पाऊस एक निसर्गचक्र
पाऊस एक निसर्गचक्र
आता भर उन्हाळ्याचे दिवस चालू होते,
जीवाची लाही लाही होत चाललेली,
तो मे महिन्यातील शेवचा आठवडा होता,
सर्वांनाच पावसाची ओढ लागलेली होती.
म्हणतात ना माणसाचे जीवन हे आशा काही प्रत्येक आशांवरच जगत चाललेलं असते, असेच की काया ते न सोसणारी गर्मी पण माणस जुन आला; म्हणजेच पावसाळा आला व पाऊस येणाच या आशांवरच सहन करत होते.
नेहमी प्रमाणे उन्हाळा हा कठीणच गेलेला होता. मे महिन्याचे शेवटचे चार दिवस राहीले होते. प्रत्येक मनाची आतूरता ही वाढलेली होती. त्यातच अंगाला घामोने ताप वाढून पार भिजवत होता, नी गामुळ्या येण्याची स्तिती निर्माण झालेली होती. काहींना तर आल्या ही होत्या....
त्यातच एक दिवस जोराचे वारे सुटले जरा आभाळात ढग ही दिसुन आहे वादळ ही असे होते की, सर्वत्र धुरूळा धुरूळा वडवित होते. झाडे हवेने पार डोलत होती, पक्षी सैरावेरा उडत होती, कागद काडी कचरा त्या बरोबर काही पत्रे, बाहेर वाळू घातलेली ती कपडे मोठी थपड़ जे सपाट्यात पडेल ते ते वादळ वडविते चालले होते, सुई सुई दड दड आसा जोरात वाऱ्याचा व वस्तूचा आवाज चालू होता. मी यावेळी शेतात होतो सगळे डोळ्याने पाहात व कानाने ऐकत होतो. सगळ्यांचे लक्ष आकाशा कडे लागलेच होते. मीही आता आकाशाकडे दोन्ही डोळे उघडे करून आतुरलेल्या व बावरलेल्या नजरेन वर ढगांकडे पाहात होतो. पाहात असतांनाच, तितक्यात दोन थेंब पाण्याचे नेमके माझ्या डोळ्यावर पडले. अंग अंग शाहीरले, अंग झटके बसावा तसेच बसत होते. अंगाचे काटे उभे राहीले होते. पण ते सुखाचे होते.
तसे ते सगळी कडेच अनेक थेंब पडलेली असतीलच ! पण प्रत्येक मनाप्रमाणेच मला आल्हाददायक जाणवले.
पाऊस येण्यापुर्विचा आनंद हो कासाविस झालेल्या मनाचा विचारला तरी न सांगण्यासारखाच असतो. आता तसाच हर्ष माझ्या मनाला झाला होता. ईतक्या जवळच्या पत्रानंवर पानांनवर टपटप हा असा आवाज सुरू झाला, पाण्याचे मोठे मोठे जोरात थेंब पडायला सुरवात झाली.
ऐरवी पावसाळ्यात पाऊस येणार म्हणटलं की माणसे लवकर निवारा गाठत असता पण आताचे तसे नव्हते, मी तसाच ते वार सहन करत हळुहळु शेतातल्या गोठा पतरे टाकलेल्या दिसेने जाऊ लागलो पण घाई काहीच नव्हती, तेवढ्यात जोराच्या पावसाच्या सरी यायला लागल्या व माझे चालत असलेले आचानक थांबले; जणु काही त्यांना लहानपणाचीच आठवण आली झाली अशीच वाटले. मनही आतुन आनंदावले व चेहऱ्यावर आनंदाचे हसू आले.
दोन्ही हाताची तळवे पसरून व चेहरा वर करून मी ती पावसाची मोठी थेंबही झेलत होतो. म्हणतात ना निसर्गाची किमया ही न्यारीच असत आचानक व काही क्षणातच तो अणखिच जोरात येऊन माझ्या अंगावरील कपडे सारे पार भिजून टाकले.
मनात न मावेल ईतका अनंद झाला होता.
सारी पाने, झाडें भीजली व गुरे उड्या मारू लागली, त्यांनाही जणू मज्ज्याच वाटत होती.
'नेहमी असच व्हायच की, सारीच मुलं पहिला पावसाच्या धारात उड्या मारत, किंकाळ्या मारत नाचत बागड़त आसतं तसेच वातावरण मनात निर्माण झाले होते.'
मीही त्यांना पाहुन जवळ कोणीच नसतांनीही हासू लागलो....
सर्वत्र पाहिले सुखमय वातावरण पसरले होते.
सर्वच जणू ज्याची वाट आतूरतेने पाहात होते, तोच हा "वळीव" म्हणजे पहिला उन्हाळ्यातला पाऊस होता. मन पुढीलच नाहीतर आताच्याही थेंबाने अगदी भारावुन गेले होते नी सुखावले ही होते की, आता पावसाळा चांगलाच होणार.
रानं सारी पुर्व उन्हाळी मशागत करून पडलेली होती. नेहमीसारखाच ( पाऊस पडल्या नंतरचा) मातीचा सुगंध ही दरवळत होता. ईतक्यात थोडा थांबुन अणखी एक जोरात पाऊस आला सारी जमीनही भिजून गेली, रातीव कडक, चरबट अशी सर्व ढेकळे पार पावसाने फुटुन त्यांची वावरी (माती) झाली. आता सर्व सर्वांची कामे थांबलेली होती.
पण मनं सर्वांचीच आनंदाने न्हावुन गेली होती.
काही मिनिटातच हे सारं घडलेलं होतं.
म्हणून आनंद हा ही आवचीत आलेल्या एखाद्या आतिप्रीय व्यक्तितगतच व्यक्तिगत होता. आजून म्रुग दुरच होत, तरी मन या पावसाने व आशेने खुप खुप सुखावले होते,
तसेच पुर्वीची ती चटकेदार लाही करणारी गर्मीही आता थोडी कमीच झालेली होती.
म्हणातात ना " निसर्गाची करणी, नी नारळात पाणी" हे असच झालेल होतं. तसा पाऊस कमीच पडला होता, पण मनात पाणीच पाणी झाले. अस वाटत होत.
असचं असतं "निसर्गचक्र".
क्षाणातच सार बदलून टाकतं.
'क्षणात ऊन तर क्षणाचाच पाऊस.
क्षणाचे दु:ख तर क्षणातच सुख.'
" पाऊस पडतो अंगणी,
सुख भरतो पण मनी...
हे सारे जग सुखावती,
प्रेम भरलेल्या भावनांनी..."

