प्रारब्ध (भाग 9)
प्रारब्ध (भाग 9)
(काश मै तुमसे मिल ती ही नहीं...गिरीश.
तुझमे रब दिखता हैं ..... राहूल.
प्रेम की चांदणी ...नेहा...
प्रेमगली या कादंबरी मधील तीन पात्रे...यावरून माझी स्वतंत्र कथा...)
संकेत ला कसलाच अधिकार किंवा बिझनेस मध्ये इनवोलव्ह करणार नवहते कारण मालिनी वर त्यांचा विश्वास नवहता. ती कधी ही धोका देईल अस त्यांना वाटत होते. आणि आता तरुण सुंदर अशी नेहा होती त्यांच्या साठी त्यामुळे मालिनी किस झाड की पत्ती ? मालिनी ला थोडे पैसे देऊन गिरीश तिथून बाहेर पडले.
हॅलो, अरे शिवा कधी येणार आहेस तू गावा वरून? काम अडून बसले आहे तुझ्या मुळे. गिरीश ने एक कॉल लावला होता. " साहेब हा आठवडा थांबा मी पुढच्या आठवड्यात येतो मग लगेच काम करून टाकू.." समोरून शिवा बोलत होता. शिवा गिरीश च्या मर्जीतील खास गुंड होता. कोणाचा गेम करायचा असेल कोणाला पळवून आणायचे असेल तर शिवा त्या कामा साठी परफेक्ट होता. बरेच दिवस झाले मालिनी चा खेळ संपवण्याच्या बेतात गिरीश होते ते काम शिवाच पार पाडू शकत होता.
नेहा चे लग्न होऊन आता जवळजवळ वर्ष होत आले होते पण राहुल सोबत ती तुटकपणेच वागत होती स्नेहा ताईच्या लक्षात ही गोष्ट आली होती. नेहा कामाच्या नावा खाली सतत ऑफिस आणि बाहेरचे दौरे करण्यातच मग्न होती. गिरीश कायम तिच्या सोबत असत. बऱ्या पैकी बँक बॅलन्स आणि दागिने तिने त्यांच्या कडून काढून घेतले होते.
बोल नेहा,काय काम होते .मालिनी तिला भेटायला आली होती.
मी एक प्लँन सांगते जो माझ्या डोक्यात आहे ,तुम्ही मला मदत केली तर मी ही तुमची मदत करू शकते पैशाच्या रूपाने.
प्लॅन गिरीश बद्दल आहे का ?
हो ,मग नेहा ने मालिनीला तिचा प्लँन सांगू लागली.
नेहा यात आपण दोघी अडकणार तर नाही ना?
नाही अडकणार पण तुम्हाला ही वाटते ना की गिरीश ला त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळायला हवी?
हो मना पासून वाटते नेहा कारण एखाद्याची रखेल बनून जगण्यात जो अपमान आहे ना तो म्हणजे जीवन्तपणी मरण भोगल्या सारखाच आहे. असे ही गिरीश आता मला टाळत असतात आणि त्यांचा स्वभाव मला माहित आहे ते माझा काटा काढायला ही मागे पुढे बघणार नाहीत. मला त्यांच्या पासून धोका आहेच म्हणून मी तुला साथ देणार नक्की देणार पण जे करशील ते सांभाळून कर नेहा.
हो मी पूर्ण विचार करूनच हे ठरवले आहे मला ही आता त्या घरात राहायचे नाही आहे.काम झाले की तुमचे पैसे तुम्हाला मिळतील तसे तुम्ही लगेचच हे शहर सोडून जायचे.
हो नेहा अगदी तू ठरवले आहेस तसच होईल.
ठीक आहे मग मी फोन करते तेव्हा लगेच निघा.
नेहा मग घरी आली. स्नेहा ताई लवकर घरी आल्या होत्या. नेहा ,एक मिनिटं मला तुझ्याशी बोलायचे आहे जरा.
काय बोला आई काही काम होते का?
नेहा मी किती दिवस झाले पाहतेय की तू राहुल सोबत नीट बोलत नाहीस, वागत नाहीस दोघ एकत्र बाहेर जात नाही काय भानगड आहे ही?
आई वेळ आली की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आता मी काही ही बोलू शकत नाही.
पण नेहा तुझे हे वागणे बरोबर नाही.राहुल चे काही चुकते का? मला सांग मी बोलेन त्याच्याशी.
आई मला आता या विषयावर जास्त नाही बोलायचे मी दमली आहे.उद्या बाबा सोबत मिटिंग ला जायचे आहे.इतकं बोलून नेहा बेडरूम मध्ये गेली.
(क्रमशः)
