Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!
Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!

Alka Jatkar

Classics


3  

Alka Jatkar

Classics


फुगे

फुगे

2 mins 1.8K 2 mins 1.8K


 मुलांच्या खेळण्याच्या मैदानाची वेळ नुकतीच संपली होती. छोटी छोटी चिमुकली मुले आपापल्या आई बाबांचे हात धरून घराकडे परतत होती. 


" अंकित, अरे एखादे तरी बिस्कीट खा... खेळून भूक लागली असेल ना. दोन तास झाले काही खाल्लं नाहीयेस. घरी गेले कि लगेच जेवायला वाढते हं तुला. तुझ्या आवडीची भाजी आहे आज." आईने प्रेमाने मुलाशी बोलत बिस्किटाचा पुडा त्याच्या 

हातात दिला.हातात बिस्किटाचा मोठा पुडा घेऊन चालणाऱ्या अंकितचे लक्षच कुठे होते आईच्या बोलण्याकडे. त्याचे सारे लक्ष फुग्याकडे लागले होते.


चौकातच एका कोपऱ्यात एक फुगे विकणारी बाई बसली होती. मांडीवर एक किरकिरणारे रडके बाळ घेऊन फुगे फुगवत होती. फुगे फुगवून ती आपल्या सात आठ वर्षाच्या मुलाकडे देत होती विक्रीसाठी. तिला माहित होते लहान मुलाने आग्रह केला कि घेतात बहुतेक माणसं फुगे. हे सारे फुगे विकले गेले असते तरच ती आपल्या दिवसभर उपाशी असणाऱ्या मुलाला चार घास खाऊ घालू शकणार होती.


अंकितने आपल्या आईकडे फुग्यांसाठी हट्ट धरला. "बरं ,चल घेऊयात" आई म्हणाली. आईची परवानगी मिळताच स्वारी खुश झाली . "मला लाल, पिवळा, दोन फुगे हवेत" अंकितची मागणी वाढली.


"दोन फुगे दे रे" अंकितची आई फुगेवाल्या मुलाला म्हणाली. पण नाईलाजाने हातात फुगे घेऊन उभे असलेल्या फुगेवाल्या मुलाचे लक्षच नव्हते. तो आशाळभूत नजरेने अंकितच्या हातातील बिस्किटाच्या पुड्याकडे पाहत होता. 


" रामू , ध्यान दे गिराइकाकडे " फुगेवाली बाई ओरडली आपल्या मुलाला. भानावर येत रामूने अंकितला हवे असणारे दोन फुगे काढले आणि तो ते अंकितला देऊ लागला. फुगे घेण्याच्या आनंदात अंकितने आपल्या हातातील बिस्किटाचा पुडा रामूच्या हातात कोंबला. 


रामू आणि अंकित दोघांचेही चेहरे आनंदाने फुलून गेले.
Rate this content
Log in

More marathi story from Alka Jatkar

Similar marathi story from Classics