गुलाबी सून
गुलाबी सून


गुलाबी सून
"अकलेचे कांदे साले!! नीट बघायचं नाही आणि मग गोत्यात अडकले कि धावत येतात. पाटील साहेब! पाटील साहेब!! म्हणून विनवण्या करायाच्या" पाटील गावच्या हेड मास्तरला सांगत होते.
हेड मास्तर, भालेनी जमेल तेवढ्या मृदू आणि विनयी स्वरात विचारले "साहेब, रागावू नका पण काय झालं मला खरंच उमजत नाही"
पाटील आपल्या झुपकेदार मिशाला पीळ देत बोलले "अहो, हे गावकरी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक, आम्हाला काही विचारायचं नाही, काही सल्ला मसलत नाही. आणि चार दिवस मोठे पण मिरवायचं आणि मग थोबाडावर पडून तोंड लाल करून घ्याचं, माकडतोंडे! "
भाले पुन्हा घाबरत घाबरत "साहेब पण हे म्हणजे ते .... कोण !"
पाटील खेकसले "अरे हा श्रीधर मोरे , काडीची अक्कल नाही आणि मिजास आमदाराची! त्याला बोललेलो, ह्या इंगळे गावचे लोक एकदम मेंगळे, सोयरीक करू नकोस, ऐकलं नाही. म्हणतो कसा ‘पाटील साहेब आता काळ बदलला, आणि लोकही! तेव्हा तुम्हाला काळजी नको, आम्ही समर्थ आहोत’ मी म्हणल बर. बघा काय झालं, दोन वर्षात पोरगी परत घरी, आणि तिचा नवरा पण. फुकट झोडणार आता घरजावई होऊन"
भाले ढेरीवर हाताची चॊकट करून आणि तोंड वासून ऐकत होता.
"अहो मास्तर, तो श्रीधर मोरे येणार आता. मला म्हणतो, साहेब आमच्या जावायाला तुमच्या कारखान्यात चिकटवा, चांगला इंजिनीयर आहे पण घरी बसून उगीच पोरीला तरास देताय."
"आता हा श्रीधर पण कुठे जाणार, माझ्या शिवाय त्याला कोण मदत करणार, बघतो काही तरी. बरं, ते मरू दे. मास्तर शाळा काय म्हणते, सगळं ठीक ना. आजच्या देवगिरीने मी मुंबई ला चाललोय, यंदा धनंजय फायनल ला आहे, आपला धनंजय आता इंजिनीयर होणार, इंजिनीयर साहेब"
“काही नाही साहेब येरीच आलो होतो आणि शाळा उत्तम चालू आहे. धनंजय तर आपल्या शाळेचा हिरा आहे, माफ करा तो आपल्या अख्या गावाचा हिरा आहे. गावाचं नाव नक्की चमकावणार" भालेचं प्रवचन ताडत गुलाबराव बोलले "बर बर, ते मरू दे. मग बायको पोरं कसे आहेत, थोरला पोरगा आजारी होता ना, तो कसा आहे"
"सर्व उत्तम साहेब, मुलाची तबियत उत्कृष्ट सुधारते, अगदी छान" भालेचं हे बोलणंही पूर्ण करू न देता पुन्हा गुलाबराव बोलले "बरं, ते मरू दे !"
भाले घाबरून लगेच "पण साहेब मुलाची तबियत सुधारते, मरू का देऊ"
गुलाबराव थोडे शांत झाले आणि ‘ठीक आहे मग निघा’, म्हणून स्वतः उभा ठाकले.
गुलाबराव पाटील गावच मोठ प्रस्थ. सुरवातीच्या उमेदीच्या वयात सरपंचगिरी करून झाल्यावर मागील दोन टर्म झड पी सदस्य आहेत. या वेळी तर सभापती होणार होते पण ऐन टाइमवर दगा फटका झाला, आणि पद थोडक्यात हुकल. बायकोच्या अकाली निधनानंतर त्यांनी धनंजय आणि निरंजनाला छान सांभाळल . कामाच्या रगाड्यातून मुदामहुन वेळ काढून त्यांनी आपल्या पोरांवर अगदी नीट लक्ष दिले, त्यांना कशाची कमी पडू दिली नाही. निरंजना ला डॉक्टर बनायचं होत, ती आता औरंगाबादला घाटी मध्ये एम बी बी एस फर्स्ट इयर ला आहे. धनंजयला मुंबईला जाऊन आता तीन साडे तीन वर्ष झाली असतील. धनंजय चा पाटील साहेबांवर खूप जीव, नुसता ‘बाबा बाबा’ करणार. त्यांना विचारल्या शिवाय तो काहिही करत नसे. विठ्ठलाच्या कृपेने गुलाबराव सुखी संपन्न होते. 'लात मारील तिथे पाणी काढील' असे नशीब असलेले गुलाबराव राजकारण, समाजकारण या क्षेत्रात सक्रिय होते. गावकऱ्यांसाठी रोजगार मिळवा म्हणून त्यांनी दोन वर्षा पूर्वी एक कारखाना टाकला होता. तो हि जोमात चालत होता. त्यांना गावाची आणि गावकऱ्यांची विशेष ओढ होती. ते प्रत्येक गावकऱ्यांच्या सुखदुःखात सहभाग घेत. कुणावर संकट आल तर ते जातीने लक्ष देऊन निस्तरावत. ठरल्या प्रमाणे गुलाबराव देवगिरीने रात्री मुंबई ला निघाले आणि माटुंगा गाठून तडक धनंजय च्या रूम मध्ये दाखल झाले. धनंजय आणि गुलाबराव मग प्रातःविधी उरकून चहा - नास्ता करायला गेले.
गुलाबरावानी चहा च घोट घेत घेत पत्ता टाकला "धनंजय, आता पुढे काय करायचं, इंजिनीयर होऊन आपला कारखाना आणि आपल गाव सांभाळल तर मला आनंद होईल. पण जर काही दुसरा प्लान असेल तर ते सुद्धा आपण बघू"
धनंजय आदराने बोलला "अण्णा मला पण गावकऱ्यांची सेवा करायची आहे, मी तुमच्या शब्दा बाहेर नाही, तुम्ही म्हणसाल तसं होईल, पण अण्णा....."
गुलाबराव "पण ... पण काय लेका , काय झाल बोल?"
धनंजय विनंतीस्वरात " अण्णा मला MS करायचा, मी अमेरिकेतल्या मोठं मोठया युनिव्हर्सिटीत फॉर्म पण भरलेत, आण्णा मला अमेरिकेला जायचे आहे"
गुलाबराव एकदम शांत झाले आणि उभा टाकून त्यानी थोड्या चढत्या आवाजात विचारले " आणि मग, ते शिक्षण झाल्यावर परत येणार कि तिकडेच बस्तान मांडणार" धनंजय ने उभा टाकून "अण्णा असं कसं, मी फक्त दोन वर्ष तिथे असेल, MS झाल कि लगेच परत गावाकडे! नवीन टेकनॉलॉजि शिकून आपल्या कारखान्यात वापरीन"
गुलाबरावनी नाराजी सुरात होकार दिला "आणि पैसा किती लागेल?"
धनंजय उत्साहात येऊन "नाही अण्णा, स्कॉलरशिप मिळेल, फार नाही फक्त जाण्याचा खर्च तेवढा लागेल, तो हि मी जमा केला आहे. आण्णा, आय लव्ह यु, तुम्ही खूप चांगले आहात, थँक्यू, थँक्यू वेरी मच"
धनंजय हुशार होताच, त्याला एका चांगल्या युनिव्हर्सिटी मध्ये MS ला ऍडमिशन मिळाले. ठरल्या प्रमाणे तो अमेरिकेला MS करण्यासाठी निघाला. निरंजना आणि आण्णा स्वतः त्याला निरोप देण्यासाठी एअरपोर्टला मुंबईलाही आले.
पावसाळा,वाळा आणि उन्हाळा ऋतुचक्र, ते तर देवालाही थांबले नाही. चक्र दोन वेळा फिरल, दोन वर्ष कसे गेले सांगण्यात मतलब नाही, तो आपला खरा फोकस ही नाही. ह्या दोन वर्षात निरंजना आता डॉक्टरी च्या अंतिम वर्षात आली होती आणि पॉसिटीव्हली धनंजय चे पण MS पूर्ण झाले असेलच. तसा तो स्कॉलर होताच. अधूनमधून तो गुलाबरावांना फोने करून खुशाली ही कळवत असे. पण मागचे चार पाच महिने धनंजय चा न फोन, ना काही निरोप.
‘धनंजय चा अश्यात काही निरोप आला नाही, मागच्या वेळी आपण फोने, तेव्हा हि तो खूप गडबडीत होता. काय अडचण असेल त्याला, का अपल्याला बोलण्यासारखे त्याचकडे आता काही नसेल का? धनंजयनी जाता ना कबूल केलं होत कि MS झाल्यावर, परंपरेप्रमाणे तो गावाकडे येऊन गावाची सेवा करणार, का हे त्यांनी आपण त्याला अमेरिकेला जाणायची परवानगी द्यावी म्हणून होत, नाही नाही असं नसेल.’ अशा विचारात मग्न होऊन ते आपल्या ग्यालरी मधील अराम खुर्चीत बसले होते. आणि अचानक फोन खणखणकला, गुलाबरावांनी रिसिव्हर उचला.
तिकडून थोड्या अवकाशाने "अण्णा हॅलो, कसे आहात, मी परत येतोय आणि ते हि जोडीने! आहे ना सरप्राईझ!!"
गुलाबराव खडबडले, त्यांना नीट समजले नाही, आभास असेल असे वाटून, "हॅलो, हं कोण"
"अण्णा मी धनंजय, मी परत येतोय. आणि हो तुमच्या सूनबाई ला घेऊन येतोय, लग्न जरा गडबडीत झालं त्या मुळे कळवता नाही आलं"
हा एवढा "जोर का झटका" येऊन हि गुलाबराव उभे होते हे त्यांच्या रोजच्या प्राणायाम आणि योगासनांमुळे. पण गुलाबरावचा पारा आता चढला होता, मोठया आवाजात ते ओरडले "काय धनंजय, अशी कोणची गडबड झाली, काय प्रकरण काय? मला हे लग्न मान्य नाही, तुझ्यालग्नाचं ठरवायला तुझा बाप आणखी जिवंत आहे. तू ताबडतोब इकडे ये"
धनंजयनी या रविवारी येणार आहे हे कळवून टाकले आणि ते ही जोडीने - कायमच.
गुलाबराव सुन्न झाले त्यांनी लगेच निरंजनाला फोन करून बोलवून घेतले आणि रमेश ला फोन लावून हा सगळा वृत्तांत सांगितला.
अरे हो सांगायचं राहून गेलं, रमेश म्हणजे धनंजय चा मामेभाऊ, अतिशय हुशार, प्रेमळ, समजूतदार आणि सध्या परभणी मध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत. गोष्ट काल्पनिक असल्यामुळे नगरसेवक प्रेमळ आहे असं आपण गृहीत धरायला हरकत नाही.
रमेश गुलाबरावांचा खास होता, रमेश गुलाबरावांना आपला राजकीय गुरु मानायचा. रमेश लगेच गावाकडे आला आणि गुलाबरावां भेटून त्यांना शांत होऊन हे प्रकरण समंजसपणे निस्तरण्याचा गेम प्लान ठरवला.
लागलीच त्याने धनंजय ला फोन करून मुली विषयी विचारपूस केली. लिसा, लिसा नाव होत तीच.MBA ग्रॅजुएट, चांगल्या पगाराच्या नौकरीवर पाणी सोडून आणि तिच्या आई पासून, साता समुद्र पार, ती धनंजय सोबत राहण्यास तयार होती. तीच खरं प्रेम होत धनंजयवर. वाह छान. आणि धनंजयनीच आता रमेश ला गुलाबरावांना समजून सांगण्यास सांगितलं.
आता खरी कसौटी रमेशची.
रमेश “मामा धनंजय चांगला मुलगा आहे, त्याची पसंत चांगलीच असणार. त्या मुलीची खरंच काही तरी अडचण असेल, म्हणून त्यांनी तिच्याशी असं गडबडीत लग्न केलं असेल, श्री कृष्णा सारखं."
गुलाबराव सवयीप्रमाणे रमेशच बोलण ताडीत बोलले " काय कृष्ण, अरे आपल्या कुवती प्रमाणे वागावं, आणि मला सांग अशी कोणची गडबड झाली होती?"
रमेश हसून बोलला "आता हे मी त्याला आल्यावरच विचारीन, पण मला हे सांगायचं की वाहिनी सुंदर आणि समजूतदार असणार, अगदी माझ्या सारखी"
गुलाबराव साशंक होऊन बोलले "रमेश तू कुठल्या बाजूनी आहे हे फिक्स कर पहिले, आत तू त्याची वकिली करतोस. मी पुन्हा सांगतो, हे लग्न मला मान्य नाही"
रमेश लगेच बोलला "वकिली नाही मामा, आता हे बघा, ती पोरगी तीच घरदार, देश सोडून आपल्या गावात कायमच राहायला येणार. मला खात्री आहे आपल्या धनंजयनी तिला आपल्या गावची आणि समाजसेवेचीही पूर्ण कल्पना दिली असेल. ती तीच सर्व आर्थिक आणि भोतिक सुखानी संपन्न असणारा देश आणि जगणं सोडून आपल्या गावी राहायला येतेय."
रमेश नेगोसेशन आणि कॉंविंसिन्ग मध्ये एक्स्पर्ट होता. त्याला आता मामा ला हे सगळं पटतय हे लक्षात येत होत.
तसं हि चांगल्या माणसाला चांगली काम आणि चांगल्या गोष्टी समजून घेणं फार अवघड नसत. पण तरी गुलाबरावांना धनंजय चा राग आला होता.
रमेश बोलला "मामा, तुमच राजकारण आणि समाजकारण आता आंतरराष्ट्रीय होणार. असं हि, देश पातळीवर एक मोठा पक्ष चालवणारी ही एक परदेशी मुलगीच आहे ना, ती पण आपला पक्ष आणि देश बरोबर हाकतच आहेच ना, आपण सर्वानी तिला मान्य केलंय, मग"
गुलाबराव त्याच्या कडे मोठया प्रश्नार्थक नजरेने बघत होते. ते आता थोडे नरमल्या सारखे वाटत होते. हीच संधी साधून रमेश हसत म्हणाला "आणि मामा, तुमची सून अख्या गावात नाही तर पूर्ण परभणीत सर्वात सुंदर असणार. अगदी नाजूक मस्तानी सारखी. पूर्ण गावात, तालुक्यात तिला एक वेगळाच मान-सन्मान भेटणार. आठवतंय मागच्या वेळी त्या वॉटर वाल्या NGO च्या इन्स्पेकशनसाठी, ते दोन फिरंगी लोक आले तेव्हा सगळं गाव त्यांच्या मागे मागे फिरत होता, अगदी पंढरीच्या वारी सारखा"
गुलाबरावांनी लगेच विचारलं "आपल्या नाशिक च्या सोनी पेक्षा गोरी असेल का ?"
रमेश "अहो मामा, वहिनी कुठे आणि ती सोनी कुठे! अहो वहिनी समोर, हि तुमची आपल्या स्वतःला सर्वात सुंदर समजणारी सोनी म्हणजे अगदीच कुरूप. बोललो ना वहिनी म्हणजे सर्वात सुंदर असणार. एकदम इंटरनॅशनल."
रमेश नि प्राण पणाला लावून प्रयत्न केले आणि त्याला यश ही मिळेल अशी अपेक्षा होती. रमेश रात्रीच जेवण करून निघाला.
रात्री गुलाबरावांनी निरंजनाला फोन केला आणि तिला दादा वहिनी च्या स्वागतला लवकर ये म्हणून सांगितलं. निरंजनाला हि नवल वाटलं, पण ती म्हणाली ‘झालं ते बरं झाल, अण्णा नि लवकर स्वीकार केलं.
गुलाबरावांना आता जरा बरं वाटत होत, ते शांत चित्ताने आपली सून कशी असेल, ती किती गोरी असेल ह्याची कल्पना करत होते. आणि हो, हि गोष्ट त्यांच्या लक्षात च अली नाही. आपले होणारे नातू ते किती गोरे होतील, निळे निळे डोळे. ते सोनेरी केस. अगदी प्रेमानी सहज जरी हात पकडल तरी ते लाल होईल. आपल्या गावच ऊन त्यांना सहन होईल का ? आपल्या जरा विशेष काळजी घ्यावी लागेल. असं बरच काही पॉसिटीव्ह आणि छान छान आता त्यांना वाटत होत.
दोन दिवसात सर्व स्वागताची तयारी करावी लागली. परभणी पासून गावापरेंत नाक्या नाक्या वर स्वागताचे बॅनर आणि होर्डिंग्स लावले गेले. गुलाबरावांनी त्यांचा बंगला लख्ख चमकवून टाकला. गावाचा हमरस्ता गावकऱ्यांनी झाडून धुवून काढला. गुलाबरावांची सून म्हणजे पूर्ण गावाची सून, ती पण फॉरेनची पाटलीन. रस्त्याच्या दुतर्फा संस्कारभरती रांगोळीची सजावट केली. बंगल्यासमोरही मोठी रांगोळी काढण्यात आली. गावात भर दिवस ढवळ्या दिवाळी साजरी होणार होती. फटक्यांची-अतिशबाजीची पण तयारी करून ठेवली होती. बॅंडवाले सज्ज होते. समस्त गाव स्वागताला सज्ज होता.
रमेश, निरंजना, गुलाबरावांचे सर्व आप्तेष्ट जातीने गावात हजार होते. गावातील प्रतिष्टीत हि तिथे आले होते. एवढ्यात रमेश ला धनंजयचा फोन आला. "पाच मिनटात घरी येऊ" .
गुलाबरावनी मोठा स्वास घेतला आणि बंगल्याच्या पोर्चमध्ये येऊन फाटका कडे नजर लावली. गाडी मध्ये आली आणि तो सूनमुख दर्शन सोहळा खूप नजीक आला. पहिले धनंजय गाडीतून उताराला आणि त्यांनी गुलाबरावच्या वाकून पाया पडल्या.
धनंजय नी गोड आवाज दिला "लिसा, प्लिज कम”
आणि लिसा, गुलाबरावांची सूनबाई अनावरीत झाली. ती आता सगळ्या ना दिसत होती. फिकट निळ्या रंगाचासुरेख झगा, गळ्यात चम्मचम्म करणारा हिऱ्यांचा नेकलेस , उंची बरोबर धनंजय एवढीच, अशी ती कृष्णवर्णी लिसा सर्वाना ‘हॅलो हॅलो’ करत समोर येत होती.
गुलाबराव उंच कड्यावरून दगड पडावा तसे मनोमनखाली पडत होते. त्यांनी एक कटाक्ष रमेश कडे टाकला. तो त्याचे तोंड लपवत लपवत "पोपट ! पोपट !!"असं म्हणत होता, मनात.
सर्व गावकरी काहीतर अस्पष्ट कुजबुजत होते, काही बाया खिदळत होत्या.
एवढ्यात गुलाबराव जोर-जोरात बोलले "कलर गेला तर पैसे परत !!! पोरहो फटाके वाजवाकी, बॅंडवाले चालू करा"