Jyoti gosavi

Abstract Others

3  

Jyoti gosavi

Abstract Others

पिवळी पिवळी हळद लागली

पिवळी पिवळी हळद लागली

1 min
169


आज नवरात्रीची चौथी माळ, आणि वार गुरुवार. त्यामुळे परंपरेने ठरलेला आजचा रंग पिवळा

 आता त्या रंगाबद्दलच थोडेसे पाहूया, 

पिवळ्या रंगाच्या देखील तीन छटा आहेत .

एक लिंबूनि पिवळा

 म्हणजेच लेमन कलर, दुसरा डार्क पिवळा 

आणि 

तिसरा केशरी पिवळा 

तिन्ही आपापल्या ठिकाणी शोभून दिसतात ,खुलून दिसतात. 

आता या पिवळ्या रंगाचा कुठे कुठे वापर होतो !पहिला म्हणजे दत्तगुरूंच्या पायाशी, ज्यांची रास धनु आणि मीन आहे त्यांच्या राशीला पिवळा रंग हा शुभ मानला जातो .

दत्तात्रयाला पिवळी फुले वाहिली जातात, किंवा कोणत्याही गुरूंच्या पादुकांना ,मग ते साईबाबा असोत, गजानन महाराज असोत , की स्वामी समर्थ असोत, त्यांना पिवळी फुले वाहिली जातात. 

नैवेद्यामध्ये पिवळी मिठाई, बुंदी, जिलेबी, चणाडाळ आणि गूळ असे अर्पण केले जाते. 

कृष्णाच्या पितांबराचा रंग पिवळा, याचा उल्लेख येतो महाभारतामध्ये. 

जेव्हा वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदी त्याची करुणा भाकत होती, आणि तो वस्त्रे पुरवत होता. 

एका बाजूला वस्त्रांचा ढीग लागलेला होता. आणि ती ओढून ओढून दुसऱ्या दुष्या:सना चे हात दुखू लागले होते. 

तो घामाघुन झाला होता आणि अचानक तिच्या अंगावर पितांबर दिसू लागला, आणि एवढा वेळ गप्प बसलेले भीष्म ओरडले, खबरदार हात लावू नकोस नाहीतर जळून भस्म होशील. असा तो द्रौपदीचा पाठीराखा पितांबर! तोही पिवळ्या रंगाचा. 

कडाडणारी सौदामिनी पिवळ्या रंगाची ,

सृष्टीतली अनेक फुले पिवळ्या रंगाची, नवरात्रात ज्याची माळ आवर्जून घटाला घालतात ती कारळ्याची फुले पिवळ्या रंगाची. 

 सूर्यफूल पिवळ्या रंगाचे, गुलाब पिवळ्या रंगाचा, अजून एक सर्वांचे आवडते आणि सुगंधी फुल सोन चाफा पिवळ्याच रंगाचा, 

लग्नात नवरा नवरीला लावतात ती हळद पिवळी,

 मामा कडून नवरीला नेसवली जाते ती हळदीची साडी पिवळी. 

अग्निशिखा पिवळी

इतकेच काय झळाळणाऱ्या सोन्याचा रंग पिवळा


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract