STORYMIRROR

सुर्यकांत खाडे

Others

3  

सुर्यकांत खाडे

Others

दडलेले साहीत्य (एक मनोगत)

दडलेले साहीत्य (एक मनोगत)

2 mins
239

कित्येक लेखकांचे व कविंचे लिखाण व साहीत्य हे नप्रकाशित झाल्याने पडून असते व दडून असते.

यातुनच आताचा जो व्यवसाईक व स्पर्धातमक धोरणाचा प्रभाव यामुळेच की काय अस घडते अस वाटते.

यातुनच सुचलेल "मनोगत".

बाल पनापासूनच मला लिहियाचा खुप मनातुन छंद होता.

घरची परिस्थिती तेंव्हा हालाकीलीची होती,

म्हणून वेळच मिळत नसे.

त्यातूनच कधीबधी मी कविता काही लिखान करायचो. त्यात कविता जास्तच असत, कारण वडील नसल्याने, भाऊ सर्विस ला असल्याने व आईची परेशानी होईल म्हणून, काही घरची व शेतातील कामे मलाच करावे लागायचे यामुळे खूप कमी वेळ मिळायचा.

त्यातूनच वेळ काढून मी काहीतरी लिहायचो.

त्या कविता प्रत्येक वेळी मी एका वहीत लिहून ठेवायचो. त्यात जेमतेम चाळीस पन्नास कविता लिहिणे झालेल्या असतील ;

घरून सगळ्यांचा विरोध व्हायचा, सगळेच म्हणायचे,' काया लिखाणात पडले? पोट भरेल काय आणि काय करणार या लिखाणाचं? कुठे मोठा काय होणार तू!'

मी त्यावेळेस लिखाण बंद केले.

तसेच ती वही दाबून टाकली.

काही दिवसांनी लग्न झाले मुलगी झाली मुलगी मोठी झाल्यानंतर एक दिवस तिने कचरा काढताना ती वही पाहिली तिने विचारल,' पप्पा ही वही कशाची आहे?' माझं मन भरून आलं.

मी म्हणालो, 'बाई! मी कविता लिहित होतो. खूप जुन्या आहेत त्या !' 'त्याच्यातल्या दोन-चार कविता पेपरमध्ये आलेल्या आहेत.'

अन गळा भरून आला; मी तसाच तिथुन निघुन गेलो.

 आता कामाचा लोड वाढला होता, अन संसारात मन गुंतलेले होते. त्यामुळे वेळ देणे शक्य नव्हते, लिखाणकाम करणे अशक्य होते.

तिनं त्या कविता वाचल्या व तिला खूप छान वाटल्या.

ती म्हणायची, 'पप्पा लिहीत जा ना. छान लिहितात तुम्ही !' मनाला थोडं बर वाटला व थोडा दुःख झालं. कारण कामांमुळे वेळ मिळत नव्हता.

पुढे काही दिवसांनी कोरोनाचा काळ सुरू झाला कामे जराशी बंद झाल्यामुळे व बाहेर लॉकडाउन असल्यामुळे, बाहेर पडता येत नव्हतं. घरीच राहावं लागायचं.

एक दिवस असाच बसून होतो. सुचले व ती मी वही पाहिली कुठेच मिळेना मनाची तगमग झाली, मी कावरा बावरा होऊन इकडे तिकडे पहात होतो व ती वही सापडवित होतो.

तितक्यात ती मला मुलीने ठेवलेली काढून दिली.

गगनात मावेना असा मनाला आनंद झाला.

आता वेळच वेळ होता, म्हणून मी लिखाण करत राहीलो. जनु मनाचा बांध फुटल्या गत व भांग पिल्या गीत, पटापट शब्द रचत राहिलो माझे शब्द हि जणू आता ह्रदयातून बाहेर पडण्यासाठी तळमळत होते व बाहेर पडत होते आता वही नव्हती, पण माध्यम "ऑनलाइन" बनले होते. खूप कविता लिहून झाल्या खूप प्रशंसा मिळत राहिली मीही लिहीत राहिलो काहींना सुचत नाही तर काहींना शब्द मिळत नाहीत पण मला कसे काय कळत नाही, पटपट शब्द सुचु लागले खूप कविता करून झाल्या मग आता वाटायचे यांचे काय करावे? मातीमध्ये जाणार हे सर्व ही खंत वाटू लागलं.

 काहींनी सुचवलं ही होतं की तुम्ही तुमच्या लिखाणाला प्रकाशित करा.

 असे असूनही काही "फ्लाँटफॉर्म" मिळत नसल्याने त्या तशाच मला झगडुन राहिल्या अन दडून राहील्या....

मी प्रकाशित करू शकलो नाही हा खंत खरंच माझ्या मनाला नेहमी टोचत राहिला कोरित राहिला...सलत राहीनही....



Rate this content
Log in