Sagar Bhalekar

Drama Crime Thriller

4.5  

Sagar Bhalekar

Drama Crime Thriller

नात्यांचा खून

नात्यांचा खून

7 mins
1.7K


मिस्टर देशपांडे ह्यांनी त्याच्या कुटुंबियांना त्याच्या मुंबई मधील वाडयात ९०व्या वाढदिवसानिम्मत आमंत्रित केले होते. दुसऱ्या दिवशी ते स्वतःच्या घरात मृत अवस्थेत सापडलेले दिसले. मिस्टर. देशपांडे ४०० करोडची मालमत्ता पाठीमागे सोडून गेले होते. पोलिसांना विश्वास होता की. ही आत्महत्या नसून त्यांचा मालमत्तेसाठी खून करण्यात आला आहे. त्यासाठी इन्स्पेक्टर खरात हे ह्या केसची investigate करायला मिस्टर. देशपांडे ह्यांच्या मुंबई मधील वाडयात आले. इन्स्पेक्टर खरात ह्यांनी प्रथमत त्याच्या नोकराची चौकशी केली. आता पुढे….


इन्स्पेक्टर खरात: तुम्ही सकाळी मिस्टर. देशपांडे ह्यांना चहा आणि बिस्कीट द्याला त्याच्या रूम मध्ये गेलात. तेव्हा exactly ते कोणत्या अवस्थेत तुम्हला दिसले?


नोकर: साहेब, मी जेव्हा त्याच्या रूम मध्ये साधारण १०च्या सुमारास नाश्ता आणि त्यांच्या डायबेटीसची औषधें द्यायला नेहमीप्रमाणे गेलो. आणि बघतो तर ते जमिनीवर मला पडलेले दिसले. तेव्हा मी खूप घाबरलो. आणि बाईसाहेब म्हणजे मिसेस. राऊत हयांना आवाज दिला. तेव्हा मिसेस राऊत आणि मी आम्ही दोघांनी बघितलं की,त्याच्या बाजूला एक इन्सुलिन पडलं होत.पण ते त्याना मीच नेहमी नाश्ता दिल्यानंतर द्यायचो. पण कुणासठाऊक ते तिकडे कस होत.


इन्स्पेक्टर खरात: तुम्हाला कोणावरती शक वैगरे?


नोकर:नाही, साहेब. मिस्टर. देशपांडे खूप हसीमज्जाक करायचे आणि मी खात्री देतो तुम्हला ते आत्महत्या कधीच करणार नाहीत. हा खूनच असावा असा माझा अंदाज. मालमत्तेसाठीच केला असावा. मला कोणावरती शक नाही. कारण सगळे त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे. आणि त्यांनी आपल्या ९०व्या वाढदिवसनिम्मत पार्टी दिली तेव्हा पण ते खुश होते.


इन्स्पेक्टर खरात: ठीक आहे.


(इन्स्पेक्टर खरात आपला दुसरा उमेदवार म्हणून मिस्टर. देशपांडे ह्यांची मुलगी मिसेस. राऊत हयांना चौकशीसाठी बोलवतात.)


इन्सपेक्टर खरात: मिसेस. राऊत, तुमचे आणि तुमच्या वडिलांचे संबंध कसे होते?


मिसेस. राऊत: जसे एका मुलीचे आपल्या वडिलांशी कसे संबंध असतात , अगदी तसेच माझे माझ्या वडिलांबरोबर होते. त्याना माझं व माझ्या मिस्टरांचे इकडे राहणं पसंद नव्हते. जवळजवळ ३० वर्षांपूर्वी मी त्याच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. त्या गोष्टीमुळे ते खूप नाराज झाले होते. लग्नानंतरचे थोडेदिवस आम्ही त्याच्या वाड्यावर राहलो. पण नंतर आम्ही तो वाडा सोडला आणि बदलापूर मध्ये राहायला गेलो. काहीवर्षांपूर्वी त्यांनी आमच्याशी बोलणं चालू केलं, आणि ते आमच्या नात्यालाही ते पसंद करू लागले होते. पार्टीचं आमंत्रण द्यायला स्वतः आमच्या बदलापूरच्या घरी आले होते.


इन्स्पेक्टर खरात: ठीक आहे, तुम्ही जाऊ शकतात.


(चौकशी रूम मधून बाहेर येतात आणि सर्वाना सांगतात, उद्या सर्व घरातील मंडळी इथे हजर झाली पाहिजेत आणि इन्स्पेक्टर खरात तिथून निघून जातात.इन्स्पेक्टर खरात आपल्या घरी हत्याच्या कथा परत rewind करतात. ज्यावेळी मृत्यू झाला तेव्हा त्याच्या हातात असलेले इन्सुलिनचा रंग वेगळ्यापद्दीतने जाणवला.normally, इन्सुलिनचा रंग व्हाईट असतो, पण त्याना देण्यात आलेले इन्सुलिनचा रंग हिरवा दिसत होता. पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर समजेल असे मनातल्या मनात इन्स्पेक्टर खरात पुट्पुटतात.)


(दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच इन्स्पेक्टर खरात आणि त्याचे सहकारी वाड्यावर पोहचतात. आणि चौकशीला चालू करतात.आता त्यांनी मिसेस. राऊत हयांचे मिस्टर राऊत हयाची चौकशी करायला सुरुवात केली.)


इन्स्पेक्टर खरात: मिस्टर.राऊत पार्टी मध्ये असं काय झालं, जेव्हा अचानक मिस्टर.देशपांडे ह्यांनी तुम्हाला पार्टी सोडून केबिन मध्ये बोलवण्यात आलं.


मिस्टर राऊत: actually, त्यांनी माझी माफी मागितली.


इन्स्पेक्टर खरात: पण माफी तर पार्टी मध्ये पण मागू शकत होते. त्यासाठी केबिन मध्ये जायची काय गरज?


मिस्टर राऊत:हो, कदाचित त्यांना सगळ्यांसमोर माफी नसेल मागायची.


इन्स्पेक्टर खरात: नाही. त्याना असं समजेल होत की. तुमचं आणि मिस. रेश्मा ह्या दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत. आणि तुम्ही त्यांच्या मुलीला फसवत आहेत. त्यामुळे त्यांनी तुम्हाला केबिन मध्ये बोलवलं. आमच्याकडे प्रूफ आहेत मिस्टर. राऊत. तिकडे तुमच्या दोघांची बाचाबाची झाली. आणि तुम्ही त्यांना मारून टाकण्याची धमकी दिलीत. आणि रागाने परत तुम्ही पार्टी एन्जॉय केली.


मिस्टर राऊत: हो, मी त्यांना धमकी दिली होती. पण त्यांचा अर्थ असा नाही, मीच त्यांना मारून टाकेन. मला आणि रेश्माला लग्न करायचं होत. हे त्यांना त्याची असिस्टंट पाठारे मॅडमकडून कळले. पण हे अजून माझ्या बायकोला माहित नाही आहे. मला त्यांच्या मालमत्तेमध्ये काडीचा रस नव्हता.


(त्यानंतर इन्स्पेक्टर खरात मिस्टर.देशपांडे ह्याचा नातू आदित्य राऊत ह्याची चौकशी करतात.)


इन्स्पेक्टर खरात: पार्टी मध्येच सोडून तुम्ही कुठे गायब होतात?


आदित्य राऊत: पार्टी मध्ये मी साधारण ७च्या सुमारास आलो. आणि ९ च्या सुमारास तिथून निघालो.


इन्स्पेक्टर खरात: पार्टी मध्येच सोडून जाण्याचं कारण...


आदित्य राऊत: कारण, मला माझ्या मित्राला एअरपोर्टवर सोडण्यास जायचे होते. त्यामुळे मी पार्टी continue नाही करू शकलो.त्यादिवशी आजोबांचा मूड पण खूप खराब होता.मी त्यांना विचारण्यास गेलो. पण ते माझ्यावर भडकले.थोडी पार्टी एन्जॉय करून मी रात्री ९ च्या सुमारास तिथून निघालो.


(इन्स्पेक्टर खरात यांना डॉ. किशोर ह्याचा फोन आला आणि त्यांनी तातडीने फॉरेन्सिक लॅब मध्ये बोलवले.)


इन्स्पेक्टर खरात: डॉ. किशोर. काही खबर.


डॉ. किशोर: त्यासाठी मी तुम्हाला तातडीने इकडे बोलवून घेतले. पोस्टमार्टेम रिपोर्ट मध्ये हत्याच केली आहे. आणि त्यांना इन्सुलिन मध्ये विष देऊन मारले आहे. विषाचा ओव्हरडोस जास्त झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हे अशा व्यक्तीने केलं आहे. ज्याला ह्यासंबंधी जास्त माहिती आहे.


(दुसऱ्या दिवशी वकील मिस्टर. देशपांडे ह्यांचे मृत्यू पत्र सगळ्यांसमोर सादर करतात. आणि त्यामध्ये एक आर्श्चयजनक बाब म्हणजे सर्व मालमत्ता त्यांनी मिसेस. पाठारे ह्याच्या नावावर केली होती. हयामुळे कुटुंबामध्ये मतभेद होतात आणि सगळे जोरात एकमेकांवर ओरडू लागतात.इन्स्पेक्टर खरात तिकडे येतात तेव्हा सर्व शांत होतात.)


सर्व: हे चुकीचं आहे. आम्ही सगळे असताना मालमत्ता अनोळखी व्यक्तीच्या नावे आम्हला पटत नाही. आम्ही ह्या गोष्टीचा विरोध करत आहोत. त्यासाठी आम्ही कोर्टात जाण्याची तयारी ठेऊ.


(आता मात्र इन्स्पेक्टर खरात मिसेस. पाठारे बाई म्हणजे मिस्टर. देशपांडे ह्यांची अससिस्टन्ट ह्यांची चौकशी करतात.)


मिसेस. पाठारे: एका आठवड्यापूर्वी मिस्टर.देशपांडे ह्यांनी इच्छा बदलेली होती. आणि त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं होत. आणि सगळी मालमत्ता माझ्या नावावर त्यांनी केली होती. तसं त्यांनी मृत्युपत्रांत लिहल होत. त्यांनी माझ्या नावावर मालमत्ता का केली, काही माहित नाही.


(मिसेस. पाठारे ह्याच्या पायावरची जमीन सरकते. काय होतेय त्यांना काहीच कळत नाही. संपूर्ण कुटुंब आणि इन्स्पेक्टर खरात तिच्याकडे पाहू लागतात. अशामध्ये सगळं कुटुंब तिच्याकडे धावून येतात, तेव्हाच आदित्य मिसेस. पाठारे हयांना आपल्या गाडीत लिफ्ट देतो.आणि ते दोघे एका हॉटेल मध्ये येतात,)


आदित्य राऊत: ठीक आहे. मी तुमची ह्या बाबतीत मदत करू शकतो.


मिसेस. पाठारे: ती त्याच्याकडे पाहू लागते. तिला काही कळत नाही.काय चालाय ते. पण तुम्ही माझी मदत कशी करणार.


आदित्य राऊत:मी माझ्या आजोबाच्या खूप जवळ होतो. ते गेल्याच दुःख सगळ्यापेक्षा जास्त मला झालं आहे. बाकी सर्वानी पैशासाठी नाती जोडली होती. ज्याने कोणी पण माझ्या आजोबांचा खून केला असेल त्याला मी जिवंत नाही सोडणार. माझे आजोबा आत्महत्या नाही करू शकत. माझ्या डोळ्यात बघ आणि मला सांग काय झालं आहे,का त्यांनी सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केली. त्याला काहीतरी कारण असणार.


मिसेस. पाठारे:तिचे ओठ थरथरू लागतात.


आदित्य राऊत: मिसेस. पाठारे मॅडम कृपया करून मला सगळं सांगा.


मिसेस. पाठारे: पार्टी झाल्यानंतर मी मिस्टर. देशपांडे हयांच्या रूम मध्ये गेले. तेव्हा त्यांना आधीच इन्सुलिन देण्यात आलं होत. आणि त्यांनी मला परत इन्सुलिन द्यायला सांगितलं. जेव्हा मी इन्सुलिन बघितलं तेव्हा त्या इन्सुलिन हिरव्या रंगाचा होत. मला थोडं अजीब वाटलं तेव्हा. नेहमीच माझ्या बॅगेमध्ये मी extra इन्सुलिन ठेवून देते, पण कोणास जाणे त्यादिवशी माझ्या बॅगेमध्ये इन्सुलिन नाही सापडलं. तेव्हा मिस्टर. देशपांडे ह्यांनी मला जशी आहे तशीच जायला सांगितलं, आणि तेव्हाच मिसेस. राऊत हयांनी आतून मिस्टर. देशपांडे हयांना हाक दिली. मी खूप घाबरली आणि मी खिडकीतून पाईप ने खाली गेली. आणि थेट माझ्या घरी गेली.


आदित्य राऊत: आदित्य, हसल्यासारखा इशारा देतो. मला नेहमी वाटाचये कि, मी एकटा आहे म्हणून. पार्टी मध्ये त्या रात्री माझं त्याच्याशी माझं शेवटचं संभाषण झालं आणि भांडण सुद्धा. तेच मालमत्ता वरून. एक कवडीसुद्धा तुला मी देणार नाही, निघून जा इथून.


मिसेस. पाठारे: त्याच्याकडे कठोर नजरेने पाहते.आणि तेथून पळ काढते.


(आदित्य राऊत थोड्यावेळाने तिच्या मोबाईल वर एक SMS पाठवतो, त्यात लिहतो तू सावरकर रोड वर एका जुना पडका वाडा आहे. तिथे येऊन मला भेट. मी तुझे सर्व संभाषण रेकॉर्ड केलं आहे. त्यामुळे जर नाही आलीस तर मी ही ऑडिओ क्लिप पोलिसांना देईन. तेव्हा त्याचा पूर्ण संशय तुझ्यावर येईल. तेव्हा लवकरात लवकर ये. आणि काही चालबाझी नको आहे. जेव्हा मिसेस. पाठारे त्या वाड्यामध्ये जातात.इथे इन्स्पेक्टर खरात ह्यांना फॉरेन्सिक लॅब मधून फोन येतो.)


इन्स्पेक्टर खरात: डॉ. किशोर मला तातडीने बोलवलं. काही समजलं का खुनाच्या बाबतीत.


डॉ. किशोर: मिळालं. त्याच्या ब्लड रिपोर्ट मध्ये अजून एका व्यक्तीच ब्लड आहे. म्हणजे इन्सुलिनचा दोनदा वापर झाला आहे. ह्या इकडे सांगतो. आरोपीने एक चूक केली आहे. ती म्हणजे त्याने प्रथम इन्सुलिनचा वापर स्वतःवर केला आहे. त्यानंतर त्याने तेच इन्सुलिन मध्ये विष भरून मिस्टर. देशपांडे ह्यां देण्यात आलं.मला सर्वांचं रक्त घेऊन ह्याच्याशी match करावं लागेल.


इन्स्पेक्टर खरात:खरच! that's great.


(इथे इन्स्पेक्टर खरात घरी येऊन सर्वाना ही बातमी सांगतात. पण त्याना पाठारे मॅडम कुठे दिसत नाहीत.)


इन्स्पेक्टर खरात: मला पाठारे मॅडम कुठे दिसत नाही आहेत.


मिसेस राऊत: गेल्या असतील त्याच्या प्रियकराला भेटायला. आता काय मालकीण होणार ना. पण मी हे होऊ देणार नाही समजलं.


नोकर: साहेब, त्या थोड्या चिंतीत होत्या. मी त्याना विचारलं तेव्हा मला म्हणाले. सावरकर रोड वर एक पडका वाडा आहे तिथे जात आहे. कोणाला सांगू नकोस म्हणून.


इन्स्पेक्टर खरात: ठीक आहे. सावंत गाडी काढा लवकर.


(इन्स्पेक्टर खरात तिथं पोचतात आणि पाठारे मॅडमला आदित्यच्या तावडीतून सुटका करतात. आणि आदित्य राऊतला पकडून घरी आणतात.सर्वांची टेस्ट करण्यात येते. आणि आदित्यच्या ब्लड शी match होत. आदित्य पळताना इन्स्पेक्टर खरात त्याना पकडतात.)


इन्स्पेक्टर खरात: का, तू त्याचा खून केलास?


आदित्य राऊत: मी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होतो. माझ्या नावावर अर्धी मालमत्ता त्यांनी केली होती. पण मी लहान वयातच drugs आणि दारूच्या आहारी गेलो. आणि त्याच्या विश्वास माझ्यावर उडून गेला. पार्टी मध्ये आमच्या दोघांमध्ये भांडण झालं होत. आणि मी दारूच्या नशेत होतो. म्हणून मी तिकडून रागाने पार्टी मध्येच सोडून गेलो. पण बाहेरून माझं सर्वावर लक्ष होत. पार्टी संपण्या अगोदर मला आजोबा त्याच्या रूममध्ये जाताना दिसले. एकटेच होते, तेव्हा मी ही संधी साधली त्याना मारण्याची. कोणाला संशय येऊ नये. म्हणून मी चेहऱयावर मास्क बांधल. प्रथम आमच्या दोघांमध्ये झुजाझुज झाली. तेव्हा थोडस इन्सुलिन मला टोचलं. मी एक लॅब अससिस्टन्ट असल्याकारणाने मी माझ्यावर अँटीबायोटीक घेतलं. त्यामुळे मला विषबाधा झाली नाही. आणि नंतर आजोबाना इन्सुलिन vaccine टोचली, तेव्हाच तिकडे पाठारे मॅडम आल्या आणि मी तिथून निघून गेलो. हो मी कबूल करतो मीच खून केला आहे ते.


इन्स्पेक्टर खरात: आदित्य आजोबाच प्रेम खूप कमी लोकांना मिळत रे. तुझ्याशी किती चांगल्या प्रकारचे संबंध होते. पण तू नात्याचा खून केलास.


(पोलीस आदित्यला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातात.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama