STORYMIRROR

सुर्यकांत खाडे

Others

2  

सुर्यकांत खाडे

Others

गढूळ रंग...रंगमंच जीवनाचा...

गढूळ रंग...रंगमंच जीवनाचा...

3 mins
69

पाणी व चिखल मिसळला की, जो रंग बनतो, त्याला "गढूळरंग" असं म्हणतात. जीवन हे एक पाण्यासारखे असते.

 दुनिया ही एक रंगमंच आहे. येथे अनेक परिस्थिती रंग पहावयास मिळतात. रंगाप्रमाणे प्रत्येकाचे जीवन वेगवेगळ्या प्रकारचे असते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे (रंगाचे) असते. ज्याला जसे आवडते त्यानुसार तो आपले जीवन शुभेच्छुक करतो. काहींना शुभ्र प्रकाशात जगायला आवडते, तर काहींना काळया काळोखात आपले आयुष्य घालवायला भाग पडते. याचे अशी म्हणजे की ज्याच्या जीवनात सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्र व सर्व काही नाते सुरळीत असेल तर तो आपले जीवन शुभप्रकाशाचेतो जग जगत असतो. असं मला वाटते.

या उलट एखाद्याला कसलीच व कुणाची साथ नसेल तर आपले आयुष्य एकांतरी करीत, एकांतात म्हणजेच अंधारात काळोखात जीवन व्यतीत करतो. असेच दोन जणांची गोष्ट आहे एक म्हणजे खूप श्रीमंत व नात नातलगांनी भरभरून पावलेला व्यक्ती होता व दुसरा अनाथ भेटेल ते काम करण्यासाठी रोज धडपडणारा माणूस होता दोघांनाही आपापले जीवनमंच होते. मंच ही होता आणि रंगही होते. फरक एवढाच होता की, व्यक्ती प्रकाशात जगत होता व माणूस कष्टाच्या काळा अंधारात जगत होता. दोघांचेही जीवन आपापल्या पद्धतीने चालूच होते. काही कालांतराने कोरोना

नावाचा जो जगात आजार पसरला होता. त्या कालावधीत सर्वजनाचे हाल कसे झाले ते सर्वांनाच माहित आहे.

 पण यात जास्त हाल ते म्हणजे पैसे असूनही काहीच न करता येणाऱ्याची होत होते. तसेच वरतून त्या आजाराची भीती वाढलेली होती . कोणालाच घराबाहेर पडता येत नव्हते. सर्व काही अस्ताव्यस्त झालेले होते. व्यवस्था सारी कोलमडलेली होती.प्रशान व शासनही हता:श होते. माणसां सारख्याचे तर हाल होतच होते. पण त्या व्यक्तीसारख्यांची पण चांगलीच परेशानी, फजिती या कोरोनामुळे काढली जात होती. चांगलेच काढा भाजलेले होते. पण यातही तो माणूस हमेशाप्रमाणे सगळं सहन करण्याची ताकद असल्यामुळे त्याचे जीवन व्यवस्थित जगत होता. कोठून तरी उदरनिर्वाहासाठी अन्न मिळवत व आपले जीवन जगात असे. या उलट त्या व्यक्तीची सर्व नाते मंडळी असूनही तारांबळ चाललेली होती. त्यातच त्याला कोरोनाची लागण झाली व पैसा दवाखाने व नातलग यांचा सपोर्ट असू नाही काही काळ काहीच विलाज होत होतांना दिसत नव्हता. व्यक्ती परेशान होत होता व माणूस आहे तसे व त्यातच आपले जीवन जगत होता.

 टीव्हीवर पाहिल्याप्रमाणे व्यवस्था करणारे काही कालांतराने त्यावेळी त्या माणसाकडे येऊन त्याला सर्व व्यवस्था जेमतेम व्यवस्था होईल तशी पूर्वीत होते. इकडे दवाखान्यात त्या व्यक्तीची सर्वच नातेलग भीतीच्या कारणांमुळे जवळही फिरकत नव्हते.

 ही असी परिस्थिती खराब झालेली होती की, आता तो व्यक्ती माणूस व तो माणूस व्यक्ती बनलेला होता. हा एक वेगळाच रंगमंच निर्माण झालेला होता. आता सांगा खरा रंगमंच म्हणजे जीवनाचा कोणता आहे?

 सर्वजण जीवनाचा सुंदर असा भुलवणारा बोलवणार व भावणारा अन् भावना रंगमंच निवडतात. आता येथे मात्र तशी परिस्थिती नव्हती. निसर्गाने येथे जो दिलेला रंगमंच होता, त्यातच प्रत्येकाला समाधान व आप आपले जीवन सुख शोधायचे होते व समस्यांशी तोंड देत जगायचे होते. यात मानव सर्व पात्र असतात. पण 'परिस्थितीची कला शिकून जगणारा माणूसच खरा कलाकार' मानण्यात काही हरकत नाही. म्हणून "ज्याच्या अंगी कला, त्यालाच मिळतो अमृताचा प्याला " असेच वाटते. यात निसर्गाने, जो रंगमंच दिला, तो रंगमंच काही वेगळीच शिकवण शिकवून जातो. मानवाने जीवनाच्या रंगमंचावर आपले आपले पात्र प्रत्येकाच्या सहकार्याने व सहवासाने नी कर्मपूर्तीने पूर्णत्वास नेण्यास समर्थ असावे व न्यावे. तरच हा जीवनरंगमंच सुशोभित होईल व सार्थक होईल.

बऱ्याचदा आपण आपल्याच धंदीत असतोत , मग ती पैश्याच्या असो, की आणखीन कशाची असो....

त्यावेळेला भौवतालच्या होणाऱ्या परिस्तितीक गोष्टीकडे लक्ष न दिल्याने आपले खरे पात्र पुर्ण होत नाही...

जर आपल्यात एखाद्याला समजवण्याची कला असेल , तर ती कला वापरून ती परिस्तिस पुर्थक अशी साहाय्यकता देणे व सुलभता निर्माण करणे ,या सारखे कार्यच करणे खरे श्रेष्टत्व प्रधान करते...

अन मानव समर्थ बनतो...

तसेच दीन दुबळ्यांची सेवाच हीच ईश्वर सेवा मानली जाते...

एरवी कलामंचावर तर सर्वच पात्र असतात ना , वाद्यवाजवणारे , सादरीकरण करणारे व व्यवस्पान करणारे हे सर्वच जर निट नेटके आपआपले कार्य बजावित असतील तरच तो कलामंच सुयोग्य व सुशोभित होतो व वाटतो अन् पार पडतो...

नाहीतर "गडुळरंग" या नावाने नवाजला जातो.

तसेच जीवानाचे पण आहे. सहकार्याची प्रत्येकालाच गरज आहे आजकाल. एखाद्याला ज्या प्रकारची साह्यकता करता येईल यथोचित त्या प्रकारे केलीच पाहीजे यातच खरी पात्रता शोभून येते व दिसते...


Rate this content
Log in