पावसाळ्यातील क्षण.
पावसाळ्यातील क्षण.
आकाशात काळे ढग जमा झाले होते.निळेभोर आकाश अर्ध्या तासात काळेकुट्ट झाले होते .बेडकांचा डराव डराव आवाज सुरु झाला होता.अनेक छोटे मोठे पक्षी,किडे आकाशात घिरट्या घालत होते.जणू ते पाऊस येणार म्हणून धरतीला इशारा करत होते.थंडगार वारा वाहत होता.त्यात तो
एव्ह्ढा वेगाने वहात होता की अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाले.काही पत्रे तर पक्ष्यासारखे उडत होते.झाडांची अवस्था वाईट झाली होती.काही तर वार्याच्या वेगाने एकडून तिकडे हेलकावे घेत होते.सारखे डोलत होते.जणू त्यांचा काळ जवळ आला अशी भिती त्या सजीव झाडांमध्ये निर्माण झाली होती.काही झाडे मुळासकट उखडून पडली होती.काही ठिकाणी तर रस्ते बंद झाले होते.लोकांची गावाकडे पळण्याची घाई सुरु झाली होती.आकाशात विजांच्या भयानक आवाजाने भय निर्माण झाले होते.दरवर्षी वीज अंगावर पडून माणसे मरतात हे लोकांना माहीत असल्यामुळे लोक विजेला खूप घाबरतात.
ग्रामीण भागत वीज झाडावर पडते.जनावरांच्या अंगावर पडते हे माहीत होते.पायाळू माणसाला विजेचे भय असते म्हणून दरवाज्यात लोखंडी पकड ठेवत असतात.त्याचे कारण म्हणजे वीज घरावर पडत नाही.घरात येत नाही.पायाळू माणसाची घरचे कुटूंब काळ्जी घेत असे.कारण पायाळू माणसावर वीज पडते.त्यामुळे पंच धातूचे कडे पायात घातले जायचे.वीज जनावरांच्या अंगावर पडू नये म्हणून लोक गुरे लगबगीने गोठ्यात बांधत होते.माणसे आपापल्या घरावर प्लास्टीकचा कागद पसरून बांधत होते.सगळ्या गावात काळ्या ढ़गानी गावकर्याना सावध केले होते.जो तो नेहमीपेक्षा शेतातून लवकर गावात येत होता.जे शेतातच रहात होते ते काम बंद करून भजी तळण्याच्या तयारीत होते.कुणीतरी कोंबडीचे मटन खाणार होते.काहीजण मासे व खेकडे पकडण्यासाठी तयार होते.
पावसात त्यांचे सगळे ठरले होते.त्याच काळात वीज गेली होती.त्यामुळे घरात अंधार झाला होता.मग काहीनी मेणबत्त्या पेटवल्या.काहीनी घरात चार्जर केलेली लाईट चालू केली होती.
घरात ओसरीत शेणाच्या गोवऱ्या होत्या. लाकडे होती.ऊ साच्या खोडक्या होत्या.ही सर्व व्यवस्था आजही खेडे गावात आहेत.कारण gas जरी आला तरी लोक तो जास्त वापरत नाही. पाहुणे आले तरच वापरतात किंवा स्वयंपाकापुरता वापर करतात.पाणी चुल्हीवर तापवतात. पाऊस सुरु झाला होता.सतत आठ तास पाऊस सारखा पडत होता.गावच्या आजूबाजूचे ओढे,नाले,खड्डे तळे खोल पाण्याने भरले होते.शेतात चिखल झाला होता.तो तुडवत गावकरी,शेतकरी,मजूर,स्रिया सारे गावाकडे येत होते.पायात चपला नव्ह्त्या.तरीपण इचू क
ाटयाचे,सापाचे भय त्यांना अजिबात नव्हते. सारा पाऊस त्यांनी अंगावर घेतला होता.कपडे अंगाला चिटकले होते.गावातील व मळयातील घरांमध्ये लवकरच चुल्ही पेटल्या होत्या.कालवण भाकरी नेहमी पेक्षा लवकर झाले होते.पण चुल्हींचा धूर एवढा भयानक होता की सारखे डोळ्यातून पाणी यायचे.पण काय करणार त्यावेळी बाहेर पडणे म्हणजे भिजणार.सर्दी,डोकेदुखी,तापाला आमंत्रण.म्हणून घरचे बाहेर पडू देत नव्हते.
एकदाचा पाऊस पडला.गावभर पाणी वाहू लागले.शेतकरी पहिला पाऊस पडल्याने आनंदी झाले.मनात आशा पल्लवित झाल्या होत्या.उद्याचे जगणे पाऊसाच्या भरवशावर होते.दु:खी मने आतून सुखी झाले होते.शेतीच्या कामासाठी अवजरांची शोधाशोध सुरू झाली होती.समाधान असलेल्या बळीराजाला कष्टाची हिंमत वाढली होती.त्याचे सारे कुटूंब त्याच्या मदतीला सालभर तयारीत होते.गाई,म्हशींना चारा मिळेल.तिच जनावरे दूध देतील .त्यावर घर खर्चाला व मुलांच्या शिक्षणाला आधार होइल.असे सर्व स्वप्न बळीराजा पाऊसाच्या भरवशावर पूर्ण करणार होता.पाऊस म्हणजे सारे वैभव ही आजही शेतकरी राजाची दौलत आहे.सोन्यानाण्या पेक्षाही त्यांना पाऊस त्यांच्या जीवनात फार मोलाचा असतो.
पावसाळ्यात वाहत असलेल्या पाण्यात अनेक जण मासे,खेकडे पकडून आणतात.जंगलातील अनेक भाज्या ह्या पावसाळ्यातच येतात.अनेक आदिवासी बांधवाचे पोट पावसाळ्यात आलेल्या भाज्यांवर चालते.त्यांचीही चूल पेटते.उदरनिर्वाह चालतो.गरीबांचा आधार पाऊस आहे.पाऊस नाही तर पाणी नाही म्हणजे पाऊस जीवन आहे.पावसाळ्यात सर्व रान हिरवेगार पाहून मन आनंदीत होते.पक्षी,प्राणी,सारी सृष्टी आनंदीत होते.सुकलेल्या झाडांना,वेलींना परत हिरवी पाने फुटतात.सारे शिवार फुललेले पाहिले की मनात जगण्याची आशा निर्माण होते.सर्वजण पाऊसामुळे दु:ख विसरले होते.
पक्ष्यांचा निवारा तयार होतो.म्हणून पाऊस म्हणजे गरीबांचा पिता होय.गरीबांची सावली,गरीबांचा आधार.पाऊस पडल्यानंतर आकाशातील इंद्रधनुष्य जणू सप्तरंगांचे निसर्गाने दिलेले वरदान म्हणावे लागेल.सगळ्या सृष्टीला जणू आनंदाची दौलत म्हणावी लागेल. हिरवेगार डोंगर पावसाचे स्वागत करत होते.त्यांना ढग भेटायला यायचे व भरभरून अंघोळ घालायचे.
त्यांत काही काळे व काही कापसासारखे असायचे.ढगांमध्ये सुद्धा अनेक कलाकृती लपलेल्या असायच्या.काही ढग सस्या सारखे दिसायचे तर काही ढग वाघासारखे दिसायचे. अनेक प्राणी, पक्षी, मानव, सृष्टी त्यांच्या काल्पनिक गुणाना वाव देत होते.आपल्या कल्पनेप्रमाणे हवे तसे ढगात अनेक रुपे पहायला मिळायची.