Shobha Wagle

Classics

4.0  

Shobha Wagle

Classics

ओढ लावते ही

ओढ लावते ही

2 mins
242


*वाटते वाट ही वेडी जराशी*

*मज ओढुनी नेते थेट घराशी*

*चिमुकली लाल मातीने रंगलेली*

*खेचते मज नीट घराच्या दाराशी*


मुंबई ते गोवा माझा प्रवास झाला बसचा.

रात्रभर झोप नसल्याने जीव खूप थकलेला.

पहाटे बस थांबली तेव्हा गरमा गरम चहा घेऊन मरगळ थोडी गेली होती. 

पणजी हुन माझ्या गावी म्हणजे अजून एक बस पकडायला लागायची. नेहमी भाऊ गाडी घेऊन यायचा पण ह्या वेळी मला त्याला अचानक जाऊन चकित करायचे होते म्हणून असा प्रवास होता माझा.

गावच्या स्टेंडवर बस थांबली की एक लहान रस्ता लागतो व नंतर माझ्या घराकडे जाणारी इवलीशी लाल मऊ मातीची वाट. खरंच मला कळत नव्हतं की मी वेडी झाले की ही वाटच जराशी वेडी आहे!!

जीव माझा थकलेला मरगळलेला तो कुठल्या कुठे नाहीसा झाला. एवढी तरतरी अंगात संचारली त्या लाल मातीच्या वाटेचे दर्शन घडताच !

ही बालपणाची दुडुदुडू मी धावणारी वाट मला आज जरजर घराच्या दाराशी वेड्या सारखी घेऊन जात होती व मी ही तिच्या या खेळात सामिल झाले होते.

घरात जाऊन सर्वांची भेट व चहापाणी झाल्यावर मला माझी मागील दारची वाट हाक मारू लागली. कधी तिला भेटते असे झाल्याने मी अनवाणीच मागील दाराच्या वाटेकडे धावले. ओबडधोबड , दगड गोटे असलेली तरी मला तिचा व तिला माझा स्पर्श हवा हवासा वाटत होता. तळव्याना गुदगुल्या करणारी मऊ लाल मातीची वाट तर येथे थोडे दगड असल्याने तळव्याना टोचणारी वाट तरी आम्हा दोघाना तो काळ अंत्यत प्रिय वाटत होता. एक एक पाऊल उचलून मी टाकत होते. वेडी माझी वाट ही वळत वळत मला विहिरीकडे घेऊन गेली. विहिरीतले कळशी भरून पाणी काढले . ओंजळीत घेऊन तोंडावर पाण्याचा शिडकाव केला पोटभर गोड विहिरीचे पाणी पिऊन घेतले नंतर कळशी पायावर ओतली तेव्हा माझी वाट ही खळखळ करून हसली व पाण्याचा पाट घेऊन धाऊ लागली व तिच्या मागे मागे मी सुद्धा धावू लागले. वाट मला सरळ बागाईत घेऊन गेली. पोफळी, केळी व नारळाच्या झाडीतून जाताना एवढा आनंद मला व माझ्या वेड्या वाटेला झाला होता म्हणून सांगू!!

 इकडून तिकडे व तिकडून इकडे वाटे बरोबरीने बागायत पाहून घेतली. थकवा थोडा जाणवला म्हणून कठड्यावर बसून वाटेशी गप्पा मारत नारळ,केळी व पोफळीचा बहर बघून जीव आनंदला. शांत शीतल हवा मंद बागेचा सुंगध मनाला मोहीत करत होता. तेवढ्यात आईची हाक कानी पडली. मग लाडल्या माझ्या वाटेने मला घरी आणले.


*वेडी वाट माझी मज ओढ लावी जीवा*

*नाही गवसत ती मजला मुंबई शहरात*

*तीज भेटण्यास अधून मधून मीच जात*

*असते माझ्या गोव्याच्या मोठ्या घरात*


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics