सुर्यकांत खाडे

Romance Tragedy Others

4  

सुर्यकांत खाडे

Romance Tragedy Others

आहेर

आहेर

3 mins
408


  आणखीनही आपल्या देशात रूढी परंपरा यांचा बऱ्याच पैकी बोलबाला आहे.

 त्यात लग्नकार्य हे एक महत्त्व व परंपरेने चालू असलेले मोठे व महत्त्व चे कार्य समजले जाते.

 यातच काही ठिकाणी परंपरेनुसार यात मानपान, सन्मान अशा बऱ्याच गोष्टी या लग्नकार्यात अगदी मोलाच्या ठरतात.

किंबहुना काही कार्यात तर या गोष्टीमुळे अनेकदा वादविवाद व लग्न खोळंबा, हे पाहावयाला मिळतात.

 असाच एका ठिकाणी झालेला वादविवाद व कोळंबलेले लग्न पाहून मनाला खूप आश्चर्य होतं. एवढे मोठे सुंदर कार्य करून व खुप खर्च करून केलेले कार्य असल्या गोष्टीमुळे गालबोट लावण्याची काम लोक करतात. सहसा मध्यमवर्ग लोकांच्या कार्यात या घटना घडतात.

 मी पण एका मध्यमवर्गी कुटुंबातील आहे. म्हणून मला या अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा कार्य कारतांना पाहायला मिळतात.

 अशाच एका मी लग्नकार्यात गेलो असताना, काही गोष्टी घडल्या.

 लग्नाची सर्व तयारी झाली वऱ्हाड मंडळ काही क्षणात येणार होते.

 आम्ही वाट पाहत होतो की, वऱ्हाडी आले, तर त्यांची सद भावनेने आवभगत करून यथोच्च, योग्य रीतीने स्वागत करून लग्न कार्य करणे पूर्ण करावे. काही क्षणातच वऱ्हाड मंडळी लग्न ठिकाणी बऱ्याच वाहनाने येऊन हजर झाले आम्ही सर्व बँड बाजा घेऊन त्यांच्या स्वागत साठी पुढे गेलो. त्यांचे स्वागत पूर्ण झाले.

मंडप सजलेला होता. त्या मंडपात बसण्याची सोय करून त्यांना तिथे बसवले.

सर्वांना पाणी रसना वगरे दिले. काही क्षणातच लग्न कार्याला सुरुवात झाली लग्नकार्यात बऱ्याच विधी असतात. त्याप्रमाणे लग्नकार्य पार पाडावे लागते. वऱ्हाड आली की पहिला भेटीचा प्रोग्राम, त्यानंतर मंडपात मान पान व अहेर यात कपड्याचे व डाग दागिने आपापल्या पाहुण्यांना भेट म्हणून देण्याची पद्धत आमच्या आहे. त्याचप्रमाणे मुलाकडील मंडळींना मुलीकडील मंडळींनी सन्मान देऊन मान पान देऊन आहेर चढवुन सन्मानित करायचे असते. यातच या ठिकाणी हे कार्य आणि एक नकळत घडलेली घटना मला मला दिसली नवऱ्या मुलाकडील वरमाईची व वर बापाचा सन्मान करते वेळेस त्यांच्या आहेरा मध्ये कमतरता असल्याने ते दोघे नाराज असलेले  पाहावयास मिळेल. काही क्षणात ते मंडपातून बाहेर निघून गेले व जाऊन वऱ्हाडघरी जाऊन बसले. काही केल्या, कितीही समजल्या कोणालाच ऐकना त्यांचे म्हणणे एकच होते, 'आम्हाला तुमचा मान नको, काहीच नको.' झालं लग्नकार्यात काही काळ आता वेगळच वाटू लागलं की, पुढे काय होईल ते, सगळ खोळांबलं होतं.बऱ्याच ठिकाणी नुसत्या भावनात्मक "मानपान" व "आहेर" या अशा किरकोळ कारणांनमुळे नाते लग्न मोडलेली व तुटलेली मी पाहील्यामुळे चिंता वाटू लागली की प्रकार जास्त वाढला, तर कार्य कसे पुर्ण होणार याची. मला थोडा राग आला व काहीस हसूही आले की, आपल्यात कार्यात आपणच शुल्लक कारणांनी अशी बाधा का आणावी? असा मनाला एक प्रश्न पडला. पण काही वरिष्टमंडीळीं व नवरी कडील वरबाप, वरमाय सगळे काही त्यांना समजावत होते. त्यांची समजूत काढीत होते. मला नंतर कळालं की, नवरीच्या वडिलांनी त्यांना लग्नात दोघांना एक एक सोन्याची अंगठी देण्याची ठरवलेलं होते. केवळ सोन्याच्या दोन अंगठ्यामुळे लाखो रुपये खरंच करून ठरवलेले मोठे कार्य आता खोळंबलेले होते. लग्न कार्याला आलेली सर्व मंडळी आश्चर्याने ते सर्व पाहात होते. लग्न लावण्यासाठी उशीर होऊ लागला. त्यामुळे लग्न लावणारा ब्राह्मण माईक मध्ये अनेक वेळा "चला लग्नाची वेळ लग्नाची वेळ झालेली आहे, तरी सर्वांनी मंडपात यावे व तसेच नवरदेवाच्या मामाने नवरदेवाला घेऊन येणे व नवरीच्या मामाने नवरीला कृपया मंडपात घेऊन येणे." असा बराच वेळ तो ब्राह्मण माइक मध्ये पुकारित होता. बरीच गर्दी झालेली धगधग वाढली. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी गर्मी वाढत होती. कोणास काहीच कळेना काय झाले ते, इतक्यात एक जण घाई गडबडीत मोटरसायकलवर बसून गावात गेला. काही मिनिटांनी परत आला मग थोड्यावेळाने ते रुसलेले नवऱ्या मुलाचे आई वडील लग्न मंडपात आले व लग्न कार्यालय सुरुवात झाली. एका शुल्लक गोष्टीमुळे बराच वेळ खोळंबलेले लग्नकार्याला आता सुरुवात झाली.

 वर वधूला त्यांची प्रत्येकाची मामा मंडपात घेऊन आले. शेवंती चढवणे, कुंकु लावणे, अंतर पाठ धरणे, मंगळ आष्टिका म्हणणे,साडं भरणे, होम करूण सात फेरे घेणे, शुभेच्छा देणे, फोटो काढणे वगरे हे कार्य आटपल्यावर सर्वांनी सर्व पाहुण्यानाची व लग्नकार्याला आलेल्या सर्वांचीत जेवनाची सोय केलेल्या ठिकाणी त्यांना सुंदर जेऊ घातले, पण मुला कडील वरबाप व वरमाय जरा आजुनही रूसलेलेच ते काही जेवन करण्यासाठी येत नाहीत हे पाहुन, काही जण परत त्याना विनवनी करुन, "जेऊण घ्या ." अस म्हणत होते, अखेर तेही जेवले. पुर्ण वऱ्हाड़ व नवरीला घरच्यांनी अश्रुत डुबत वाटी लावले. सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. 

आणि शुभकार्य पुर्ण आटोपले व मनाला बरे वाटले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance