Manish Vasekar

Others

2.0  

Manish Vasekar

Others

जोश्या, स्ट्रेचर हमाल

जोश्या, स्ट्रेचर हमाल

7 mins
1.0K 

बिडी पीत पीत जोश्या समोर चाललेल्या कुत्र्यांची दंगा मस्ती बघत होता. बिडी संपते न संपते तोच स्टेशन-वाणी झाली " ऑन ड्युटी आरपीफ आणि स्ट्रेचर हमाल यांनी स्टेशन मास्तर कार्यालयात त्वरित संपर्क साधावा "

जोश्या ताडकन उठला आणि वाऱ्याच्या वेगाने धावून गायकवाड साहेबानं समोर उभा राहिला. गायकवाड साहेब तसा भला माणूस, ते बोलायचं " जोश्या ला फुकट बसून पगार मिळावा हीच मी रोज सकाळी देवाला विनंती करून घरातून बाहेर पडतो, कधी तो ऐकतो आणि कधी जोश्या कामाला लागते"

आज हि जोश्याला कामाला जावं लागणार होत. साहेब बोलले "जोशी साहेब, त्या फास्ट ट्रॅक वर कुणी तरी पडलाय, जा लवकर अटेंड करा, पळा पळा!" जोश्या, त्याचा जोडीदार आणि आरपीफ तिकडे धावले. सतरा-आठरा वर्षाचा कॉलेज कुमार रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत होता. आजून जीवात जीव होता. पण त्याचा काळ आला होता आणि कुठल्याही क्षणी वेळही आली असती. जोश्याला ही वाटत होत हा मुलगा गेला तरच सुटला नहितर आयुष्य भर भोग आहेत त्यालाही आणि त्याच्या कुटुंबाला ही . जोश्या कामात तत्पर होता, त्या सर्वानी त्याला ताबडतोब उचलून दवाखान्यात नेण्याची घाई केली. पण जे घडायचं ते घडलं मुलानी रस्त्यातच प्राण सोडले आणि तो खरतर सुटला. बाकी त्या पुढच्या गोष्टी नेहमी च्या नियमानं प्रमाणे रीतसर पार पडल्या. 

जोश्या, उर्फ सदानंद नामदेवराव जोशी, जातीनेच नव्हे तर कर्मबुद्धीने ब्राह्मण. चुलत्यांनी केलेल्या घातामुळे अचानक रस्त्यावर आलेला जोशी, त्याच शिक्षण पूर्ण करू शकला नाही. जोशी सज्जन आहे, हे खर तर त्याच्या साठी घातक ठरल. पुढे देव कृपेने म्हणा की भोग म्हणा त्याला रेल्वेत काम मिळाल - स्ट्रेचर हमाल. सुरवातीला त्याला ते जखमी देह आणि कधी कधी मृत देह उचलताना चक्कर यायची. त्याच्या पहिल्या अनुभवानंतर तर त्याला जब्राट ताप भरून आला होता. पण आता तो चांगला सरावला आहे. पाच-सहा वर्षाच्या अनुभव नंतर आता कुठली केस जगेल, कुठली भोग भोगेल आणि कुठली संपले हे तो आता अगदी सराहीत पणे सांगू शकत होता. त्याला आता कधी तत्परता करायची ते चांगलं ठाऊक होत.

लहानपणी आई बाप पासून पोरका झालेला असूनही  जोश्या आयुष्याच्या मूळ तत्वांनी खूप संस्कारी वाटायचा, नव्हे तो होता. फक्त त्याच काम, भाषा आणि राहिणीमाना यां मुळे तो गलथान वाटायचा. असं म्हणतात कि देव वरूनच जोड्या बनवून पाठवतो, फक्त पृथ्वीतलावर एकमेकांना ते शोधयच असत. इथे तिने जोश्याला शोधल आणि लग्नासाठी मागणी घातली. जोश्यानी तिला साफ नकार दिला होता. पण ती पण फार हट्टी होती. शेवटी जोश्या तिच्या बेडी मध्ये बंधिस्त झाला. दोन वर्षाच्या संसारात ते दोघे खुप जगले, फिरले, वेळप्रसंगी खुप भांडले. राजा राणी चा संसार अगदी उत्तम चालू होता. भाड्याच् दोन रूम चे घर संगिताने राजवाड्यात रूपांतरित केले होते. संगिता जोशी, तिने जोश्या ला त्याच्या सर्व गुण-अवगुण सगट स्वीकारलं होत. देवा वर विश्वास नसलेल्याला जोश्याच्या घरी संगीताचे देव छान रमत होते. जोश्या कधी एकांतात देवघरात संगीताने ठेवलेल्या देवा कडे बघून हसायचा आणि म्हणायचा “काय देवा, बरं आहे तुझं, फुकट झोडायचं, शांत झोपा काडून मला मात्र कामाला लावायचं, वाह रे तुझं देवपण!  लोकांना तडफडत मारण्यात कसलं आलय तुझ देवत्व”.

राजा राणी चा संसार सुखात चालू होता, पण चका चक हायवे वर अचानक आलेल्या गती रोधका मुळे गाडी आणि त्यातील प्रवासी जसे खडबडून जागे होतात, तसे जोश्या च जीवन एका रिपोर्टनी आभाळ आल्या सारखा काळवंडून गेलं. पोटात दुखायचं कारण झाला आणि संगीता ला डॉक्टर नी काही टेस्ट करायला लावल्या आणि रिपोर्ट मध्ये भयंकर अँपेंडिक्स निघाला. शिवाय ताबडतोब ऑपेरेशनही ही करावं लागणार होत. ऑपेरेशन नाही केल तर संगीताच्या जीवाला धोका होता. अँपेंडिक्स कधीही फुटण्याची शक्यता होती . जोश्या एकदम टेन्शन मध्ये आला. त्याला काय करावे काही कळेना. ऑपेरेशन साठी खर्च हि भरपूर येणार होता साधारण एक लाख रुपय. स्वाभाविक स्ट्रेचर हमाला कडे एवढे पैसे कुठून येणार. जोश्यानी आपल्या ऐपतीनुसार काही पैसे साठवून काही सोन संगीता ला घेतले होते ते मोडून आणि काही इकडून तिकडून उधारीपाधारी घेऊन कसे बसे पन्नास हजार जमवले. पण बाकी रक्कमही काही कमी नव्हती. जोश्या च कामात लक्ष्य लागत नव्हतं. संगीताचं पोटाच दुखणं ही वाढत चाल होत, पोट दुखी खूप वाढली होती. तीच पोटच दुखणं बघून जोश्या फार असह्य होयाचा. संगीताला ही जोश्या साठी खूप वाईट वाटत होत.

जोश्या देवासमोर उभा टाकला आणि देवाला विचारू लागला "काय रे देव ना तू, तुझी पूजा-सेवा केल्यावर भलं होत म्हणत होती संगीता मला. पण तू तर हरामी निघाला, जिने तुझ्या साठी एवढी सेवा केली तू तिच्याच मुळावर निघाला, वाह रे म्हणे देव ...".  तेव्हा संगीता लगेच म्हणाली "अहो तो आपली परीक्षा बघतोय, काळजी करू नका, तो आपल्या पाठीशी आहे आणि तोच मार्ग दाखवील, चिंता नसावी"

जोश्या कुश्चितपणे हसला आणि तडक कामावर निघाला. नित्य नियमाप्रमाणे जोश्या स्टेशन मध्ये आल्यावर वर अगदी छान आरोळी टाकून सर्वाना राम राम ठोकायाचा. जोश्या च्या एन्ट्री ने ऑफिस अगदी प्रफुल्लीत होयच. आज मात्र तो शांत पणे स्टेशन मास्टर ऑफिसमध्ये आला. जोश्या उदास आहे हे गायकवाड साहेबानी हे लगेच ओळखल. त्यांनी आवाज टाकला "जोश्या, काय रे काय झाल, काही टेन्शन बिन्शन?". जोश्या नि नाकार्थी मुंडी हलवून मस्टर वर सही केली. आणि तो कामावर निघायची तयारीत होता तेवढ्यात गायकवाड साहेबानी त्याला आपल्या रूम मध्ये बोलवले.

जोश्या साहेबाच्या रूम मध्ये मान खाली घालून उभा राहिला. साहेबानी हळू आवाजात विचारला "जोशी साहेब काय झाल, असं काय करतोस. काय झालं सांगितल्या शिवाय मला कस कळणार, तू तुझं मन मोकळं कर. काय झाला आहे ते पटापट सांग बरं चल" जोश्या ने आढे वेढ घायला चालू केले पण गायकवाड साहेबानी आपला साहेबीपणा दाखवत जरा वरच्या आवाजात जाब विचारावा तसे जोश्याला खडसावल.

तसा जोश्या घडाघडा सगळं काही बोलला आणि पोलादी समजला जाणारा जोश्या ढसाढसा रडायला लागला. गायकवाडसाहेबाना हि खूप वाईट वाटलं. खरंच जोश्या संगीता ची जोडी त्यांच्या ऑफिसात सुखी जोडी मानली जायची. अगदी द्रुष्ट लागावी अशी, संगीता चा समजूतदार पणा, जोश्या चा इमानी आणि सरळ पणा या मुळे दोघे अगदी सुखात असायचे.

गायकवाड साहेब हि थोडे टेन्शन मध्ये आले. त्यांना हि जोश्याला मदत करायची होती पण जगात सगळी नाटक करता येतात पण पैसाच नाटक करता येत नाही. गायकवाड जरी साहेब असले तरी त्यांची परस्थिती काही आणखी साहेबी झाली नव्हती. घरा मध्ये कमावणारे ते एकटे आणि खाणारे तोंडे मात्र भरपूर होती. गायकवाड साहेब स्वतःच्या संसारासोबत त्यांच्या तीन भावांचे पालन पोषण आणि सगळा खर्च चालवायचे. एवढा सगळं करून त्यांची गंगाजळी मात्र महिन्या अखेरी रिकामी राहायची. तसाही सरकारी इमानी कर्मचाऱ्यांचा महिनाअखेर फार खडतर असतो.

तितक्यात फोने वाजला आणि कुणी तरी डाउन ट्रेन मधून पडल्याची बातमी आली. जोश्या ऑफिस मध्येच होता आणि गायकवाड साहेबानी अनायासे त्याला केस अटेंड करतो का म्हणून विचारले. जोश्या कर्तव्यदक्ष होता, त्यांनी ताबडतोब होकार दिला. आणि लगोलग तो साथीदाराना घऊन तिकडे निघाला. गायकवाड साहेबानाही विचार केला कि आपण हि तिकडे जाऊन यावं. ते हि तडक तिकडे निघाले. कुणीतरी मोठी खादी कपडे वाली असामी ट्रेन मधून पडली होती. गळ्यात मध्ये सोन्याचे गोफ, बोटात आंगट्या आणि भारदस्त वक्तिमत्वच धड पायापासून पूर्ण वेगळ झाल होत. माणूस जागीच ठार झाला होता. जोश्या आणि राम त्या देहाला उचलून स्ट्रेचर वर ठेवत होते. तितक्यात गायकवाड साहेबांची नजर प्रेता च्या हातून निसटणाऱ्या ब्रेसलेट वर गेली. जोश्या आणि इतर कामात मग्न होते आणि आरपीफ बाजूला उभा होता, त्याचे हि तिकडे लक्ष्य नव्हते हे गायकवाड साहेबानी पहिले. गायकवाड साहिबानी लगेच गडबड करायला सुरवात केली "जोश्या फटा फट त्याला हॉस्पिटल घेऊन जा, लवकर! लवकर!" सगळे गेल्यावर गायकवाड साहेबानी हळूच ते ब्रेसलेट खिशात टाकल आणि लगेच ऑफिस मध्ये गेले. तसं त्या वक्ती ला हॉस्पिटल नेण्यात आले आणि मृत घोषित केल. बाकी जे रीतसर करायचं ते रीत सर करण्यात आलं. गायकवाड साहेबानी आपल्या रूम मध्ये जाऊन ते ब्रेसलेट हळूच बाहेर काढल, कमीत कमी अडीच तीन तोळ्याच तर नक्की असणार. गाईकवाडसाहेब खुश झाले. रात्रीच ते ब्रेसलेट मोडून, ती रक्कम घ्यावी असा त्यांनी विचार केला. अनोळखी ठिकाणाहून ते ब्रेसलेट त्यांनी रात्री मोडून रक्कम खिशात टाकली. हे सगळं करताना त्यांनी त्यांच्या मनाचे ऐकायचे नाही हे पक्क केलं होत. हे सगळं आटपून गायकवाड साहेब रात्री उशिरा घरी आले. जेवण न करताच ते बिछाण्यात पडले. झोप त्यांना सहज येणे शक्य नव्हते, ते विचार करू लागले "हे जे पन्नास हजार आज आपण जोश्या साठी म्हणून ढापलेत, ह्यांनी आपल्या घरात आपण काय काय खरेदी करू शकतो. तसं हे सगळं कारस्थान त्याच शिवाय कुणालाच माहित नव्हत. छोट्या भावाला दुचाकी, कि दोन स्वतःची आणि चार भावाची अशी सहा मुलांची वर्षभराची शाळेची फीस - हो नक्कीच, का बायकोला तिच्या स्वप्नातला नेकलेस, का असच काही ....." आणि गायकवाड साहेबाना जर-जर घाम फुटला आणि ते एकदम घाबरले. सकाळ पासून रात्री परेंत हे कांड करताना ते थोडे हि चाचरले नव्हते. असाच विचार करत करत त्यांचा डोळा लागलं.

दुसऱ्या दिवशी मात्र चित्र पूर्ण स्पष्ट झाल, उजाडल्या  उजाडल्या गायकवाड साहेब जोश्या च्या घरी गेले आणि ते पन्नास हजार त्यांनी त्याला सुपूर्त केले आणि म्हणाले "जोश्या आता ऐक आता पुढचा महिना भर तू कामावर येऊ नकोस, सिक लिव्ह टाक. आणि हे बाकीचे पन्नास हजार आजच हॉस्पिटल मध्ये जमा कर आणि डॉक्टरला बोल ऑपेरेशनची तयारी करा. आणि बरोबर पुढच्या महिन्यात आजच्या दिवशी नेहमीसारखा प्रसन्न चेहेऱ्यानी पूर्ण ऑफिसाला राम राम ठोक" आणि दोघे एकमेकांकडे प्रसन्न चेहेऱ्यानी बघत बघत हसत होते.

बरोबर ऐक महिन्यांनी पुन्हा स्टेशन-वाणी " " ऑन ड्युटी आरपीफ आणि स्ट्रेचर हमाल यांनी स्टेशन मास्तर कार्यालयात त्वरित संपर्क साधावा" जोश्या ताडकन उठला आणि वाऱ्याच्या वेगाने धावू लागला.


टीप : कथा काल्पनिक आहे, पण सर्व पात्र हेतुपुरस्कर जाती-धर्मा पलीकडची मानसिकता उमजून घेण्यासाठी संबोधित केल्या आहेत.Rate this content
Log in