STORYMIRROR

सुर्यकांत खाडे

Inspirational

3  

सुर्यकांत खाडे

Inspirational

मानव जन्म वपणात पण

मानव जन्म वपणात पण

4 mins
223

तसे म्हणतात 'बालपण' व 'म्हातरपण' थोडस सारखच असतं,

ते तर खरचं आहे म्हणा....

कारण ज्यावेळी माणूस जन्मतो आणि ज्यावेळेस अंतिम चरणात जातो, सर्व चेतना अत्यंत शुल्लक राहिलेल्या असतात.

 पण मुलं जन्मले की सर्वांना आनंद होतो सगळेच नाते सुखी होतात,

तसेच माणसाचा म्रुत्यु झाली की सगळी नाती दु:खी होतात.

ही तर भावनीक गोष्ट आहे... हे हवे ही...

यालाच जीवनाची भावनिकता म्हणतात.

पण कुठ कुठ काय ना;

या भावनांचा अतिरेक होत चाललेला कधी कधी दिसतो.

एक नुभव सांगतो.... जरासा सर्व नाही....

एका गावात दोन शेजारी घरे होती.

ते दोन्ही कुटूंब वेगळे होवुन राहत असत.

त्यात घरात काही लोक राहात होती,

दोन्ही घरात एक एक जोडपं राहात होते.

जोडपे तरूणच होती नेमकीच लग्न झालेली होती.

एक वर्षे होवुन लोटली होती.

एका घरात एक मुलगा जन्मला आला,

 त्यावेळेस त्या मुला आनंद सगळ्यांनाच झाला व सर्व नाते वाईक की त्याला पाहण्यासाठी येत असत, गावीच काय मला वाटते सर्वत्र कुठेही नाते वाईक उल्हासाने मुल झाले की त्याला पाहावयास येतात व येतांना काही कपडे व कोणी डाग डागीणे आणतात व त्यामुलाला घालता व त्याची माया करतात.

गावी हा उल्हास जरा जास्तच असतो.

त्यात पहीलं मुल म्हंटल की आनंद गावी जरा जास्तच असतो, अस मला वाटते व पाहायला मिळते.

तसेच झालं. त्या जन्म झाल्यावर एक महिनाभर नातलग येवुन त्या पाहुन व काहीतर देवुन जायचे व आनंद व्यक्त करायचे.

झालेला मुलगा ही गोडं व गुबगुबीत होता.

सगळ्या आवडत होता व सगळे त्याची स्तुती करत होते. रोज संध्याकाळी त्याची आई नजर उतरवित होती....

तो पाळण्यात डाग डागीण्याने मडून गेला होता व मजेत खेळत होता.

त्याला पाहुन आई-वडीलांची खुशी तर गगनात मावत नव्हती.

ते जोडप पण सगळ्याची उठबैस व चाहापाणी व त्यांना घडेल तसे सत्कार करून वाट लावत.

त्यांनी त्याचे "दिपक" असे ठेवाचे ठरवले. सगळे त्याला लाडाने दिपु... दिपु... म्हणायाला लागले.

आजा-आजी पण येवुन, राहुन, पाहुन जे सर्व आणाचे असते आणुन दिले व काही दिवसाने निघुन गेले.

 तसेच दुसऱ्या घरीही काहीच दिवसाने बाळ जन्मले. त्यांनाही एक नाका डेळ्यात सुंदर, गोंडस, गुबगुबीत व देखणी मुलगी झाली होती. आई-वडीलांना खुपच आनंदी आनंद झाला.

पाहुने येऊ लागले त्याच वरील प्रमाणे वस्तू आणीत व तसाच त्याचा सत्कार होत असत.

त्या मुलीची ही आजा-आजी आले. त्यांनी त्या मुलीला सर्व काही खेळणे वैगेरे आणले.

मजेत होते.

 सर्व पहिल्या काळीचे ते सर्व होते.

सर्व पाहुन येवुन गेले. उल्हासात सर्व आटपले.

एक दिवस त्या मुलीच्या आजीने कळत नकळत तोंडातून शब्द बाहेर निघुन गेला.

"माय, जर मुलगा झाला असता तर बरं झालं असतं." ऐव्हडाच, " पण काही होईना छान झालं." अस म्हणून तेही नंतर काही दिवसांनी निघुन गेले.

म्हणता म्हणता दोन्ही घरची मुलं मोठी होवु व खेळू, बागडू लागली.

दोन्ही आई वडीलांना पाहुन आनंद व्हयचा.

जसजसे ते मोठे होत गेले तसतसे भाव पहीले कमी होत गेले. ते हळू हळू शाळेत जाऊ लागले. 

जवळच एक शाळा पहिली ते दाहावी पर्यंत होती. त्या शाळेत ते शिकत जात.पाचवी, साहावी व सातवी पर्यंत ते सगतीने तसचं जात पहील्या सारखे एकत्र थोडावेळ खेळतही असत आभ्यास करत असतं. नंतर ते मोठे होत होते तसतस ते जरा कमी होत गेलं दोघांचे आई वडील ही त्यांना सांगत तुम्ही आता मोठे झालात जरा वेगवेगळे राहत जा खेळत जा. मुलीला मुलीन व मुलाला मुलान सोबत राहायच सांगत ते पण ऐकत व तसच करत.

दाहावी पास झाले. आता मात्र गाव तस मोठ होत, अन काँलेज खुपच दुर असल्यामुळे मुलाच्या नाही, पण मुलीच्या पुढील शिक्षणाचा आई-वडीलांना विचार करावा लागायचा. त्या काही कारणाने त्या मुली पुढील शिक्षण जरा खोळबलं. आता तिला घरची कामेही लागली, आईला हातभार लाववा लागत म्हणून करावा लागत. येरवी गावात असच होत मुलींच याच कारणाने गावात कमी होते. असो

आता तिची व त्याच आजा-आजी आता जरा धकले होते म्हणून आता दोन्ही घरचे काही अंतरा राहायला यांच्याकडेच आलेले होते.

त्या मुलीला न शिकन्याचा व मुलाला शिकवन्या सल्ला ही त्यांनी दिला. ऐव्हना शिक्षणात मुलगी हुशार आसुन सुद्धा व मुलगा थोडा खेळण्याकडे लक्ष जास्त आसल्यामुळे कमी हुशार आसुन सुद्धा तसेच झाले. 

काही दिवस लोटले. आता दोन्ही म्हातारा व म्हातारी थकलेली होती त्यांची देखभाल करणे गरजेची होती. दोन्ही जोडपे शेतात कामाला जात अल्यामुळे त्यांना त्यांच्या पाशी बसून राहायाचा वेळ मित नसत.

 पण मुलीच्या घरी मुलगी असल्यामुळे त्यांची सोय व्हायची. त्या उलट मुलाच्या घरी कोणीच नसल्याने व मुलगा खेळकरू असल्याने, शाळेतुन चारपाच वाजता आला की थोडावेळ बसायचा व बाहेर निघुन जायचा खेळायला.त्या दोन्ही आजा-आजीना म्हातारपणामुळे दिसन व ऐकन कमीच झालेल. चालता येत नव्हत, काठ्या हातात आल्या होत्या माना हलत होत्या.

अशातच मुलाची आजी एके दिवशी पाहीरीवरुन उतरताना पडली. जवळ घर असल्याने, ती मुलगी धावत आली व त्या आजीला त्यांच्या घरात नेवुन बाजावर झोपवल व पाणी खायला दिल. पण त्यांची खुप दशा झाली.

तेंव्हा त्या आजीच्या तोंडातून कळत नकळत शब्द निघुन आले, ' माय, मला पण तुझ्यासारखी नात हवी होती'.

नंतर काही कालावधीतच मुलाची अगोदर आजी व एक दोन वर्षांनी आजोबा देवाघरी गेले.सर्व कार्य करतांना खुप पाहुने आले. घर तेंव्हा दु:खात बुडाले.

पण आजुन मुली घरचे आजा-आजी जिवंत होती. काही वर्षे लेटली की याही घरचे अगोदर आजोबा वैकुंठवाशी झाले. पण आजी आजुन पुण्य केलेले होत की काय जीवंत होती. असच एकेदिवशी ती मुलीला जवळ घेवुन जाणीवेन म्हणाली, ' माय तु आहेस म्हणून मी आजपर्यंत टिकले !'

हिच आजी ती होती की जिच्या तोंडून कळत शब्द निघुन गेले होते, "माय, जर मुलगा झाला असता. तर बर झाल असतं."

काही कालांतरने तीही वर गेली...


"रामराम...!"

धन्यवाद...!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational