Manish Vasekar

Thriller

1.0  

Manish Vasekar

Thriller

पावसाळी करामती

पावसाळी करामती

2 mins
16.2K


पाऊस.

महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी सध्या उत्तम पाऊस पडतोय. कवी लोकांना नवनवीन कविता करण्याच स्फुरण चढलंय. होतकरू ट्रेकर्स वर्षाऋतू सहलीचे नियोजनकरण्यात मग्न आहेत. आणि असं बरच काहीस पावसाळी रेगुलर चालू आहे....

आज मी थोडं (नव्हे बरचस) मागे जाऊन लहानपणीच्या पावसाळी आठवणीत रमणार आहे. पाऊस पडला की वाहत्या पाण्यात कागदी नाव सोडून त्याच्या मागे धावणे मला फारच सोज्वळ वाटत. ह्या व्यतिरिक्तही बरेचपावसाळी खेळ (करामती) आहेत. काही करामती तुम्हीअनुभवल्या असतील, काही माझ्या गावी पण नसतील (त्या तुम्ही कॉमेंट मध्ये लिहू शकता). माझं परभणीतील बालपण धमाल होत, अगदी पनास पावलावर असणाराआणि सध्या न वाहणारा ओढा त्या वेळी कमीत कमी पावसाळ्यात तरी तुडुंब असायचा, अगदी एखाद्या छोट्या नदीला लाजवेल असा.

मी अनुभवलेल्या काही पावसाळी करामती इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्या तुम्हाला तुमच्याबालपणात घेऊन जावो हीच इच्छा.

१. शुद्ध शाखाहारी घरातील आमची पाच-सहा जणांचीटोळी. वाहत्या ओढ्यातुन प्लास्टिक पिशवीत इवलुशे चमचमणारे मासे पकडत असू. (सध्याच्या प्लास्टिक बंदी मुळे हि मज्जा पण आता धोक्यात येणार , तर असो).मासे पकडण्यात अकुशल असण्याऱ्या आमच्या पिशवीत फार-फार तर एक-दोनच मासे सापडायचे. पारदर्शी पिशवीतील सुंदर चमचमणारी मासे बघण्यात जी मज्जा आहे ती बहुधा त्यांना खाण्यात नसावी. ह्याशिवाय डराव-डराव ओरडणे बेडूक आणि हेलिकॅप्टर नामक कीटकपक्षी पकडण्यात आमचा छान वेळ जायचा.

२. लहानपणी आमच्या पायात शक्यतोर लखानी स्लीपर चपला असायच्या. पावसामुळे भरपूर चिखल झालेल्या मेदानातून थोडं अंतर चालून गेल कि चपलांची जाडी सहा-सहा इंच वाढायची आणि मग चालणं अवघड होऊन जायच. या खडतर वाटचालीतून मिळणार आनंद खरंच अफलातून असायचा ......

३. रस्ते. त्याला जोडून येणारे जीवघेणे खड्डे हे तस प्राचीन काळापासून जपून ठेवलेली एक संस्कृती आहे. पावसाच्या पाण्याने हेच खड्डे छोट्या मोठ्या डबक्यातरूपांतरित होयाचे. चिखलाने माखलेले पाय आणिचिखल-चपला (मड-स्लीपर) ह्या डबक्यात धुतल्याने,खर सांगतो आम्हाला तरी कधी स्किन इन्फेक्शन झाल्याच मला आठवत नाही.

४. कच्या रस्त्यातील अवघड ठिकाणी घसरडा रस्ता,मुदामहून जास्तच घसरडा करून, त्यावरून जाणारीजनता सपशेल पडताना पाहण्यात आम्हाला कुठलंचपाप वाटत नसे.

५. कुठल्याही फिफा नियमाशिवाय, पाऊस चालू असतानाही खेळला जाणारा फुटबॉल आणि तो खेळताना रपारप पडणारे आम्ही अगदी रोनाल्डो- मेस्सीची पातळी गाठायचो. गज-खूपशी हा असाच एक खास खेळ. पावसामुळे क्रिकेटसाठी अयोग्य झालेल्या मैदानातं हा गजखुपशी उत्तम रित्या खेळता येतो. हा खेळ खेळताना आम्हाला दुपारची संध्याकाळ कधी झाली हेही कळायचं नाही.

६. कृत्रिम पाऊसाचा शोध खर तर आमच्या खेळण्यातून लागलाय असच माझं ठाम मत आहे. बदामाचं किंवा तसच भरगच्च पान असलेले झाड पाऊस पडून गेला तरी भरपूर पाणी जोपासून ठेवत. इप्सित मित्र त्या झाडखाली आला कि ते झाड हालवून त्याचासोबत एक तर स्वतः भिजायचं नाही तर झाडाला दगड मारून फक्त त्याला भिजवून काढायचं, यातील गंमत ते अनुभवण्यातच खरी आहे ...

तुमच्या बालपणातील असे कैक पावसाळी अनुभवआणि करामती तुम्हालाही आठवतील, यातच माझेसौख्य सामावले आहे. धन्यवाद.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller