारले जातात. काही लोकांना तर पैसे मागायला येतील की, काय असा गैरसमज असतो. म्हणुन बोलणे देखील टाळतात.
