STORYMIRROR

सुर्यकांत खाडे

Tragedy

2  

सुर्यकांत खाडे

Tragedy

पत्र आणि पात्र

पत्र आणि पात्र

4 mins
46

सहजासहजी न समजणाऱ्या व न उलगडणाऱ्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या सोबत, जीवनात कधी न कधी, कुठे न कुठे नेहमीच घडत असतात, असाच एका मित्राच्या नशिबातील व पात्रतेचा परीचय व परीक्षा घेणारा प्रसंग घडलेला होता. पात्रता म्हणजे नेमक काय आणि ही पात्रता नेमकी कोणी व का ठरवावी ? याल फार महत्व आहे. तसेच बिनबुडाचे आरोप करून एखाद्याच्या चिरीत्र्यावर संशयास्पद वक्तव्य करणे हे मनाला खुप आघात कारक वाटते व या सारखे वाईट कहीच नसते. एकदा असे झाले की, माझा मित्र असाच एकटा विचार करत हातात खडे घेवुन उगाचच खाली पाण्यात मारत बसलेला, मी शेतात जात असतांना, तो गावाबाहेर एका पुलावर पाहीला.

 मी त्याला विचारले , ' आरे, असा तू एकटाच का इंथ बसलास? काय करतो इंथ ? काय झाल? काय विचार करतोस? सांग ना !'

तो माझ्याकडे वैचारीक नजरेनं बघत म्हणाला, ' आरे , किती प्रश्न विचारतोस 

! इंथ एका प्रश्नाच उत्तर मला मिळेना, अन....?' एवढं बोलुन तो पुन्हा गप्प बसला.

मी जरासा हसलो व त्याला विचारलं, 'काय झालं ? सांग बर तुझ्या मनातलं !'

त्याचं काहीच लपुन नव्हत माझ्या बरोबर, मी त्याला पटकन म्हणालो, ' सुजाताचा विचार करतोस ना.'

व जरासा गालात हसलो. तो परत माझ्याकडे पाहु लागला.....

मी जरा शिरीयस होवुन म्हणालो, 'त्यात काय एवढा विचार करायचा.'

तो अगदीच भारावुन गेला होता व विचार करत होता. मी त्याला बोललो, ' तुला तर ती चांगलं बोलते ना, मग काय झालं ? '

तो लगेच, ' नुसते चांगल बोलते. पण पुढे काय असच चलाच का?' 

मग मी पटकन म्हणालो की, ' तुझा जर विचार असला तर 'प्रपोझ' कर ना तिला.'

तो , 'मला नाही बुवा ऐवढं जमत.'

मग त्याला पत्र लिहीण्याचा सल्ला दिला.

त्यानं तो मान्य केला , 'असच करू !'

असा तो म्हणाला.

' तु मला एक तस पत्र लिहुन देतो का? मला तेव्हडस जमणार नाही.'

मी , 'बर ! ' म्हणालो.

मी एक पत्र लिहलं,

" प्रिय सुजाता,

  तु खुप चांगली व सुंदर आहेस, तुझे बोलने ही अगदी गोडं आहे. अगदी मनात बसेल असेच.

आपण आगदीच खुप दिवसांन पासुन जवळीकतेच्या अगदीच टोकापर्यंत आलेलो आहोत. तुझ्या व माझ्या आवडी व निवडी माहीत व जुळतात. याचमुळे माझ्या मनाला तुझ्या विषयी खुपच भावनात्मक विचार ही येतात. त्यातुनच मी नेहमीच तुझ्या आठवणीतच रमतो व तुझ्याकडेच ओढला जातो. 

 तरी पण, हे असच कुठवर व कस चालायच. मला या बंधनाला, नात्याला काहीतरी नाव द्यावस वाटतं.

 मला कळत नाही, आपल्यातील असलेली ही, आपुलकीची भावना व ओढ आहेच, पण तु योग्य समजत असेल तर स्पष्टच सांगतो की, मला तू फार फार अगदीच मनापासून आवडतेस व मी तुझ्या सोबत कायमच राहावं, बंधनात बांधवं. असच मला वाटते.तुला समजलेच असेल मनातील माझे म्हणणे. तु सुध्दा मझ्याशी समरस वागतेस हे मला ठावुक आहे, म्हणुन

मी ठरवलय आता आपण दोघांनी एक व्हायचं. तुला हे मान्य असल तर तस मला कळवं. तुझ्या होकारा आपेक्षा ठेवुन, उपेक्षा करू नकोस आशी आशा ठेवुन तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे.

   तुझाच,

        आसितोश..."

हे असे पत्र मी त्याला लिहुन दिले व त्या तिला देण्यास सांगीतले.

 त्याने ते लिहिलेले पत्र तिला पोहोचिती केले. ही वास्तविकता जेंव्हा तिच्यापुढे उघड मांडली जाईल, तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होईल, याची आम्हाला खुपच उच्छुकता लागलेली होती. 

दुसऱ्याच दिवशी ती व तिची आई दोघी 

माझ्या मित्राच्या घरी आल्या व त्याच्या आईवडीलांना भेटुन गेल्या.

बहुतेक ते पत्राचा कारण घेवुन आल्या होत्या वाटतं. 

 पण जास्त बाऊ होऊ नये म्हणन त्या त्याच्या आई बाबांना बोलून गेल्या.

 माझा मित्र घरी गेल्यावर त्याला त्याच्या आई बाबांनी चांगलच झापलं.

 मित्राच्या सांगण्यावरून तिची आई मित्राच्या आई बाबांना नाहीनाही ते बरेच काही वेडवाकडं बोलून गेली होती.

 त्याचा राग म्हणून त्यांनी मित्रावर नुसत मारायच उरल होतं; असा खुपच काढला होतो.

 मित्र हे सांगतांना अगदीच उदास होता.

आम्ही काय सोचल होत व हे काय झालं, याचाच विचार करतो होतो. मित्र आणखीणच विचारात पडला होता.

 मला समजले होते की, हे विचार करण एक वेगळ्याच वळणावर गेलेले आहे. आता याला वेगळच वळण लागल होतं. तस पाहील तर आमच गाव खुप मोठं ही नव्हत व तस छोटस ही नव्हत ही बातमी सर्वत्र पसरली की, असितोश ने सुजाताला

"चिठ्ठी" दिली. आता पत्राची चिठ्ठिच झालेली होती. मग काय सगळेच माघारी टिंगल करायला लागले. मी काहींना म्हणटो पण त्यात काय ऐवढं ते तर सरळ विचराणा करणारे पत्र आहे. त्यात माझेच शब्द होते वाईट काहीच लिहले नव्हते, तरी पण लोक टिंगल्ल वुडवत होते. काहीतर "लायकी", "पातळी" पण काढु लागले. पण म्हणतात ना "कुणाच्या तोंडाला काही हात लावता येत नाही" तसच झाले होते. जो तो याच चर्चेत रंगत होता. सर्वांनाच माहीत आहे की, अशा गोष्टीची चर्चा खुपच होते व लोक गैर समजुन, समजुन गैरसमज करून आवाच्याबावा करत राहातात.

 पण मन कुणालाच कळले नाही.

मग मला सांगा यात पात्र-अपात्र याचा कुठे काही संबध येतो का?

 काही वेगच होवुन बसलं होतं. मनातील सरळ व साध्या शब्दात विचारणा केलेले पत्र, पत्रच ना होतं ते, त्यात पात्रता कुठे येते व का आणावी. गरजच नाही.

पण हे अस घडल व घडतातही समजुन घेणाऱ्यांपेक्षा उपेक्षा करणारेच जास्त झालेले दिसतात या जगात...

 अपेक्षीत हव ते न झाल्यामुळे मित्रही अतिशय नाराज झाला व माझ्या मनालाही वाईट वाटले. पुढे मी त्याला समजावले.

तोही समजला व तुम्हीही समजुन घ्या की, अशा गोष्टी साधारण विचार असतात, पण त्याला वेगळे रूप मिळाले की त्याच असाधारण बनतीत पत्र पात्र कधीच ठरवत नाही.

तसेच समजुन घेतले की, सगळे समजते व ठिक वाटते, अन ठिक असते व ठिक होते असच वाटते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy