हृदयाचे तुकडे...(ब्रेकअप)
हृदयाचे तुकडे...(ब्रेकअप)
बहुतेक "घटस्फोट" व "प्रेम ब्रेकअप"
हे गैसमजेतूनच होतात, एकदा का गैरसमज झाला की अन संशय आली की त्याला विलाज नसतो म्हणतात.
ऐव्हान खूप अतूट व कित्येक काळ चालत आसलेले प्रेम ते सुद्धा; नव्ह्यानो टक्के लोक यातून अलग होतात...
तसा हा "एक वेगळाच प्रेम ब्रेकअप" आहे.
असाच एक प्रकार घडला.
एका मुलीचे व मुलाचे एकमेकावर अतिशय अविस्मरनिय प्रेम होते.
ते दोघे ही एकाच कॉलेज, एकाच वर्गात शिकत होते.
त्यातच त्यांचे कुणाला कळत नकळत मन व नंतर प्रेम जुळले.
प्रेम म्हणजे असे की ते कोठेही असोत जेवण्यी पासून ते सर्वच महत्वाच्या गोष्टीपर्यंत एकमेकाच्या विचारांनी करत असत.
अगदी आपआपल्या ठिकाणी जेवणं पण ते संगच बसून करत असत.
म्हणातात ना प्रेम असच दोन हृदयाना मिळून होते व व्हाव नी आसावच,
पण यांच जरा हाटकेच होते, मलातर वाटतय की त्यांचे ह्रदय दोन नव्हते एकच हेते, अर्धे त्याच्या शिरीरात तर व अर्धे तिच्या शरीरीत असल्यासारखे वाटत.
अगदी दु:खात पण एकमेकांशी तसच राहात.
ते मोठ्या घरचे 'हाय सोसायटी' व मोठे सुशिक्षीत मुलं होते. काहीच कमी नव्हती व कसलेच बंधन ही नव्हते.
त्यांच्या प्रेमाला कुणाचाच विरोध नव्हता.
निर्णय त्यांचे त्यांच्यावर असल्या कारणाने काही प्रश्नच नव्हते.
जसे एका बागेतील, एकाच झाडाची, एकाच फांदिवर असलेले फुले जसे समपर्णानातक राहातात; तसे ते दोघ राहात असतं.
या गोष्टींमुळे त्यांच्यावर लग्नकार्य व सामाजिकतेचा काहीच प्रभाव पडत नसायचा.
कोणी लग्न करा ना ! असे सुचवले की ते "त्याची काय गरज आहे" असं पण म्हणून टाकत व चलत.
खरच मी पण पाहीले की कित्येक लग्न करणारी माणसे पण सुखी नसतात.
'असो !'
आसेच अनेक दिवस निघुन जात होते.
ते आधिच अतुट प्रेमात गुंतले होते.
एक वेळेला काय झाले की मुलीगी आजारी पडली तिला आजारामुळे जेवण जात नव्हते तो अजार जरा गुपितच होता.
कारण ते दोघ आताच्या ज्या गोष्टी एक 'बाँयफ्रेंड' व 'गर्लफ्रेंड' सहमत असतात त्याचप्रमाणे,
शरीरीक सुखाच्या सहमतीनेच व सर्वसुरक्षीत पणे करत असत.
पण हा आजार त्यातूनच जडला होता.
असे डाँक्टराचे म्हणने होते.
तरीही त्यांचे प्रेम कमी नव्हते.
आतातर तो तीला नी ती त्याला एक क्षण सुद्धा सोडून राहात नव्हते.
अणखीनच प्रेम वाढले होते.
पण म्हणतात नियतीला काही गोष्टी मान्य नसतात, त्या गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात.
ज्यास्त प्रेम पण केले की काहीतरी "इफेक्ट" ही निर्माण होतोच, तसच झाले ईथ....
सात वर्षे असेच लोटत होती ती.
विलाज करतच होते.
त्यात आत्ताच्या औषदी म्हणटल की,
तात्पुरता विलाजासाठीच आहेत की काय?
थोडे बरे वाटायचं व नतर तसाच त्रास होत होता.
कारण तो त्रास 'किड्ण्यांचा' होता आणि 'किड्णी प्लान्ट' चा पर्यायी प्लाँनला उशिर झालेला होता.
असे डाँक्टर म्हणत होते.
दोघेही दु:ख अधिक सुखात राहात होते.
मुला दु:ख हे तिचा विलाज होत नव्हता व सुख आता सारावेळ तिच्या जवळच राहायला मिळत होत.
अन तिला मात्र सुख कमी व दु:ख जास्तच होत.
कारण तबेत्त खालावत चालली होती व त्याला काही सुख देऊ शकत नव्हती अगदी हसण्याचे सुद्धा दु:खणे तसेच होते, पण तो तिला पुर्विपेक्षा जास्त प्रेम करत होता, हे मात्र तिच्या मनाला सुख देत होते.
काय करणा शरीर साथ देत नव्हते.
तिचे समजा मरणे निच्छित झाले होते; असेच तिला वाटू लागले.
तो ही विचार करायचा तिचा व कधी कधी उदास व्हायचा, पण स्वत:ला सावरून तिची काळजी घ्यायचा.
त्यातच तिला त्याच्या पुढिल जीवनाची काळजी भेडसावत होती.
तिही आजारात असून तो विचारच करायची.
साडेसात वर्षे झाली अन साडेसाती चालू झाली ती म्हणजे तिच्या विचाराची.
ती एक, दोन, तिन वेळ त्याला बोलली पण की तु कोण्या दुसऱ्या मुली बरोबर जवळी कर म्हणून.
त्यावर तो चिडून बोलायचा, ' आता बोललीस ! यापुढे अस बोलायच नाही !'
चिंतेन तिची तबेत्त अणखिन खालावत चालली होती, ती एकदम अशक्त झाली होती.
शरीराने व मनाने पण....
एक दिवस आचानक ती त्याच्यावर चिडली व, ' तु जा बर ईथुन ! मला तुझे काहीच नको!' असे बोलुन गेली.
तो सुरवातीला अश्चर्य चकित झाला व नंतर समजुन घेत म्हणाला, 'ईतके प्रेम करू नकोस माझ्यावर!' आणि पुन्हा तिची सेवा करू लागला....
त्याला खरच कळल होते की ती प्रेमातून करतेय....आपल्या दुर ठेवण्यासाठी.
तितक्यात तिची एक सोबतची सिकणारी मैत्रिण तिला भेटायला अली होती ती खुप गरीब होती पण मनाने चांगली होती व सुंदर ही होती....
त्यावेळेस तो जरा बाहेर गेला.
तसे तिला भेटायला अनेक सहकारी आधुन मधुन येतच असत,
पण हा वेळ जरा वेगळाच होता.ती विचार करत होती,
तेवड्या तिने त्या मैत्रिनीला म्हणटले, 'ज्योती, मी आता मरते बघ ! तर तू माझे एक मागणे देशील का?'
ती दंग झाली पण मोठ्या मनाने म्हणाली, ' तेरे लिऐ तो जाँन हाजीर है यार! बोल ! मै क्या दुँ तुझे?'
तीच्या मनात काय चालल होत नकळता ही तिने तिला शब्द दिला.
ती विचार करू लागली.
तितक्यात मैत्रिण सिरीयस होऊन म्हणाली, 'असा विचार करू नको ! सांग तू , मला शक्य असेल तर तुझ्यासाठी नक्किच ते मी करेल.'
बस हिली ऐवडच पाहीजे होत.
ती म्हणली , 'शक्य आहे तेच मागेन ग !'
' मग ठिक आहे बोल !' मैत्रिन म्हणाली.
मैत्रिणीला तिने स्वत:च्या मनातली गोष्ट सांगीतली.
आता तिला त्याची एक प्रेम करणारी तिच्या सारखी नाही पण त्याच्या पुढील जीवनाची सोय करणाऱ्या मुली संगे लग्न करून देवुन, जायची होत की काय? असा तिचा विचार होता बहुतेक.
तिने मैत्रीनिला विचारल, 'एक काम कर , माझ्या दिपकला घेऊन जा आणि माझ्यासाठी एक चांगली तुझ्या पसंतीची दिपकला काही न कळता साडी आण.
हे नुसत काम आहे; अणखीन मागणे बाकी आहे माझे. वचन दिलेस तू ! पण दिपकला यातल काही कळू देऊ नको!' अस सांगीले....
बाहेर जाऊन मैत्रिण दिपकला बोलली व ते दोघे बाजारातून साडी घेवुन आले.
ती उठुन बसलेली होती व जणू वाटच पाहात होती.
त्या दोघा कडे पाहुन ती म्हणाली, 'दिपक मला साडी अणलीस ? तुला माहीत नाही का मला ड्रेस आवडतो ना ! मग साडी कुणासाठी आणलीस?(मैत्रिणीकडे हात करत) हिच्यासाठी का?'
तो आचंब होऊन बघु लागला व लगच तिला मिठी मारत म्हणाला, 'पुजा अस करू नकोस !'
मैत्रिण शांत उभी होती, बहुतेक तिला अगदोरच पटवल होत की अस करायच.
की आमचा "ब्रेकअप" झाला पाहीजे पण तो बेत हुकला होता, त्याला कळलं होत.
मागील काही तिने केलेल्या गोष्टींमुळे.
ती हात:श झाली व हात जोडू लागली.
"मला ब्रेकअप दे! मला ब्रेकअप दे ! शेवटची ईच्छा पुर्ण कर !' अस म्हणत रडू लागली.
त्याला ते देखवेना थोडा स्तब्ध झाला व भरलेल्या कंठाने म्हणाला , 'हो ! देतो तुला ब्रेकअप, पण मला ईथुन जायच सांगू नको दुर करू नको. शांत हो आधी तू!' काय करणार वेडीपुढं?
ती जरा सावध झली व, ' हो! दे आता ब्रेकअप !'
त्याने प्रेमान शब्द दिला, ' दिला तुला ब्रेकअप!'
ती मैत्रिणकडे पाहात हात जोडून, 'माझ्या दिपकला सांभाळशील का ? त्याचा हात धरून ठेवशील का?'
ऐवढे मागुन ती पलंगावर शांत झोपली...
ती परत न उठण्यासाठीच...
(तात्पर्य -"ब्रेकअप" व "प्रेम" असे असावे....❤)
🍁🙏🙏🙏🍁
