नाहक कशाला ?
नाहक कशाला ?
तू मला मोठं म्हण, मी ही तुला तसंच म्हणेन
माझं आमंत्रण तुला गड्या पण मलाही तू दिलंच पाहीजे
तू हो ग्राहक मी होतो दुकानदार, कधी मी ग्राहक, तू दुकानदार
कवितेचा बाजार बिनधास्त थाटू, प्रसिध्दीची कुल्फी मिळूनी चाटू
तू मला सुप्रसिध्द म्हण, मी ही तुला तसंच म्हणेन.
तू काहीही वाच, मी फक्त वाहवा - वाहवा म्हणेन
अट मात्र एवढीचं तुलाही वाहवा - वाहवा म्हणावंच लागेल
उसनवारी केलली फेडावी तसा, व्यवहाराचा अलिखीत नियम तुला पाळावाच लागेल
कविता म्हणून म्हणून म्हणणार कोण? आपल्याशिवाय आहेच कोण ?
आपलीच पत्रावळी आपलंच द्रोण, वाढपीही, खाणारेही आपलेचं आपण
हवेत कशाल नवकवी अनं कशाला करायचा कोणाला फोन ?
तरी बरं ह्यांना एकचं तोंड आणि कान आहेत दोन...
उ
पवास नसला तरी करूया फराळ, चालु द्या आपलंच एरंडाच गु-हाळ
मिळुनी आपून काढुया झक्कास फोटू, तु पतला मी तर आहेच मोटू...
वार्ताहरही आपलाचं काहीही (वर्तमानपत्रात) काहीही छापू,
आपली प्रसिध्दी आपूनंच मापू...साहित्यमिमांसकांची नकोच घाण
अनं हवीच कशाला कवित्वाची जाण ? नको रे बाबा सच्चा छान.
काहीही झालं तरी, आपणंच जपावा आपापला मान- पान
आम्हीच गुरू अनं आम्हीच चेले, आम्हीच मुंगळे , आमचेच भेले
वाट्टेल तेवढं खाऊ, वाटलं तर कुणाला देवू आमची मर्जी.
आम्हीच सुधारक, आम्हीच कवी , म्हणा हवं तर गल्लीतला भाई
सांगताही येईना आणि सहनही होईना कवितेची अवकळा...
मित्रहो! माहितीय तुम्हाला सत्तेपुढे शहाणपण चालत नाही
नाहक कशाला छाताड बडविता , म्हणे गुळाला मुंगळे खूप झाले...