kanchan chabukswar

Thriller

3  

kanchan chabukswar

Thriller

नील आयलँड

नील आयलँड

4 mins
271


अंदमानच्या नील आयलँडच्या बेटावरती एक थरारक नाट्य घडत होतं. तसा नील आयलँड हे स्कुबा ड्रायव्हिंग साठी ट्रिपल एक्सजखमेचे व्रण दाखवले जखम फारच प्रसिद्ध होतं. तिथे खाली काचेचा तळ असलेल्या बोटी, किंवा स्वतः डायविंग करून पोवळ्यांच्या भोवती ची प्रदक्षणा, रंगीबेरंगी मासे, जवळून जाणारे विविध रंगाचे कधी कल्पनातीत असलेले मासे.


ट्रॅव्हल कंपनी चा ग्रुप खूपच आनंदात होता कारण की बऱ्याचजणांना पहिल्यांदाच स्कुबा डायविंगचा आनंद लुटता आला. खाली जातानाच येणारे दडपण वरती आल्यावर ती मात्र प्रत्येक पर्यटक एकदम प्रसन्न मुद्रेने मध्ये. माशांचे तरी किती प्रकार, एक मासा चक्क मोराच्या पिसा सारखा होता, तर दुसरा निळ्याभोर रंगाचा, काही मासे चक्क पोपटासारखे दिसत होते कितीतरी वैविध्य काही मासे फुलांच्या आकाराचे होते, कळायचंच नाही की ते मासे आहेत. जवळून जाणारा थवा बघताना फारच मजा येत होती .प्रत्येक पर्यटकांना बरोबर एक गाईड , गाईड च्या हाताला धरून पाण्यामध्ये स्वच्छंद स्वैर पर्यटन करताना सगळ्या पर्यटकांना फारच मजा येत होती. तसे कोरल रीफ म्हणजे पोवळे ताटवे. पण कोरल ला हात लावला तर हातच कापला जात होता की धारदार म्हणून ,गाईड नेहमी बाजूंनी सुरक्षित अंतर ठेवूनच पर्यटकांना होता पाण्यामध्ये फिरवून आणत होता.

 

तसे पाण्यामधले अंतर समजायला फारच कठीण होते कारण दिसतं ते जवळ नसायचं किमान दूर दिसत होतं ते फार जवळ आल्यासारखे वाटायचे. खांद्यावरचे दहा किलोचे ऑक्‍सिजनचा सिलेंडर चे वजन पाण्यामध्ये गेल्यानंतर काही वाटायचं नाही पण नसल्यावरती पर्यटकांची पंचाईत व्हायची, श्वास कसा घ्यायचा डोळ्यांपर्यंत पाणी कसं घ्यायचं नाही किंवा डोळ्यावरती पाणी आल्यावर ती कुठली सिग्नल. कुठले सिग्नल करायचे, कशी करायची, कुठे जाण्यासाठी काय सिग्नल करायचा गाईडचा हात कसा पक्का धरून ठेवायचा गाईड पाठीवर असायचा आणि त्याच्यावर तिथे दोन लोकां सिग्नल ची जबाबदारी एक पर्यटक आणि एक स्वतः.


    रात्रीच्या वेळेस हॉटेलमध्ये जेवणासाठी जेव्हा पर्यटक एकत्र जमले तेव्हा सगळ्यांच्या गप्पांना उत आला होता, कोणी किती प्रकारची कोरल बघितले किंवा कोणी कसे मासे बघितले परत व्हिडीओ काढण्याची देखील सोय असल्यामुळे प्रत्येकाने स्वतःचा व्हिडिओदेखील काढला होता. जेवणाच्या टेबलाच्या तिथे दोन माणस एकदम गपचूप उभे होते डोक्यावरती  टोपी असल्यामुळे त्यांचे चेहरे व्यवस्थित दिसत नव्हते. मॅनेजरनी टाळ्या वाजवून सर्व पर्यटकांचे त्याच्याकडे लक्ष वेधले.


मॅनेजरने त्या दोन माणसांची पर्यटकांना ओळख करून दिली. मॅनेजरनी सांगितलेल्या गोष्टीमुळे सगळीकडे एक भयाण अशी शांतता पसरली. दिवसभराचा उत्साह आणि स्कुबा डायविंगची मजा झाल्यानंतर पण त्या दोन माणसांच्या अनुभवामुळे पर्यटक काहीसे चिंतातूर झाले. वासुदेव आणि समर अशी नावं त्या दोघांची होती. मॅनेजरने आग्रह केल्यानंतर वासुदेवाने आपली गोष्ट सांगायला सुरुवात केली.. पर्यटकांची मोठी बोट बिघाड झाल्यामुळे नील आयलँडच्या तीरावर ती आली होती. कुठूनतरी सारखी तेलगळती होत होती किंवा काहीतरी बिघडले होते. पाण्यात उतरून बघण्यासाठी म्हणून त्यांना पाण्यात काम करणारे मेकॅनिक पाहिजे होते. समर आणि वासुदेव दोघेही प्रशिक्षित स्कुबा डायविंग करणारे गाईड होते. तसेच ते मेकॅनिकदेखील असल्यामुळे वासुदेव समर आणि त्यांच्याबरोबर पाच अजून लोकं पाण्यामध्ये उतरले.


     दोन वर्षापूर्वी झालेल्या सुनामीमुळे सागरामध्ये बरीच उलथापालथ झालेली होती. अंदमानच्या किनाऱ्यावरती कधीही मगरी सुसरी तिथल्या नव्हत्या कारण त्या उथळ पाण्यात राहतात तरी पण सुनामीच्या लाटेमुळे उथळ पाण्यातल्या मगरी देखील अंदमानच्या किनार्‍यापाशी येऊन धडकल्या होत्या. बोट दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकल टीमला याची सुतरामही कल्पना नव्हती. सगळे बिनधास्तपणे ऑक्सीजन सिलेंडर पाठीवर की लावून आणि आपली अवजारे घेऊन पाण्यामध्ये उतरले आणि बोटीला दुरुस्त करण्याचे काम चालू केले. इंधन गळती होत असल्यामुळे आजूबाजूचे पाणी भयंकर तेलकट झालेले होते त्याच्यामुळे पाण्यामध्ये दोन फूटा पलिकडचे देखील काहीही दिसत नव्हते. समुद्रामध्ये जर जलचर पाण्यामध्ये पोहोत असतील तर त्यांच्यामुळे पाण्यामध्ये लाटा उसलत नाहीत त्यामुळे हे सात जण आरामात आपलं काम करत होते.


एवढ्यात कुठूनशी तेवढ्या मध्ये दोन मगरी अचानक चाल करून आल्या, समरच्या टीमला काही कळलेच नाही . अचानक बाजूंनी येऊन दोन्ही मगरीने समर आणि वासुदेव यांचे डोकं स्वतहाच्या जबड्या मध्ये घट्ट पकडले. झालेल्या हल्ल्यामुळे सगळी टीम्स बावचळून केली. गोंधळात पडली. मगरींच्या जबड्यामुळे ऑक्सिजनची नळीदेखील फुटली आता समर आणि वासुदेव ला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. प्रसंगावधान राखून समरन आपल्या हातातला पाना मगरीच्या डोळ्यावरती दाणकन मारल. तसेच दोन्ही हाताची बोटं अंदाजाने त्याने मगरीच्या डोळ्यामध्ये खुपसले. मगरी नि वेदने ने जबडा उघडला आणि समर बाहेर पडला. अजून वासुदेव मगरीच्या तावडीतून होता. आता समर ने स्वतःला सांभाळून दुसऱ्या मगरीच्या डोळ्यावरती प्रहार केले. बाकीच्या टीमने देखील दोन्ही मगरींना नाकावर आणि डोळ्यावर प्रघात केले पण तेवढ्यात एक फार मोठा धोका त्यांना जाणवला. धोका असा की समर आणि वासुदेवच्या डोक्यातून होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे आजूबाजूने आता मगरी त्यांच्या दिशेने येऊ लागल्या होत्या. टीम मधल्या अभिजीत सारंग आणि नीतीने समर आणि वासुदेव ला स्वतःचे ऑक्सिजन लावून पाण्याबाहेर काढले आणि बोटीवरून शिर्डI वरती, त्या दोघांना चढवले. तसेच बाकीची पण मुले पटापट हाताला येणारा दोर पकडून वरती चढली. नवल म्हणजे डोक्यातून वाहणाऱ्या रक्ताच्या वासामुळे तिकडे जवळजवळ पंचवीस मगरी गोळा झालेल्या होत्या. जर का प्रसंगावधान राखून बाकीच्या मुलांनी जर या दोघांना समर आणि वासुदेव ला वाचवले नसते तर सगळीच मुले मगरींचा घास झाली असती. म्हणजे पंचवीस फूट खोल पाण्यामध्ये मगर येतच नाही तरीपण सुनामीच्या तडाख्यामुळे बऱ्याच मगरीं भारताच्या किनार्‍यावरून तिकडे ढकलल्या गेलेल्या होत्या आणि आता त्या भक्ष्याच्या शोधार्थ होत्या.


    वासुदेव आणि समर गोष्ट सांगत असताना सगळ्या पर्यटकांच्या अंगावरती भीतीचे शहारे येत होते. मगरी कधीच खोल पाण्यात नसतात आणि स्कुबा डायविंग करणारे नेहमी अशा ठिकाणी स्कुबा डायविंग करतात, जिथे फक्त मासेच असतात मगरी, कोरल बेटावरती मगरी येत नाहीत कारण त्यांची कापली जातात मग अशा ठिकाणीदेखील मगर हा प्राणी कुठून आला? आणि वासुदेव केवळ प्रसंगावधानामुळे होते त्यांना माहिती होतं की मगरीची कातडी अतिशय जाड असते की तिथे हात पाय आपटून काहीच होत नाही पण मगरीचे डोळे मात्र नाजूक असतात डोळ्यावरती आघात केल्यावर की तिला काहीच दिसत नाही आणि ती जबडा सोडून देते.


    समर आणि वासुदेव जवळजवळ दोन महिने अंदमानमधल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, दोघांनीही जेव्हा टोपी काढली आणि त्यांच्या माथ्यावरचे आणि हनुवटीखालचे सगळ्या जखमेचे व्रण दाखवले, जखम पर्यटकांना दाखवली तेव्हा सगळ्यांच्या तोंडातून आश्चर्य उद्गारच निघाला. काही पर्यटकांनी ताबडतोब खिशात हात घालून पैसे गोळा केले आणि त्या दोघा वीरांना प्रेमाची भेट म्हणून आग्रहाने देऊ केले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller