म्रुत्युच्या दाडेत ! शाँक...
म्रुत्युच्या दाडेत ! शाँक...
सध्याच्या काळत यंत्रना खुपच वाढलेली आहे.
प्रत्येक क्षणाला कुठे ना कुठे कुणाचा ना कुणाचा तर कशानं ना कशानं "आपघात"
हा होत होतच असतात.
हा आपघात खुपच वाईट असतो.
माझ्या सोबत व मला आनुभव यावा असे एक दोन आपघात, मी स्वतःच्यी डोळ्याने पाहिले काही अपघात तर इतके भयंकर आहेत तिथे अद्यापही मी विसरलो नाही व विसरू ही शकणार नाही, याचा मला शोक आहे शॉक बसलेला आहे.
मीही एक दोन अपघातून बाल बाल वाचलेलो आहे. ऐव्हना म्रुत्युच्या दाढेतुनच परत आलेलो आहे....!
तो आनुभव अगदी वेगळा काम करतो ह्यानंतर माणूस जपून वागतो जपून चालतो जपून काम करतो.
सर्व अपघातांत पेक्षा हा अपघात एक वेगळ्या पद्धतीच्या व वेगळाच अनुभवाचा होता.
आहे ! हा कोणता रोड अपघात नसून की कोणता इतर अपघात नसून थोडा वेगळा आहे. हा अपघात कधीतरी कधी कधी घडतो असं म्हणायला हरकत नाही. त्यातलाच हा एक वेगळा अनुभव.
आम्ही विद्युत वितरण कंपनी म्हणजे मरावी मंडळ कंपनी (महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनी मर्यादित) यात मी व माझे सहकारी बाह्य कंत्राटी कामगार म्हणून वायरमन ची म्हणजेच लाईन मन चे काम करत असतं.
हे काम एक प्रत्येक वेळी हे काम जीवघेणेच आहे किंवा जीवावर उदार होऊन करावे लागते. कधी काय होईल हे कोणाला सांगता येत नाही. सर्व सुरक्षा करूनही कधीकधी आपघात काही घटना ही होतातच. माझा पण एक असाच अपघात झालेला आहे पण तो मी डोळ्याने न पाहिल्यामुळे येथे वर्णन करू शकत नाही. हा थोडा अनुभव व वेदना विजेचा धक्का बसल्या नंतरचा सांगता येईल तो जीव घेना अनुभव चित्तथरारक असतो. त्यानंतर असे दिवस कोणावरच येऊ नयेत हेच हृदयाला वाटतं. तरीपण पुढे कधीतरी आपघात ही पाहावयाला मिळतात.
असाच एक डोळ्याने उघड्या पाहिलेला अनुभव आहे. मी व माझा सहकारी एकदा लाईन वर काम करण्यासाठी गेलो होतो काम हे सब स्टेशनच्या जवळच होते. जवळच असल्यामुळे आम्ही थोड्या बिनधास्तपणे काम करण्यासाठी सर्व लाईन बंद करून घेतली. आमच्या पावर स्टेशन मध्ये लाईन बंद करण्यासाठी एक इन्कमर व पुढे अनेक फिडर असतात.
नेहमीच ते आम्हाला ज्या लाईन वर काम करायचे असेल त्याला लाईनचे फिडर चे स्विच बंद करून पुढील असू लेटर असते तेही ओपन करून नंतर पुढचा अर्थशाँट करून नंतरच काम करीत असतात. पण अपघात व्हायचा असल्यास कसाही कुठे कुणासही होतो.
त्यादिवशी असेच झाले जवळ काम करायचे असताना ही आम्ही सर्व सुरक्षा केली होती. तसेच जवळ काम करत होतो म्हणून आणि अन काही मिनिटच लागणार होती, म्हणून आम्ही ऑपरेटरला मेन इन्कमरच बंद करायचे सांगितले त्याने ते सर्व व्यवस्थित बंद केले व आम्हाला परवानगी (परमीट) दिले.
माझा सहकारी परमिट घेतल्यानंतर सगळं पाहून व्यवस्थित आहे या खात्रीने डोळ्याने पाहून पोलवर चढण्यासाठी गेला व चाडला त्याने दोन तारा चे तुकडे जोडले व तिसरी तार जोडत असताना त्या तारेमध्ये कुठून आणि कसा काय विद्युत सप्लाय आला. नंतर चे दृश्य हे काळजाला धक्का बसणारे होते. मी नीसंकोच होतो.
पण स्टार्टला टररर्रर्रर्र तडतड असा आवाज झाला. माझे लक्ष वरी त्या सहकाऱ्या कडे गेले व तेथेच माझ्या हात पाय गळाले. पहावेना असे ते दृश्य होते. माझा सहकारी वरती पोलावर विजेचा धक्का बसून जळत होता. लिहतानांही अंगावर शहारे आणणारे ते चित्र होते.
त्याच्या हाताला पाटीला व पायाला तार लागून विस्तवाच्या ठिणग्या जाळतून निघतात तशा निघू लागल्या. माझे शरीर पूर्ण घामाने भिजून गेले हातं. हात पाय थरथर कापत होते. बुद्धीला काहीही सुचत नव्हते. मी जोरात ओरडलो, ' लाईट बंद करा! लाईट बंद करा!' त्यावेळेस आपरेटर पळत बाहेर आला तोही ओरडू लागला. "काय झाले? काय झाले? काय झाले?" मी म्हणालो ,' शाँक लागला'. तो म्हणायचं ,'सर्व फिडर तर बंद आहेत.'
काय झाले कळेना तो क्षण अति वेदनेचा होता, तोंडाला कोरड पडली होती, वरती माणूस जळत होता. हे सार काही क्षणातच घडलेलं होतं. याचाही आम्हाला शॉक लागलेला होता आणि मला पण असाच अपघात झाल्यामुळे माझे तर डोके सुन्न झाले होते. काहीच कळत नव्हते काय करावे ते, नुसता रडत ओरडत होतो.
तो सहकारी वरी तसाच लटकलेला होता मग ऑपरेटरला फोन करून एक दोन सहकाऱ्याला बोलवलण्यास सांगीतले. ते सर्व आले, पण कोणाची हिम्मत होईना वरती जायला थोड्यावेळात आम्ही दोघं जवळजवळ मी व दुसरा सहकारी लाईनमन हळुवार वर चढलोत. भीत भीत त्याला उलट्या हाताने हात मारला. आमच्यात लाईन चेक करण्यासाठी उलट या हाताने अगोदर हात मारून चेक करतात. तसंच तसेच आम्ही त्याला चेक केले खात्री झाल्यावर त्याला हलवले, तो बेहोश होता. सगळी विजेच्या धक्क्याने भाजलेला होता. आम्हाला वाटलं आता तो नक्कीच गेला, म्हणजेच मृत्यू पावला. वरी थोडा साईटला बसण्यासाठी जागा असल्यामुळे मी खाली आलो व आमच्यातला एक जन त्याच्याजवळ तिथं न कशाला हात लावता थांबला. आम्ही तयारी करत होतो त्याला खाली काढण्याची. अंग थरथर कापत होते. तरीही त्याला कशी खाली काढावे याचा विचार करत होतो. इतक्यात मला या शोक लागलेल्या सहकाऱ्यांचा हात हलताना दिसला. मी दुसऱ्या सहकार्या सांगितले, 'अरे, तो जिवंत आहे. तो जिवंत आहे.' तो पार घाबरून गेला होता आणि आत्ताच जरा शुद्धीवर आला होता. मी खालून त्याला धीर देत होतो, 'काही नाही झाले थोडा थोडा झटका बसलेला आहे. तू घाबरू नको फक्त इकडे तिकडे हात लावू नको व खाली येण्याचा प्रयत्न कर.' तेच दुसरा सहकारी वर बसलेला पण सांगत होता. मग त्या सहकार्याने त्याला हळूच खाली उतरण्यास मदत केली. मीही अर्ध्यापर्यंत त्याला खाली घेण्यासाठी गेलो नंतर त्याला खाली घेतले व उचलून स्टेशनच्या रूम मध्ये आणले. त्याच हात पूर्ण भरलेला होता. बोटाचे सालटे निघालेले होते. तारा घुसून जळालेली होते. दुसऱ्या हाताला तार घुसून एक खाच पडलेली होती. त्यात पण काताडे करपलेले जळालेले होते. हे दृष्य पहावेना असेच होते. नव्हतीच हृदय कडकळत उडत होते. आम्ही लवकरात लवकर वरिष्ठ साहेबांना फोन केला व सर्व हकीकत सांगितली. त्यांनी ताबडतोब एक गाडी पाठवून दिली. त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आम्ही त्याला उचलून गाडी टाकलं व दवाखान्यात आणले.
डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. सर्व जखमा धुऊन पुसून घेतल्या व त्यावर मलम व कापसाची रुई लावून पट्टी लावली. नंतर त्यांनी त्याला सलाईन इंजेक्शन द्यायला सुरुवात केली तो जरा सावध झाला होता, पण त्या वेदनांनी कण्हत ओरडत होता. मला अनुभव असल्यामुळे त्या वेदना मी झाल्यामुळे मी हळहळ करीत होतो व त्याला धीरही देत होतो.
दोन दिवस असेच हॉस्पिटलमध्ये घातली. त्याच्या वेदना पाहवेनाशाच होत्या.
तसेच आम्ही बाह्य कंत्राटी असल्यामुळे वरिष्ठ साहेब लोक जरा द्यायचे तितके ध्यान देत नव्हते. मला वाईट वाटले , आता या दवाखान्यातील खर्च चा विषय होता. इंजिनीयर साहेबांनी तात्पुरता थोडा खर्च दिला पण त्याच्या दवाखाना व औषध गोळ्या करणे पूर्णपणे अशक्य होते.
तसा आम्हाला पगारही कमीच होता यात त्याच्या घरची परिस्थिती तंग असल्यामुळे पैशाची व्यवस्था होईना. मग मी डॉक्टरला म्हणून उधारीवर आणून देतो व ईलाज चालू ठेवा. म्हणून मग मी साहेबांना जरा बोललो किती तुम्ही लक्ष घालीत नाहीत यास तिथच मरू घ्यायचं का? तक्रारी पर्यंत विषय गेला.
मग साहेब लोकांनी आणखीन थोडे पैसे दिले व बील चुकते करून दवाखान्यातुन त्याला सुट्टी घेऊन घरी आणले. परिस्थिती खूपच भयानक होती. घरचे सारे चिंतेत होते. त्यांना आम्ही सांतवना देतं , सगळे हळहळ करत होते रडत होते, सगळ्यांना शांत करून, आम्ही घरी आलो. पुढील काही दिवस त्याच्या जखमा न भरलेल्या तशाच होत्या. हा अनुभव मलाही आलेला होता. म्हणून मला जास्तच याची जाणीव असल्याकारणाने मनाला वाईट वाटत होते आणि याला काहीच बोलत नव्हता. ज्या गोष्टी व्हायच्या त्या गोष्टी होतात. सर्व बंद करूनही तिसऱ्याच बाजूनी तारेत करंट आलेला होता. सगळीकडे बातमी पसरली होती.
दिसत नसल्यामुळे न कळल्यामुळे हा चित्तथरारक अपघात झालेला होता. मला वाटत नाही यासारखा अपघात विजेचा धक्का बसून झालेला नकळता अपघात कोणताच नाही, पण अपघात हा अपघात असतो. कसल्याही पद्धतीने व कशानेही हो कठीणच असतो व भयानक असतो. हा एक असाच होता.
पण त्याचा जीव वाचला गेला होता हेच महत्त्वाचे.
म्हणतात ना "देव तारी, त्याला कोण मारी" असंच घडलेलं होतं.
