Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Manish Vasekar

Tragedy


3  

Manish Vasekar

Tragedy


गॉड इज ग्रेट

गॉड इज ग्रेट

3 mins 878 3 mins 878

 

दीड तासापासून ती मेकअप करण्यात गुंतली होती पण मेकअप करत असताना देखील तिची बारीक नजर तिच्या मोबाईलकडे होती. एव्हाना तिचा सुंदर मुखडा अप्सरा रूप धारण करून इतरांना मोहित करण्याइतपत नक्कीच झाला होता. ओठाला लालीचा शेवटचा हात फिरवत तिने मोबाईल हातात घेतला आणि तिच्या नाजूक बोटांनी ती मोबाईलवर हळूवार हात फिरवत होती.

आता तिच्या ध्यानात आलं होतं की मोबाईलची रेंज बिलकुल नव्हती गदी तिच्या जवळच्या दोन्ही सिमची आणि म्हणूनच तिला इतक्या वेळापासून एकही कॉल आला नव्हता, एखादा यसएमएस देखील नव्हता. ती थोडी बेचैन झाली. बऱ्याच वेळापासून तिचा फोन बंद होता आणि हे तिला आत्ता समजत होतं. मोबाईल बंद असल्याने तिचा जगाशी तात्पुरता का असेना पण बाहेरील जगाशी संपर्क तुटला होता.ती थोडी खचली होती, घाबरली होती. इतका वेळपासून ती संपर्क शिवाय असण तिला परवडणारा नव्हताच, महत्त्वाचा फोन मीस झाल्याने तिचे कदाचित नुकसान झालं असेल, या शंकेने ती थोडी खट्टू झाली. तिला या आधुनिकीकरणचा मग थोडा घुसा आला. आपण असे या संपर्क साधनावर म्हणजे मोबाईल विसंबून राहतो आणि मग ते असे धोका देतात आणि मग विनाकारण नुकसान सोसावं लागतं.

तिला उगाच पूर्वीचे दिवस आठवले, मोबाईल फोन नव्हते तेव्हाचे. ती अशीच आवरून नटून-थटून नाक्यावर सिग्नलजवळ उभा राहायची आणि एखादं कारवाल प्रीमियर कस्टमर, एखादा सेठजी गटवायची. त्यावेळी ती बरीच जवान, आणि आकर्षक होती त्यामुळे रोजचं कस्टमर मिळायचच, आणि ते ही नक्कीच चढा भावात!हळूहळू धंद्यात जम सल्याने, आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. पैसा आल्याने तिने एकेक करत घरात गृहोपयोगी वस्तू जमवल्या, मग चैनीच्या वस्तू ही जमल्या. धंद्यात बराच पैसा असल्याने तिला तिच्या घरी आई-वडिलांनाही बिहारला नियमित पैसे पाठवता येऊ लागले.

मग 'वक्त की नजाकत' समजून तिने मोबाईल विकत घेतला आणि ती रीतसर एक कॉल-गर्ल झाली. मोबाईलची सुविधा तिला फार गोड वाटू लागली. आता तिला चौकात उभा टाकायची गरज नव्हती. त्यामुळे आपसूकच फालतू फुकटचा त्रास कमी झाला होता. बरचस कष्टही वाचल. आलेला फोन उचलला, बोलाचाली झाली आणि डील पटलं तर पुढच्या गोष्टी आणि सर्व अगदी बसल्या जागी.

पण हे आता एक नवीन संकट, मागच्या दोन तासापासून. तिच्या फोनला रेंज नव्हतीच. सो नो कॉल, सो नो बिझनेस. नक्कीच तिला या एक-दोन तासात तिच्या नेहमीच्या एखाद्या दुसऱ्या कस्टमरने तरी कॉल केलाच असेल आणि मग कॉल न लागल्याने त्यांनी इर्षा इतरत्र शमवली असेल.ती थोडी बावरली, असा संपर्क तुटत राहिला तर हातचा बिझनेस जायची भीती आता तिचं मन कुरतडत होती.

इतक्यात तिच्या फोनला रेंज आली आणि दुसऱ्या क्षणाला फोनही आला . फोन तिच्या दहा वर्षाच्या मुलाचा होता. अंधेरीच्या सुंदर नगरच्या घरच्या लैंडलाइन तो किरटे आवाजात ओरडत होता, मम्मी तू आज घरी लवकर ये, नांना-नानी आले आहेत घरी. तिच आई-वडील गावाकडून थेट इथे घरी पोहोचले होते. हे कळल्याने ती काही वेळ शुद्ध हरवून बसली होती. ती तिच्या पोराच्या सारख्या हॅलो-हॅलो बोलल्याने पुन्हा जागी झाली. मग तिच्या ध्यानात आलं, फोन बंद होता म्हणून बरं नाहीतर आपण कुठेतरी कस्टमर सोबत अडकलो असतो आणि मग पंचायत झाली असती. तिला तस मलिन अंगाणे आई समोर जायची लाज वाटली आसती. म्हणतात ना 'देव करतो तेच योग्य आसत' तिला ह पूर्णपणे पटल. याही परिस्थितीत तिला देव असल्याची प्रचिती आली आणि तो देखिल "गॉड इज ग्रेट"
Rate this content
Log in

More marathi story from Manish Vasekar

Similar marathi story from Tragedy