Geeta Ghatge Patil

Abstract

3  

Geeta Ghatge Patil

Abstract

मी जिजाऊ

मी जिजाऊ

1 min
178


मी जिजाऊ,

महाराष्ट्राच्या स्वराज्य सूर्याची मी जननी. मी घडविला धगधगता अंगार, सजवला शिवबाच्या मनी मुक्तीचा शृंगार.

मी जागवली अस्मिता, शिकवली समता, झाले रयतेची माता.मी पाहिले माझ्या आप्तांना डावपेच करून मरताना मारताना. मी भोगल्या यातना!मी बसवली घडी स्वराज्याची आणि शिवाने केले त्याचे सुराज्य. आखले मनसुबे नि नेस्तनाबूत केले गुलामगिरीचे पाश.स्वराज्य होत सर्वांचं. स्त्री-पुरुष, मुला-मुलींचे, इथे सन्मान होता रितिरिवाजांचा, मान होता माता भगिनींना. परस्त्री मातेसमान मानून तिची इभ्रत जपली जायची. माणूसच काय गवताचे पातेही मोकळा श्वास घेत होते,

मी सावली बनले माझ्या नातवाची, शंभूराजाची,

तो तर छावा माझा नि अवघ्या महाराष्ट्राचा. त्याने पादाक्रांत केली भूमी नि विस्तारला स्वराज्यवृक्ष आणि बिनघोर केला जनमानस. स्वराज्यात तुळस फोफावली अभिमानाने, तिला दहशत नव्हती. 

माझ्या मनावर झालेल्या जखमा भरत गेल्या स्वराज्यात सामील होणाऱ्या प्रत्येक दुर्गागणिक..आणि स्वराज्य मजबूत होत गेलं. रायरेश्वराला साक्ष ठेवून घेतलेली प्रतिज्ञा सुफळ झाली स्वराज्यसूर्य, हिंदू हृदयसम्राट ,माझं लेकरू छत्रपती झाल्यावर मी कृतकृत्य झाले.

या महाराष्ट्र भू चे स्वातंत्र्य अबाधित ठेवा माझ्या बंधू भगिनींनो!!

आपल्या चिमुकल्यात जाज्वल्य देशाभिमान रुजवा,

समानता रुजवा,


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract