भावनांचे हाल
भावनांचे हाल
आम्ही एक वेळेला ऊन्हाळा घालवायला "कश्मीर" हे निवडलं तसे काश्मीर हे खूप थंड गार वातावरणाचे राज्य आहे, त्यामुळे तेथील वातावरण उन्हाळ्यासाठी आरामदायक व समाधानकारक शीतलता देणारे असते.
आम्ही पण याच कारणाने शरीराची व संसाराची धगधग दूर करण्यासाठी तिकडे निघालेलो होतोत. आमच्या गावापासून तीन दिवसाचा रेल्वेने प्रवास करत आम्ही काश्मीर, जम्मूला पोहोचलो . येथे एका विश्राम शाळेत थांबलो व दुसर्या दिवशी आम्हाला पुढील काश्मीरच्या प्रवासासाठी निघायचं होतं म्हणून जम्मु लाच एक रात्र आराम करून, पुढे रेल्वे नसल्याने गाडी करून काश्मीर फिरण्यासाठी जावे लागायचे
मंग आम्ही आठ जणात एक गाडी करून अशा तीन गाड्या 24 मुलं पुढील प्रवासाला सकाळी उठून सर्व आटोपून सर्व सामान सोबत घेऊन काश्मीर ला जाण्यासाठी निघालो. जम्मु चे वातावरण तसे थोडे गरमच असते, पण जम्मू सोडल्यानंतर 40 किलोमीटर पुढे गेल्यावर काश्मीरला जाताना दोनशे किलोमीटर पूर्ण घाटच लागत असतो. तिकडील वातावरण मात्र थंडगार हिरवळ उंच उंच झाडेच झाडे आभाळाला टेकणारे व त्याच्या हि वरी जाणारे उंच उंच डोंगर पाहायला मिळतात. आम्ही सर्व ती मजा घेत होतो , खूप खूप आनंदात मजेत प्रवास करत होतो. चांगल्या चांगल्या ठिकाणी चे फोटो ही काढत होतो कायम आठवणीत राहावा अशी बरीच आहेत. तिकडे काश्मिरी भाषा बोलणारे लोक आहेत तसा जास्त तिकडे मुस्लिम समाजच जास्तच वास्तव्यास आहे.
तिकडे शेती कमी आहे, म्हणून हे लोक डोंगराच्या कडेला थोडीफार शेती करून जगतात व शेळ्यामेंढ्या व गुरे तसेच घोड्याची "खच्चर" ही एक जात पालन करत जनावरे पालन करून आपले उदरनिर्वाहा साठी चा व्यवसाय करतात. काही लोक हॉटेल व लॉजिंग व्यवसाय करतात. मुख्य व्यवसाय म्हणून जास्तीत जास्त सफरचंद उत्पादन काढतात .
तसेच डाळिंब मका झाडाची अनेक फळे उत्पादन काढून आपली सा्ऱ्या गरज भागवतात.
आम्ही प्रवास करत असताना, जेवण्यासाठी एका ठिकाणी एका हॉटेल जवळ छोटीशीच होती सुंदर व सुशोभित करून सजलेली हॉटेल दिसल्यामुळे तिथे थांबलो. सगळ्यां सर्वांनी आपापले पसंतीप्रमाणे जेवण्याची ऑर्डर केली.
मी पण एका टेबलावर माझ्यासोबत चार-पाच मुलं घेऊनआमची जेवणाची ऑर्डर दिली. हॉटेल रोडवरच असल्यामुळे आजूबाजूला सगळे डोंगर कडेकपाऱ्यात हिरवळच हिरवळ, सुंदर सुंदर झाड अगदि रम्य वातावरण होते म्हणुन मनाला खूप आनंद दाई होते. आम्ही तिथं जेवण्यासाठी बसलोत. सर्वामांच खुप भुका लागल्या होत्या जेवण आल्यानंतर जेवायला सुरुवात केली. तितक्यात शेळ्या घेऊन सहा ते सात वर्षाचा मुलगा तिथुन कपडे शर्ट पुर्ण हात व पाय झाकू शकतील अशा अशा अशा पद्धतीचे कपडे घालून शेळ्या हाकित चालला होता. मी घास घेताना त्याची व माझी अचानक एक नजर झाली.
गोड मुलगा होता पण खूप गरीब असल्या कारणाने त्याच्या अंगावरचे कपडे व शेळ्या संभाळीत असल्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीचे झालेले होते. मी त्याच्याकडे पाहत होतो तो एक करूण नजरेने माझ्याकडं पहात हसत थोडा उभा राहिला. मी घास थांबून थोडावेळ त्याच्याकडे पाहिलं आणि मला वाटलं त्याला भूक लागली आहे की काया? या भावनेने त्याला खुणावलं तुला जेवायचे का? म्हणून त्यालाही बहुतेक खूप भूक लागलेली होती, म्हणून तो मान हलवीत जवळ आला, आल्यानंतर मी त्याला जवळ घेतले व 1 प्लेट मागवुन त्याला जेवण्यास सांगितली. त्याला माझी मराठी भाषा कळत नव्हती म्हणून मी थोडी हिंदी बोलून त्याला जेवणात सांगत खुणावित होतो. तोही जेवण करू लागला, त्याच्यासोबत एक माणूस होता .तो त्याला व मला पाहून हसू लागला. मी म्हणलं जेवायचं का फक्त तो नाही म्हणाला . तो मोठा माणुस होता. मुलगा जेवत होता आणि त्याला पाहून मी खुश होतो. तो इतक्या पटपट जेवत होता की , त्याला जणू काही हे अन्न कधी खायलाच मिळाल्या नसल्यागत खात होता. खाता खाता त्याला जरासा त्यास टसकाही लागला मला थोडेसे हसू आले व मी म्हणालो , 'दमसे खाव ! '
मग तोच जरा दमाने जेऊ लागला जेवण झाल्यानंतर त्याने हात धुतला व शर्टलाच पुसला. मी व माझे सगळे मित्र त्याला पाहून आनंदित झाले व हसू लागले.
मी जेवण झाल्यानंतर त्याला विचारले, ' कहा कहा के हो ?' तो काहीच बोलत नव्हता. बहुतेक त्याला हिंदी जास्त कळत नव्हती व मला काश्मिरी भाषा बोलता येत नव्हती. त्या मोठ्या इसमाला त्याच्यासोबत असलेल्या मी जवळ बोलून विचारलं , 'कहा के हो?' तेव्हा तो एका गावाच नाव घेत म्हणाला, ' बाबूजी पास एक गाव है, वहा रहते है. 'त्या मुलाला व आम्हालाही त्या मुलाचा जरासा लळाच लागला होता.
मी त्या माणसाकडून याची चौकशी केली तर एक बाब अशी निदर्शनात आली की या मुलाला मागेपुढे कोणीच नातेवाईक, आई वडील सुद्धा नव्हते. तो अनाथची होता. गावचा हा माणूस त्याला शेळ्या सांभाळण्यासाठी रोज न्यायचा व जेवण साधारण कपडे याची पूर्तता करायचा. हे ऐकुन मला धक्काच बसला. ज्यावेळेस त्याने त्याची आईवडिलांची व नातेवाईकाची का नसल्यामुळे, विचारणी केली, तेंव्हा त्याने हकीगत सांगितल्याने काय झाले होते ते ,
मी त्याला विचारले होते त्याने म्हणजे मोठ्या माणसाने त्याच्यासोबतच्या सांगितले की आतंकवाद्यांच्या हल्ल्यामुळे ते बंदुकीच्या गोळीबाराच्या हल्ल्यामध्ये याचे आई-वडील दोन बहिणी व सात नातेवाईक वेगवेगळ्या ठिकाणचे पूर्ण मृत्यू पावले आहेत. अक्षरशः मला व माझ्या मित्रांना ते ऐकून जोराचा धक्काच बसला. आता सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल आणखीन करूणाभाव निर्माण झाला होता.
तसा शांत शीतल व नशीब नैसर्गिक सुंदरतेने नटलेला तो काश्मीरचा भाग स्वर्ग आणला जातो. या स्वर्गात अशी अनेक दुःख दुःख ही पाहायला मिळतात. हा सर्व आतंकवाद्यांनी केलेला खेळ खेळच होता, बहुतेक त्यांना तो खेळच वाटतो की काय त्या मुलाची ही अशी दशा त्या आतंकवाद्यांनीच केली होती. मनमर्जीपणा मुळे खूप लोकांचा प्राण गेलेला होता व तो मुलगा अनाथ झालेला होता. मला सांगता येणार नाही ती घटना त्याने त्या चिमुकल्याने, कुणासही पाहण्यास न मिळो अशी पाहीली होती. तरी जीवन जगावाच लागते व जगतही तो होताच.विचार करा त्याच्यावर ती वेळ कशी असेल तर!
आता आम्हाला सर्वांना त्या मुलाची दया व मनात हळहळ निर्माण होऊ लागली . मी त्याला जवळ बोलिला, तोही आला त्याला सर्वांनी कोणी आईस्क्रीम, कोणी खाण्याची पुडे, तर कोणी फॅन्सी कपडे घेउन दिले. काहींनी तर एक दोन खेळणीही त्याला दिले. तो हावऱ्यागत सगळं एकदम सुख मिळाल्यागत घेऊ लागला. मला एकदम आपुलकीगत भावनेत भाव निर्माण होऊन, माझ्या तोंडातून शब्द निघून गेले ' तुमको हमारे साथ आणे का क्या? चलोगे क्या हमारे साथ?' बहुतेक त्याला ही आमची आपुलकी लागल्यामुळे हृदयातील भाषा त्याच्या हृदयाला असं कळली असावी व तो मला यायचे आहे, असे भाव डोळ्यात दाखवत आमच्या आणखीन जवळ आला. आता आम्हाला काहीच सुचत नव्हते. काय करावे ते. त्याला सोडलं तर त्याची मन नाराज होईल व आम्हाला त्याला त्याचे पहिले दुःख पाहून आणखीन दुःख त्याला देऊ वाटत नव्हते. बाकीचेही ही गोष्ट पाहून सगळेजण विचारात पडले होते .
मग मी हळूच खाली बसून त्याला छातीला लावून, त्याला म्हणालो, ' बेटा! हमे बहुत दूर जाना है, हम बहुत दूर के है ! तुझे इतनी दूर तेरे गाव से कैसे ले जायेंगे?' त्याला सर्व काही बोलणे कळत नव्हते, पण माझे बोलणे त्याला भास करुन देत होते की, आम्ही आता त्याला इथेच सोडून जाणार आहोत. त्याने आणखीनच घट्ट मला मिठी मारली व डोळ्यात अश्रू आणले
बहुतेक ते अश्रू याच्या समोर घडलेल्या आतंकवादी हल्ल्याची वर्णन व जाणीव करून देत होते असे; अशी माझ्या हृदयाची भावना व करून पणाणे मनाला जाणीव करून दिली होती आशी खूप लोकं आहेत काश्मीर मध्ये की त्यांचे जवळची, कुटुंबातील कोणी ना कोणी आतंकवादी हल्ल्यात ठार झालेले होते. खूप भयाण वाटत होते. हृदय दाटून आलेले होते. मला त्याला सोडून जाऊ वाटत नव्हते. तोही मला सोडत नव्हता.
मग मी एक आयडिया केली मुलांना जवळ बोलून याला "जर आपण गाडीतून थोड्या दूर फिरवून आणू व सोडून देऊ सोडून देऊ ! हे म्हणता वेळेस कंठ खूप दाटून आला व येऊ लागला," सगळे तयार झाले.
मी त्या मोठ्या माणसाकडून परवानगी घेऊन, त्याला चक्कर मारून आणतोत म्हणून नेतोत व थोड्यावेळाने येथे सोडून तुमच्यापाशी जातो. तो हि समजदार होता समजून घेतले "ठीक है! " म्हणत शेळ्या जवळ थांबला.
मग मी त्याला गाडीत बसवले. त्याला दिलेल्या वस्तूही एका पिशवीत सर्व टाकून लांब थोडं चार पाच किलोमीटर नेले.
तो पूर्ण घाट होता. त्याने काही वेळाने एका वळणावर गाडी थांबण्याची खुण केली. मला कळलेच नाही तू काय करत होता तो, गाडीतून उतरून त्याने दूर जाऊ जाऊन, थैलीत दहा-बारा मक्याचे कणीस व डाळिंब व बारीक बारीक सफरचंद; ते काश्मिरला काही प्रमाणात रोडच्या कडेने माळावरचा उगवतात. त्याने ते तोडून आणले व आम्हाला दिली. सगळी मुलं खूप खुशखूश झाले आता तो आम्हाला छान छान अशा भावनेने ती फळं आहेत आहेत असेच खुणावत होता व लगेच आता त्यांनी आम्हाला परत नेण्याचे खुणावले.
बहुतेक त्याला कळाले होते की आम्ही त्याला कुठे नेणार व कसे सांभाळणार? आम्ही करूना अधिक निश्चलतेचास श्वास घेऊन शांत पाहत होतो. थोड्याच वेळात आम्ही त्याला परत नेऊन सोडले. तोही गाडी खाली उतरून आम्हाला हाताने टाटा करत नाचत होता. मला कळली होती. त्याच्या भावनेची हालं झालेले असूनही तो किती आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत होता.
तसंच मी काही त्याला थोडीशी पैसे हातात देऊन आणि आम्ही त्याला भर भरलेल्या हृदयाने टाटा बाय-बाय करत. पुढील प्रवासाला निघालो व काश्मीर सारे फिरून पाहून परत घरी आलो.
