Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

मेहुणी खट्याळ

मेहुणी खट्याळ

7 mins
263



       मेहुणी खट्याळ, मेहुणा नाठाळ!

          ' सावधान!' भटजींनी शेवटचे मंगलाष्टक पूर्ण केले. वाजंत्रीचा दणदणाट झाला. अक्षदांचा वर्षाव झाला. टाळ्यांचा कडकडाट झाला. तरुणाईचा जल्लोष घुमला. फटाक्यांचे दणदणीत आवाज झाले. चेहरे आनंदाने फुलले. नवरदेवाच्या मावस, चुलत, मामे भाऊ-बहिणींचा जीव भांड्यात पडला. तितक्यात नवरदेवाचा भाऊ आनंदातिशयाने ओरडला,

"जिंकलो! आम्ही जिंकलो!! जिंकलो रे जिंकलो..."

"आम्ही जिंकलो!"

"नाही झाली... नाही झाली..."

"नवरदेवाच्या बुटाची चोरी..."

"नाही झाली..." ती सारी तरुण मुले घोषणा देत असताना 'ती' तरुणी व्यासपीठाच्या पायऱ्या चढताना पाहून घोषणांचा, हुर्रेबाजीचा जोर वाढला. नवरदेवाचा बुट 'चोर' म्हणून त्या सर्वांचा जिच्यावर डोळा होता ती नवरीची बहीण लचकत,मुरडत, मधाळ हसत वधूवराच्या दिशेने निघाली असताना नवरदेव मुद्दाम तिचे लक्ष चोरीला न गेलेले दोन्ही पायातील बुट 'कदमताल' करत मेहुणीला दाखवून तिला खिजवत होता. ती मेहुणीही मोठ्या गर्वाने, जीभ तोंडातल्या तोंडात घोळवत नवरदेवाच्या जवळ पोहोचली आणि ओठांचा चंबू करत, डोळे गरगर फिरवत म्हणाली,

"जिज्जू, हम हारी हुई बाजी जितने मे माहीर है। आप का ज्युता चोरी नही हुआ क्योंकि हमने उसे चुराने की कोशीश ही नही की। क्योंकि हम पुरानी बाते दोहरानेमे यकिन नही रखते। हम हमारी शिकार खुद ढुँढते है। लेकिन हम आप को चैलेंज करते है, कुछ पलो मे आप की, इस फौज के सामने आप की ऐसी कोई चीज चुराऐंगे की आप सब देखते रह जायेंगे। कबूल है..."

"हमे आप का चैलेंज..." नवरदेवाने अर्धवट सोडलेले वाक्य त्याच्या मित्रांनी उचलले,

"कबूल है...।"

"ठिक है, पहले एक सेल्फी तो हो जाए..." असे म्हणत मेहुणीने टाइट जिन्सच्या मागच्या बाजूस असलेल्या खिशात हात घातला. परंतु तिथे मोबाईल नसल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिचा उतरलेला चेहरा पाहून नवरदेवाचा भाऊ तिला खिजवत म्हणाला,

"काय झाले? लढाईला निघाले आणि बंदुक विसरले असे झाले वाटते..."

"मोबाईल तर आत्ता येईल. जिज्जू, जरा तुमचा मोबाईल तर द्या ना..." मेहुणीच्या अतिशय लाडीक, गोड, मधाळ आवाजाला नवरदेव भुलला आणि स्वतःचा अत्यंत भारीचा मोबाईल मेहुणीकडे देत असताना वधू हलकेच त्याच्या कानात म्हणाली,

"अहो, कशाला तिला मोबाईल देता?" ते ऐकून मेहुणी म्हणाली,

"व्वा, ताई व्वा! हमारी बिल्ली हमसे म्याँव..." असे म्हणत नवरदेवाने पुढे केलेला मोबाईल हिसकावून घेत त्या मोबाईलचे चोहोबाजूंनी निरिक्षण करत एका वेगळ्याच अंदाजात ती ओरडली,

"बहुत किमती लगता है रे, दुल्हे तेरा यह मोबाईल. अरे, ओ मंगला..." तिची ती हाक ऐकून तिच्या मागोमाग आलेली तिची मंगल नावाची मैत्रीण समोर येत म्हणाली,

"क्या हुक्म है, सरकार?"

"जरा इस मोबाईल को देख तो जरा। हमारे लाडले जिजाजी का है।" तिच्या हातातला मोबाईल घेऊन खालीवर पाहात मंगल म्हणाली,

"सरदार, आप के जिज्जू का है, इसलिए बहुत महँगा है। बहुत महँगा है।"

"कितने का होगा... मोबाईल?"

"जी... जी... पच्चास-साठ हज्जार का तो होगा ही।"

"साठ हजार? बहुत किमती है रे,जिज्जू, तेरा यह मोबाईल, बहुतही किमती है। अरे वो, जिज्जू, ये मोबाईल हम को दे..दे.. हम को दे दे..."

"न ss ही..." नवरदेवही त्या वातावरणात वाहून गेल्याप्रमाणे ओरडला.

"नही देगा? मत दे। लेकिन इस को खुलवाने का कोड तो बता दे। एक सेल्फी तो बनती है। अरे, ज्याला ज्याला माझ्यासोबत सेल्फी काढायची आहे त्याने रांगेत या ... "असे म्हणत नवरदेवाने सांगितलेला कोड डायल करताच मोबाईल सुरु झालेला पाहून मेहुणी आनंदाने म्हणाली,

"कित्ती चांगला आहे माझा जिज्जू..." जिज्जू हा शब्द उच्चारताना तिने केलेला ओठांचा चंबू अनेकांच्या शरीरात भावनांचे तरंग कल्लोळ माजवणारा ठरला.

"तू इथे... तू इथे.. तू तिकडे जा. अग, तू दीदीजवळ उभी रहा..." असे सर्वांना सेल्फीसाठी उभे करत आपण स्वतः कुणालाही नकळत मेहुणी व्यासपीठाच्या एका टोकाकडे... पायऱ्यांकडे सरकत होती. व्यासपीठाच्या टोकावर उभी राहून सेल्फी घेऊन ती म्हणाली,

"जिज्जू, हमने चैलेंज किया था, हम अपना तरीका खुद ढुँढते है। ज्युता चुराना यह 'माधुरी दीक्षित' स्टाईल हम अपनाते नही। ज्युता नही मोबाईल भी चुराना छोडो, मोबाईल आप के नाक के सामनेसे छिनकर ले जा रही हूँ। अगर है किसी मे दम तो हम से छिनकर दिखावो।..." असे म्हणत मेहुणीने पायऱ्या उतरण्याची तसदी न घेता चक्क उडी मारली आणि ती धावत सुटली. कुणाच्या काही लक्षात येण्यापूर्वी ती लग्नासाठी जमलेल्या प्रचंड गर्दीत दिसेनाशी झाली.

"मी म्हणाले होते तुला त्या माकडीणीला मोबाईल देऊ नको. लग्न ठरल्यापासून माझ्या शेकडो मागण्या वरचेवर झेलणारा तू लग्न लागल्याबरोबर टिपिकल नवऱ्याप्रमाणे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मेहुणीच्या जाळ्यात अडकलास..."

"मला म्हणतेस पण तुझे काय? तूही टिपिकल जळाऊ बायको झालीस की. 'साली आधी घरवाली' असे म्हणतात. घेऊन घेऊन काय घेईल. दोन चार हजार रुपये किंवा एखादी जंगी पार्टी घेईल. उतना तो उसका हक बनता है यार।"

"म्हणे आधी घरवाली... कर तिच्या नावे आता आधी प्रॉपर्टी..." नवरी ठसक्यात बोलत असताना तिचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर बहिणीचे अर्थात तिच्या नवऱ्याच्या आध्या घरवालीचे नाव पाहून म्हणाली,

"घे. तुझी आधी घरवाली... मेहुणी काय मागणी घालते ते बघ..." तिच्या हातातला भ्रमणध्वनी घेऊन नवरदेव म्हणाला,

"मान गए साली... सालीसाहिबा, मान गए। कहिए आप के खिदमत मे क्या पेश करू?"

"ज्यादा कुछ नही। बस! आप का यह मोबाईल न सही लेकिन उस की किमत अदा कर दो और अपना मोबाईल छुडा लो।

"क्या कहा? मोबाईल किमत... पचास हजार अदा कर दू?"

"ठिक पहचाना आप ने दुल्हेराजा। बोलो दे सकते हो... आज-आत्ता-ताबडतोब...जाऊ देत. मोबाईल पंधरा दिवसांपूर्वी विकत घेतलेला आहे म्हणजे तसा जुनाच आहे. चाळीस हजारावर डन! ओके ? यास ब्लॅकमेकिंग समजायचे नाही. ये तो साली का हक है।"

"मायगॉड! हे तर भलतेच झाले आहे. पाच मिनिटात फोन करतो..."

"एक मिनिट जिज्जू, पाच नाही दहा मिनिटे घे पण मला शोधण्याचा तुझ्या हस्तकांकरवी प्रयत्न करु नकोस. निराश होतील बिचारे क्योंकि हमारे जासूस इस मंगलकार्यालयमे चप्पे चप्पेपर तैनात है। अभी हमारी दीदीने और आप कि प्यारी दुल्हन ने मुझे 'माकडीण' इस पद से नवाजा है। बरोबर? ठीक आहे. मी वाट पाहते... पाच मिनिटं!" असे म्हणत मेहुणीने फोन बंद केला आणि वधूने लगबगीने विचारले,

"काय म्हणाली रे? चाळीस हजार मागतेय? देणार आहेस तू?"

"द्यावे तर लागतीलच. माझ्या मोबाईलचा पॅटर्न मी तिला सांगून बसलोय. खूप काही गुपित..."

"गुपित? म्हणजे? तू मला फसवले तर नाहीस ना? तुझे इतर कुण्या कार्टीशी काही लफडं..."

"अग, गुपित म्हणजे काय तेवढेच असते का? ऑफिसची माहिती... अरे, इकडे या..." असे म्हणत नवरदेवाने काही मित्रांना इशारा करुन जवळ बोलावले आणि त्यांना हळू आवाजात म्हणाला,

"माझ्या कारच्या डिकीत एक शू बॉक्स आहे. तो घेऊन या..." ते ऐकून नवरी किंचाळत म्हणाली,

"काय? बुटाचे खोके? तू तुझ्या मेहुणीला खेटरं देणार आहेस?"

नवरदेव नवरीच्या कानात हळू आवाजात म्हणाला, "ज्याची त्याची लायकी असते. हम भी कुछ कम नही। " तो बोलत असताना गेलेले त्याचे मित्र त्याला येताना दिसले. त्यांनी दुरवरून नवरदेवाला थम्स अप् केले. ते पाहून नवरदेवाने वधूच्या हातातला भ्रमणध्वनी घेतला आणि क्रमांक जुळवला.

"क्या बात है जिज्जू, वक्त के बडे पाबंद लगते हो। अभी पाँच मिनिट होने मे दो सेकंद बाकी है... "

"वक्त मत जाया करो। मोबाईल दे दो... चालीस हजार ले लो..."

"एक ही मिनिट मे हाजीर होती हूँ..." असे म्हणत मेहुणीने फोन बंद केला. काही क्षण जाताच तिचा आवाज आला, "आप ने बुलाया और हम आ गये जिज्जू..." असे म्हणत मेहुणी वधूवर ज्या श्रुंगारित खुर्च्यांवर बसले होते त्या खुर्च्यांच्या मागून पुढे आल्याचे पाहून वधूने विचारले,

"म्हणजे तू आमच्या मागेच होतीस?"

"बहिणाबाई, ते जाऊ देत. काय म्हणता जिज्जू, माल तैयार है?"

नवरदेव हातातला बुटांचा डबा पुढे करत असताना वराकडील वऱ्हाडाने ताल धरला,

"ज्युते ले लो... मोबाईल दे दो..." तो खिजवणीचा सूर ऐकून चिडलेली मेहुणी ताणाताणात म्हणाली,

"घोर अपमान! जिज्जू, घोर अपमान!..."

"जैसे को तैसे मिला, बडा मजा आया।... तसे काही नाही. माल रेडी है। इस हाथ पैसे का खोका ले लो, उस हाथ मोबाईल दे दो।"

"पण आम्हाला विश्वास नाही. खोलून दाखवा... खोके..." मेहुणी ठसक्यात म्हणाली

"जैसी आप की मर्जी!..." असे म्हणत नवरदेवाने हातातले खोके उघडून ते मेहुणीसमोर धरले. डब्यात बुट नसल्याचे आणि पाचशे-दोन हजाराच्या नोटा पाहून मेहुणी आनंदली, खुश झाली. आपण जिंकलो, जिजाजीला हरवले या आनंदात तिने मोबाईल नवरदेवाच्या हातात देताना दुसऱ्या हाताने त्याच्या हातातले खोके हिसकावून घेतले आणि जग जिंकल्याच्या आनंदात ती मानेला हिसका देत, कमरेला झटका देऊन तोऱ्यात निघाली असताना पाठीमागून नवरदेवाच्या एका मित्राचा आवाज आला,

"जानेमन, अदा तो बडी अच्छी है, खेल भी बडा खतरनाक खेला था। लेकिन जीत तो हमारी हुई है। मोहतरमा जरा दिल थाम के नोट एक बार चेक तो कर लो, कही जाली नोट तो नही है क्योंकि हम इस खेल के पुराने खिलाडी है..."

      आनंदाने बेफाम धावणारी मेहुणीची पावलं जागीच थांबली. तिने संशयाने नवरदेवाच्या दिशेने बघितले. खोडसाळपणाचे भाव चेहऱ्यावर असलेल्या वराने तिला अंगठा दाखवत जिव्हा दर्शनही घडविले. ते पाहून मेहुणीने संशयाने डबा उघडला. आत नोटांची तीन बंडले होती. एक बंडल दोन हजाराची नोट असलेले तर दुसरे दोन पाचशेची नोट असलेले. मेहुणीने दोन हजाराचे बंडल उचलले. खोक्याच्या बाहेर येताच ते बंडल बांधलेले नसल्यामुळे सर्व नोटा क्षणार्धात इतस्ततः पसरल्या. त्या नोटा पाहून पाहणारे आश्चर्यात पडले तर मेहुणीचे डोळे रागाने लालेलाल झाले. खाऊ का गिळू या नजरेने मंद मंद हसणाऱ्या नवरदेवाकडे बघत तिने पाचशे रुपयांच्या बंडलवरील काही नोटा उचलताच त्या खाली असलेल्या नोटा दिसताच मेहुणीला हातातल्या नोटा गरगर फिरत असल्याची जाणीव झाली. तिने त्या नोटा वधूवराच्या दिशेने अक्षता फेकाव्या तशा उधळल्या. त्या नोटा पाहून लोकांमध्ये चर्चा सुरू झाली,

"अरे ह्या तर बंद झालेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा आहेत. काय बनवले यार नवरदेवाने.... सालीला..."

तिकडे रागाने लालबुंद झालेली मेहुणी व्यासपीठावरून दाणदाण पाय आपटत उतरत असताना नवरदेवाच्या मित्रमंडळाने ठेका धरला,

"हजार देऊँ या पाँच सौ का नोट देऊँ... बता तेरी मर्जी है क्या?"

ते खिजवण्याचे स्वर ऐकून मेहुणी परत फिरली. तिने वराच्या दिशेने रोखलेली नजर, आग ओकणारे डोळे, चालीतील उद्दामपणा पाहून अनेकांच्या ह्रदयाचा ठोका चुकला. आता ही नवीन काय खेळ करणार ही चिंता अनेकांना सतावत असताना अचानक मेहुणीने पवित्रा बदलला. ती हसत, नाचत, कंबर लचकवत, वेणीच्या शेपटीला झटका देत, नवरदेवाने काढून ठेवलेल्या नव्या कोऱ्या बुटांकडे बघत आणि नवरदेवाच्या हातात असलेल्या भ्रमणध्वनीकडे लक्ष देत येत असलेली पाहून अचानक नवरदेव खुर्चीवरून उठला, शेजारी पडलेला माइक उचलून लगबगीने वधुच्या मागे जात ताल ना सूर अशा बेसूर आवाजात गायला लागला,

"मुझे मेरी साली से बचाओ...मुझे मेरी साली से बचाओ..." ते ऐकून मेहुणीसह सारे हसत आणि टाळ्या वाजवत सुटले...

                                     ‌


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy